Skip to main content

डर्बी लाजिरवाणी (मॅन्चेस्टर युनायटेड च्या पराभवाचं गीत)

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 26/03/2014 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काल गजर लावून सव्वा वाजता उठून मॅन्चेस्टर डर्बी बघितली... आणि हाय रे दुर्दैवा... ३-० ची हार बघावी लागली. झोपही गेली आणि हारही झाली.

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 26/03/2014 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ४4. 1 2 भगवान बुद्ध कमलासनावर ध्यानस्थ मुद्रेत ‘मी आत्महत्या करायला निघालोय.
....‘मी आत्महत्या करायला निघालोय. ...

एकत्र कुटुंब - काळाची गरज?

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 26/03/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्याच्या ढासळलेल्या नीतीमूल्ये व संस्कारांच्या काळात तसेच वाढत्या किंमती लक्षात घेतल्या तर एकत्र कुटुंब ही काळाची गरज आहे असे वाटते का? मिपाकरांकडून भरपूर चर्चेची अपेक्षा. तीन गोष्टींवर चर्चा व्हावी (१) नीतीमूल्ये व संस्कार. (२) शेतजमीन व एकत्र कुटुंबपद्धतीने आपसूक होणारी गटशेती. (३) वाढत्या किंमती (आवाक्याबाहेर गेलेले वस्तूंचे भाव) व एकत्र कुटुंब असण्याने होणारे फायदे.

मागोवा लोकसभा निवडणुकांचा..२ पहिल्या लोकसभा निवडणुका- १९५१-५२.

लेखक लाल टोपी यांनी बुधवार, 26/03/2014 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागोवा लोकसभा निवडणुकांचा..१ पहिल्या लोकसभा निवडणुकीचे आव्हान भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आयोजित करणे किती आव्हानात्मक होते हे आपण पाहिले. त्यामुळेच जानेवारी फेब्रुवारी १९५१ मध्ये या निवडणुकांची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यावरून निवडणुक आयोगाला एकूणच प्रक्रियेबाबत आणखी किती तयारी करावी लागेल हे समजून आले.

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 25/03/2014 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३ विपश्यना केंद्रात भुताटकी?
....अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्या आवाजाने भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो! ...त्यात काही डाव होता की काय? ... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं. ...माझा पक्का संशय झाला होता! … …. कोण? ...

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 25/03/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते.

द्राक्षांचा मुरांबा (मुर द्राक्षं)

लेखक अनन्न्या यांनी मंगळवार, 25/03/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः दोन वाट्या आंबट द्राक्षं, दोन वाट्या साखर, दोन लिंबांचा रस, दोन-तीन लवंगा, वेलची दाणे, पाणी. कृती: द्राक्षं स्वच्छ धुवावीत. दोन वाट्या साखरेत साखर बुडेल एवढे पाणी घालून पाक करण्यास ठेवावा. पाकाचा थेंब डीशमध्ये टाकल्यावर पसरणार नाही, इतपत पाक घट्ट झाला की त्यात धुतलेली द्राक्षं, लवंगा, वेलची दाणे घालावेत. muramba पाक परत शिजत ठेवावा. द्राक्षांच्या रसामुळे पाक थोडा पातळ होतो.

मोदी खरच पंतप्रधान बनतील का !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 25/03/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मोदी हे देशाचे जवळ जवळ पंतप्रधान बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या मोदीसमर्थकांचा उन्माद विशेष लक्षात येण्याजोगा आहे... मोदींहूनही मोदी भक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच मोदी येतील का ? त्यासाठी भाजपा किती जागा मिळवील ? अकाली, सेना, पासवान अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता येणारे सरकार खिचडी सरकार असेल. ते २ २|| वर्षे टिकेल

सूर्य थकला आहे

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 25/03/2014 11:26 या दिवशी प्रकाशित केले.

सूर्य थकला आहे


पहाट जरा चेतलेली पण;
सूर्य थकला आहे
नितळण्याच्या बुरख्याखाली
विस्तव निजला आहे
सारं काही सामसूम, मात्र;
एक काजवा जागत आहे
चंद्रकलेच्या गर्भाराला
भिक्षा मागत आहे

वादळं वारं सुटलंय पण;
वीज रुसली आहे
बुद्धिबळांच्या शय्येखाली
ऐरण भिजली आहे
शिवशिवणारे स्पंदन काही
उधाण मोजत आहे
चिवचिवणार्‍या चिमणीमध्ये
दीक्षा शोधत आहे

अंगरख्याची सनदी गुंफण
टरटर उसवत जावी
अपहाराची दुर्धर खाई