मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नियम कायदे आणि आपल्या सिस्टिम्स

अत्रन्गि पाउस · · काथ्याकूट
एकीकडे घाई घाईत सर्वंकष विचार न करता बनवलेले नियम/कायदे ..त्यांची बिनडोक पद्धतीने केलेली अंमलबजावणी..नियम माणसांसाठी का माणसे नियमांसाठी असा प्रश्न पडावा इतका ताठरपणा ....एखाद्या नियमाची कार्यपूरकता लक्ष्यात नं घेता त्याचा अडवणुकीसाठी वापर करण्या कडे कल दुसरीकडे पैसा / सत्ता ह्या समोर बहुतेक नियम कायदे ह्यातून सहज पळवाट आणि सगळ्यात शेवटी नं पटलेला नियम / कायदा खुशाल ‘भंग’ करण्याची मिळालेली शिकवण आणि आता हाडी मासी रुळलेली सवय... कधी सुधारणार आपण ??

वाचने 6315 वाचनखूण प्रतिक्रिया 4

माहितगार 05/04/2014 - 11:34
अत्रन्गि पाउस आपण खरेच एका चांगल्या विषयावर धागा काढला आहेत. त्याबद्दल धन्यवाद आणि धाग्यास(चर्चेस) आमच्या हार्दीक शुभ्च्छा. प्रसंगानुरुप खालील दोन दुव्यांची जाहीरात करतो आहे (धाग्याच्या रुपाने जाहीरात संधी बद्दल धन्यवाद :) ) *मिपा धागा चर्चा भाग ३: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थीत मराठी :मान्यताप्राप्त नकाशातज्ञ तसेच कॉपीराईट क्षेत्रातील कायदेततज्ञांची अनुपलब्धता * आमचे इंग्रजी विकिपीडियावरील लेखन Legal awareness धन्यवाद

माहितगार 05/04/2014 - 11:50
कुणी काही चांगल आणि नियमानी करू इच्छित असेल तर कायदे/नियम नेमके त्यांनाच आडवे जातात तिथे फ्लेक्झीबिलीटीचा अभाव जाणवतो. कायदा सर्वांसाठी मात्र राबवला जात नाही याने सामान्य व्यक्तीचा कायद्यावरचा विश्वास उडू लागतो कायद्याला पळवाट काढण्याची प्रवृत्ती बळावते. **आपली विधानमंडळे कायद्यांच्या बाबातीत नाका तोंडातून पाणि गेल्यानंतरच थोडीफार हलताना दिसतात जुन्या कायद्यांचे पुर्नपरिक्षण सुधारणा आणि नवीन आलेल्या विषयांना समजून घेऊन त्याकरीता वेळे कायदे बनवणे यात मागे असणे. **न्याय प्रणालीतील कालापव्यय आणि तांत्रिक अद्ययावततेचा अभाव (यात अंशतः सुधारणा होत असली तरी एकुण व्य्वस्थेचा आकार पाहता खूपच मागे आहे.)