Skip to main content

सुरेsssssssssशं...(अण्णा!)..यिड्ली-वाला!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 12/05/2014 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचं..हे शीर्षक म्हणजे,आमच्या मद्राशी पुरोहितांपैकी एका बड्या प्रस्थाची त्या सुरेश-यिड्लीवाल्याला मारलेली हाक आहे.

कुssssफ्लिssssये

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 12/05/2014 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी, शीषर्कावरुन आरोळि/हाक ओळखीची वाटतेय का? मग दाहक उन्हाळा आणि थंडगार कुल्फि ह्यांच नातं आहेच तस घट्ट. आंब्याचा ऋतु असल्यामुळे आंबा घालुन कुल्फि तर केलीच पण ती सेट सुद्धा जssssरा वेगळ्या पद्धतीने सेट केली. कसं??? चला सांगतो बरं... Kulfi 1 साहित्यः १. तयार घट्ट आंबे - २ २. मिल्क पावडर - २ कप ३. काजु पावडर - १ कप ४. पिस्ता पावडर - १/२ कप ५. साखर - चवीप्रमाणे कमी/जास्त ६. आंब्याचा पल्प/रस - २ कप ७. कार्निशन ईव्हॅपोरेटेड मिल्क - १ टिन ८.

९० डिग्री साऊथ - १०

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 12/05/2014 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ९ स्कॉटची तुकडी काही वेळातच आपल्या पुढील कँपवर पोहोचली. इथेच त्यांनी घोड्यांची हत्या केली होती. घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांनी भरपेट जेवण करुन विश्रांती घेतली. इथून पुढे मध्ये असलेल्या डेपोतील सामग्रीच्या सहाय्याने एक टन डेपो गाठणं त्यांना शक्य होणार होतं. रॉस आईस शेल्फवर अर्धवट शुध्दीत असलेल्या टेडी इव्हान्ससह लॅशी आणि क्रेनची वाटचाल सुरु होती. मात्रं खराब हवामानामुळे त्यांची प्रगती खूपच हळू होती. त्यांच्याजवळ अन्नपदार्थांचा साठाही मर्यादीत प्रमाणात होता.

कलगीतुरा- भाग ४

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 12/05/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ कलगीतुरा-भाग ३ "तर मित्रांनो, उद्धवजी आणि राजजी त्यांचे विचार मांडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आपणा सर्वांची उत्सुकता आता ताणलेली आहे. जास्त "ताणण्याआधी" आपण एक अगदी छोटीशी विश्रांती घेऊ या. कुठेही जाऊ नका." वाशाने "ताणण्याआधी" या शब्दावर जोर दिला. पुन्हा जाहीराती सुरू झाल्या.

मनमोहनसिंह यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य.

लेखक कलंत्री यांनी सोमवार, 12/05/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. मनमोहनसिंह यांचे प्रंतप्रधान म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे वास्तव्य दिल्लीमध्ये प्रशस्त अश्या ठिकाणी व्यतित होणार आहे. वर्तमानपत्रातील बातम्यानूसार एका २ १/२ एकरातील भू़खंडावर ४ शयन घर, हिरवळ, उद्यान इत्यादींची सोय असेल. उच्च पदस्थ लोकांचे जीवन कधी कधी आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात झाकले जाते. त्यांनी देशाला दिलेले योगदान विसरले जाते. कधी कधी नकळतच ते वादामध्ये गुरफटले जातात उदा. प्रतिभा ताई पाटिलांचे निवृत्तीनंतरचे वास्तव्य, त्यांना मिळालेल्या भेटी गाठी इत्यादी. मनमोहन सिंह हे एक सुसंस्कृत व्यक्ति म्हणून ओळखले जातात.

९० डिग्री साऊथ - ९

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 11/05/2014 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
९० डिग्री साऊथ - ८ अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला होता. वाटेतील प्रत्येक डेपोवर त्यांना मेयर्सकडून हालअपेष्टांचं वर्णन करणारे संदेश मिळत होते. परतीच्या वाटेवर मेयर्सला हिमवादळाने गाठलं होतं. त्याचा अन्नसाठाही मर्यादीतच होता. परत येणा-या तुकड्यांना आवश्यक साधनसामग्रीची केप इव्हान्सहून एक टन डेपोमध्ये आणण्याची कामगिरी स्कॉटने त्याच्यावर सोपवली होती, परंतु मेयर्सला ते अशक्यंच होतं ! मेयर्सची ही परिस्थिती असूनही एक टन डेपोवर साधनसामग्रीची रेलचेल पाहून अ‍ॅटकिन्सनला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता !

आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे -

लेखक विदेश यांनी रविवार, 11/05/2014 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
. (चाल: आज चांदणे उन्हांत हसले, तुझ्यामुळे-) आज पाहुणे घरात घुसले, तुझ्यामुळे नात्यातून बघ अंतर पडले, तुझ्यामुळे ... घाव अंतरी बसतच होते घर खरोखर सुखात होते खर्चातून हैराण जाहले, तुझ्यामुळे ... उसनवारीचे द्रव्य जमविले व्याजच होते भारी कसले द्र्व्यास्तव ते सर्व भांडले, तुझ्यामुळे ... उगाच माझी होती दैना खाली पाकिट मार्ग सुचेना वादातून दाताड विचकले, तुझ्यामुळे ... सदनि या जरी होती शांती पाहुणे परंतु येता बोंब ती आज शंख तरि मीच ठोकले, तुझ्यामुळे ... .
काव्यरस