Skip to main content

राधा

लेखक चिनार यांनी गुरुवार, 03/04/2014 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोकुळ नसले तरी चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! एकही गोपीका नसली तर चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही , पण आयुष्यात एक राधा असावी ! पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली , पण प्रेम शिकवायला एक राधा असावी ! गीता ऐकायला अर्जुन आहेच , पण गीता स्फुरायला एक राधा असावी ! कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण , पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!
लेखनविषय:

वाचने 2189
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान प्रयत्न. हे अगदी पटले:
कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी
पण हे नाही कळले:
गीता स्फुरायला एक राधा असावी
पु.ले.शु.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अहो मिका, ते "कर्मण्येवाधिकारस्ते..." हे पहिला राधेला ऐकवलं असावं ना हात सोडवुन घ्यायला...काय तुम्ही.