Skip to main content

समाधानाचा शोध

लेखक चैतू यांनी गुरुवार, 15/05/2014 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस निघतो समाधानाच्या शोधात सगळीकडे फिरतो, खूप खूप शोधतो पण समाधान काही सापडत नाही वाटेत त्याला अनेक माणसं भेटतात त्याच्यासारखीच, पण वाट चुकलेली सगळे एकमेकांना विचारत राहतात पण समाधान कोणाकडेच असत नाही समोर असतात असंख्य वाटा कोणती वाट पकडायची कळत नाही पकडलीही एखादी वाट तरी पार कशी करायची उमगत नाही त्या वाटेवरसुद्धा असतात अनेक वाटाडे वाट दाखवण्याचं आश्वासन देत आधी पोहचवलेल्या माणसांच्या कहाण्या सांगत आणि फुशारक्या मारत माणसे त्यांच्यावर विश्वास ठेवतात पण माणसांचा शिधा हडप करुन वाटाडे गडप होतात आणि माणसे मात्र फिरत राहतात पुन्हा त्याच अनोळखी वाटांवर चकवा लागल्यासारखी घुमत राहतात त्याच जागी गोल
काव्यरस

मदत हवी आहे

लेखक निलेश देसाई यांनी गुरुवार, 15/05/2014 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धांगिनीचा प्रवासात होणारा त्रास वाचविण्यासाठी अस्मादिकांनि स्वतःचा त्रास वाढविण्याचे ठराविले आहे. घर शोधुन देणार्‍या दलालांना दलाली *pardon* देणे आमच्या तत्वात बसत नसल्याने (आणि खिशाला परवडत नसल्याने *sad* ) नविन घर शोधण्यासाठी मिपावरिल मित्रांची मदत अपेक्षित आहे अपेक्षा : १. शहर : पुणे २. भाग : नगर रोड वरिल खराडी बायपास चौक अथवा मुंडवा-केशवनगर चौक (या ठिकाणांन पासुन पायी जावु शकेन इतपत अंतरावर) ३. १ अंतःपुर्-बैठक-स्वयंपाकघर ( 1BHK) ४. २४ तास पाणी ५.

माहिती हवी आहे - पुण्यात (हडपसर किंवा कोथरुड) छोटेखानी समारंभासाठी हॉल

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 15/05/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ही माहिती कशी मिळवावी हा विचार करत होतो. सुलेखा.कॉमवर चौकशी टाकून झाली. काही विशेष हाती लागले नाही. आणि अचानक मिपा आठवले. आजकाल काही दुखलं-खुपलं तरी तोंडून 'आई गं' ऐवजी 'मिपा रे!' निघेल की काय असे वाटायला लागले आहे. :-) मिपावर माहिती आणि मदत नक्की मिळते हा अनुभव आहे. अमेरिकावारीच्या वेळी हा अनुभव घेतलाच आहे. मदतीची किंवा माहितीची अगदीच अडनिड 'नीड' असेल तरी मुबलक प्रमाणात हुरूप नक्कीच मिळतो. आणि हुरूप असेल तर ठरवलेले पार पाडणे खूप सोपे होते. :-) म्हणून हा पत्रप्रपंच! वडिलांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये एक छोटेखानी हॉल शोधतो आहे.

आई

लेखक कहर यांनी गुरुवार, 15/05/2014 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आकाश उतरता खाली अस्तित्व नष्ट कराया मी हळूच पांघरून घेतो आईची हळवी माया ती पैलावरती माया ऐलावर होते रात ठेवता उशीवर डोके केसातून फिरतो हात का डोळ्यामध्ये आसू का अंतर्मन व्याकूळ गगनात भारली प्रतिमा अस्पष्ट करतसे धूळ झाकल्या पदराखाली आयुष्याचे कोंदण आईच्या हातावरती एक पिंडीचे गोंदण हातात चंद्र धरून स्वप्नात भेटते आई घेऊन कुशीत मजला गाते अजूनही अंगाई

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव -१

लेखक तिमा यांनी गुरुवार, 15/05/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती. गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे.

आरती संग्रह (मराठी) - नेहमीच्या वापरासाठी आम्ही बनवलेलं नवीन अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप

लेखक विश्व यांनी गुरुवार, 15/05/2014 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप तय्यार केले आहे. Google Play वर आपण हे अ‍ॅप या लिंक वर डाउनलोड करू शकता http://bit.ly/1hOrUnZ हे अ‍ॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे.

दुस्री

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 15/05/2014 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
म्या पास. निम्मी, अंक्या, भान्याबी पास. गुर्जी म्हन्लं "आता दुस्रीत". म्या धावत घरी. वराडले, “म्या दुस्रीत ग्येली.” आयनं हसून श्येंगदानं दिलं. आज्जीनं गूळ दिला हातात. आण्णा पेन देनार हायेत. गावभर हिंडून दारात बसली. मंग राम्या, मुक्या, सुर्की दिसली. आगावू हायती दुस्रीची पोरंपोरी. कायबी कराया गेलं की "ए पयलीच्या पोरांनो, मागं व्हा" म्हनत्येत. त्येबी आमच्यावानी साळंला येत्येत; पाडं म्हन्त्येत; गुर्जींची कामं करत्येत; मारबी खात्येत. पन सोताला शाने समजत्येत जादा. म्या म्हन्ली, “लई शानपना नका दावू.

सिनेमा आणि प्रेम

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 14/05/2014 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.

२०१४ लोकसभा निवडणुक - सर्वेक्षण अंदा़ज, मतमोजणी व निकाल

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 14/05/2014 20:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ लोकसभा निवडणुकांचे निवडणुकपूर्व सर्वेक्षणाचे अंदाज झी-न्यूज अंदाज http://zeenews.india.com/news/general-elections-2014/bjp-to-emerge-as-s… http://znn.india.com/Img/2014/4/3/Opinion%20Poll-%20Phase%202%20Report… भाजप - २१५-२२५, रालोआ - २१९-२३२ काँग्रेस - १२१-१३२, संपुआ - १३२-१४९, इतर - १७१-१८१