Skip to main content

<पहिली धार>

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 03/04/2014 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
सोडा नसला तरी चालेल , पण संध्याकाळी एक चपटी असावी ! एकही चुनाडबी नसली तर चालेल , पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी ! लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही , पण चखण्यात एक चकली तरी असावी ! हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली , पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी ! क्रेट संपवायला गँग आहेच , पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच ! पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण , पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!! -पिणार ____________________________________________

राधा

लेखक चिनार यांनी गुरुवार, 03/04/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोकुळ नसले तरी चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! एकही गोपीका नसली तर चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही , पण आयुष्यात एक राधा असावी ! पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली , पण प्रेम शिकवायला एक राधा असावी ! गीता ऐकायला अर्जुन आहेच , पण गीता स्फुरायला एक राधा असावी ! कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण , पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!

एक काहीतरी……

लेखक चिनार यांनी गुरुवार, 03/04/2014 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ? एक काहीतरी नक्कीच हरवलंय ! कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ? एक काहीतरी नक्कीच थांबलय ! पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ? एक काहीतरी नक्कीच राहिलंय ! मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ? एक काहीतरी नक्कीच करपलय ! संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ? एक काहीतरी नक्कीच झालंय आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ? एक काहीतरी नक्कीच वाढलंय शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?

नियम कायदे आणि आपल्या सिस्टिम्स

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 03/04/2014 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
एकीकडे घाई घाईत सर्वंकष विचार न करता बनवलेले नियम/कायदे ..त्यांची बिनडोक पद्धतीने केलेली अंमलबजावणी..नियम माणसांसाठी का माणसे नियमांसाठी असा प्रश्न पडावा इतका ताठरपणा ....एखाद्या नियमाची कार्यपूरकता लक्ष्यात नं घेता त्याचा अडवणुकीसाठी वापर करण्या कडे कल दुसरीकडे पैसा / सत्ता ह्या समोर बहुतेक नियम कायदे ह्यातून सहज पळवाट आणि सगळ्यात शेवटी नं पटलेला नियम / कायदा खुशाल ‘भंग’ करण्याची मिळालेली शिकवण आणि आता हाडी मासी रुळलेली सवय... कधी सुधारणार आपण ??

काही प्रश्न (?)

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 03/04/2014 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज) सोनियांकडे स्वतःची कार नाही आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे. असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?

प्रीतीची पारंबी

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 02/04/2014 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्रीतीची पारंबी

रामाच्या प्रहराला केळीला जाग येते
पाडाच्या घडातुनी कंगण वाजविते

पूर्वाच्या पावसाने न्हाणीची धुणी केली
वेंधळ्या वादळाने जीवनी जुनी केली
रस्त्याचे रंक-राव फुंकून फुंक जाते ॥

मंजूळ मैना शीळ घालते गोंजारून
बघते रानवल्ली नजर न्याहाळून
चंद्राची चंद्रकला लाजुनी लाजविते ॥

तनूच्या तनाईला ताणतो रानवारा
पाटाच्या पैंजणाला झुरतो जीवसारा
प्रीतीच्या पारंबीला पारवा पिंजारते ॥

चोचीत चोजवाया चालला खेळ न्यारा

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ६

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 02/04/2014 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
१ ऑगस्ट कँप ४ वरील गिर्यारोहकांची अंतिम चढाईच्या दृष्टीने तयारी सुरू होती. ऑक्सीजन सिलेंडर्स, रेग्युलेटर, पाणी, आवश्यक ते खाणं, कॅमेरे आणि सॅटेलाईट फोन यांची जुळवाजुळव करण्यात प्रत्येक मोहीमेतील गिर्यारोहक व्यस्त होते. बेस कँपमध्ये ठरलेल्या बेतानुसार पहिली तुकडी मध्यरात्रीनंतर १.३० च्या सुमाराला चढाईसाठी निघणार होती. मात्र चढाईला सुरवात करण्यापूर्वीच सर्बीयन मोहीमेतील अनुभवी आणि २००४ मध्ये शिखरावर चढाई केलेला पोर्टर शाहीन बेगला बेस कँपवर परतावं लागलं.

युरोप मधील धमाल मिपा.कट्टा (म्युनिक मधला) - समाप्ती

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 02/04/2014 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/27348 हि पहिल्या भागाची लिंक आहे. डखाऊ कॅम्प वरून थोडेसे हिरमुसून आम्ही बशी ईष्टोप्वर आलो. तिथून ट्रेणीत बसलो . ज्या गफ्फा रंगल्या काही विचारू नका . लैम चा ष्टोप कंदी येउन गेला समजलेच नाय . एक अगदी वयस्कर आजी आमच्या गफ्फांकडे लक्ष देत होत्या त्यानाही कळल नाही कि स्टोप कधी येउन गेला . :( मग त्याही आमच्या बरोबरच पुढच्या थांब्याला उतरल्या आणि तिथून मग आमची वरात लैमला आली . :D लैम ष्टेषण ला उतरून चाली चाली करत घरी आलो . बशीला वेळ होता म्हणून चाली चाली . घरी आल्यावर आधी पाणी मग चहा .

भारतिय राजकरणाला पडलेलं सुंदर स्वप्न !!!

लेखक बिपिन६८ यांनी बुधवार, 02/04/2014 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत , प्रत्तेक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतोय , एकूणच सगळे वातावरण ढवळून निघतेय .प्रत्तेक पक्षाचे स्टार प्रचारक सभा गाजवत आहेत ….

जिर्‍या-मिर्‍याचा खाकरा

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 02/04/2014 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी कणीक १ टीस्पून भाजून, भरडसर वाटलेले / कूटलेले जीरे १ टीस्पून कूटलेली काळीमिरी मीठ चवीप्रमाणे १ टीस्पून तेल . पाकृ: कणकेत जीरे, मिरी, मीठ व थोडे तेल घालून घट्ट कणीक भिजवून घ्यावी. झाकून १५