माहिती हवी आहे - पुण्यात (हडपसर किंवा कोथरुड) छोटेखानी समारंभासाठी हॉल
लेखनप्रकार
नमस्कार,
ही माहिती कशी मिळवावी हा विचार करत होतो. सुलेखा.कॉमवर चौकशी टाकून झाली. काही विशेष हाती लागले नाही. आणि अचानक मिपा आठवले. आजकाल काही दुखलं-खुपलं तरी तोंडून 'आई गं' ऐवजी 'मिपा रे!' निघेल की काय असे वाटायला लागले आहे. :-) मिपावर माहिती आणि मदत नक्की मिळते हा अनुभव आहे. अमेरिकावारीच्या वेळी हा अनुभव घेतलाच आहे. मदतीची किंवा माहितीची अगदीच अडनिड 'नीड' असेल तरी मुबलक प्रमाणात हुरूप नक्कीच मिळतो. आणि हुरूप असेल तर ठरवलेले पार पाडणे खूप सोपे होते. :-) म्हणून हा पत्रप्रपंच!
वडिलांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये एक छोटेखानी हॉल शोधतो आहे. कार्यक्रम साधारणपणे सप्टेंबरमध्ये करायचे ठरत आहे. वाढदिवसाच्या तारखेवर कार्यक्रम न ठेवता आप्तेष्टांच्या सोयीनुसार ठेवण्याचे ठरल्याने तारखेबाबत पुरेशी लवचिकता असणार आहे. कार्यक्रम शक्यतो हडपसरच्या किंवा कोथरुड (चांदणी चौक भाग) परिसरांच्या आस-पास घेण्याचे ठरत आहे. दोन्ही भागात घरे असल्याने कार्यक्रम घेणे सोपे जाईल म्हणून या भागांची निवड केली आहे. खूप महागडा हॉल नको आहे. चांगली सेवा देऊ शकणारा साधा हॉल चालेल.
- साधारण १०० पाहुणे येण्याचा अंदाज आहे.
- संध्याकाळी जेवणे झाल्यानंतर हॉलवर जाऊन तिथे गप्पा, गाणी असा कार्यक्रम करण्याचे योजत आहे.
- दुसर्या दिवशीची न्याहारी, चहा, कॉफी आटोपल्यानंतर एखादी छोटीशी पूजा करावयाची आहे.
- नंतर जुन्या छायाचित्रांवर आधारित एखादा स्लाईड शो करण्याचा मानस आहे आणि मग नंतर काही पाहुणे मनोगत व्यक्त करतील.
- दुपारचे जेवण (साधेच पण रुचकर) होईल.
- साधारण दुपारी ३:०० च्या आसपास हॉल सोडता येईल.
म्हणजे या ढोबळ रुपरेषेनुसार खालील गोष्टी आवश्यक आहेतः
- १०० माणसांची बसण्याची, एक रात्र झोपण्याची व्यवस्था
- सकाळची न्याहारी, चहा, कॉफी
- दुपारचे जेवण
- गरजेनुसार चहा, कॉफी
- ऑडिओ सिस्टम (माईक वगैरे)
- म्युझिक सिस्टम (गाणी, सनई, वगैरे)
- प्रोजेक्टर (स्लाईड शो साठी)
- पूजेसाठी जागा
- चांगली सेवा
मी शोध घेतोच आहे. पण काही खरोखर चांगली ठिकाणे शोधून सापडत नाहीत. आपणापैकी कुणाला काही माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी. ज्यांनी असे कार्यक्रम आधी आयोजित केलेले असतील त्यांनी कृपया माहिती द्यावी आणि अनुभव देखील सांगावेत ही विनंती.
धन्यवाद,
समीर
वाचने
6691
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
"उत्सव मंगल कार्यालय" ( वनाज
कोथरूडातले ईशदान सभागृह अशा
हडपसरला कार्यालयं बरीच आहेत
In reply to हडपसरला कार्यालयं बरीच आहेत by सूड
अवांतर...
In reply to अवांतर... by मुक्त विहारि
हडपसर हे कोथरूड आणि
In reply to अवांतर... by मुक्त विहारि
??? संबंध काय
In reply to ??? संबंध काय by बॅटमॅन
संबंध काय
वडिलांना पंचाहत्तरीच्या
मोरेश्वर सभाग्रुह - संगम
प्रतिज्ञा पर्यन्त येतच आहात
In reply to प्रतिज्ञा पर्यन्त येतच आहात by आनन्दा
पार्किंग कुठे करायचं आन्दाभौ?
हडप्सर
श्रेयस सिद्धी
In reply to श्रेयस सिद्धी by श्रीरंग_जोशी
+१
बरीच नवी कार्यालये, हॉल चालू
Swamikrupa hall - karve
पुण्याई सभागृह, पौड फाटा, गाडगीळांच्या दुकानापाशी
धन्यवाद!
काही इतर पर्याय
अनेक शुभेच्छा. कार्यक्रम
In reply to अनेक शुभेच्छा. कार्यक्रम by सखी
पंचाहत्तरीपर्यंत अमूक एका
In reply to अनेक शुभेच्छा. कार्यक्रम by सखी
८० की ८१व्या वाढदिवसाला
In reply to ८० की ८१व्या वाढदिवसाला by प्यारे१
+२० अधिक महिन्यांचे. तरी १०००
In reply to +२० अधिक महिन्यांचे. तरी १००० by आदूबाळ
समजूत हो माणसांची!
In reply to ८० की ८१व्या वाढदिवसाला by प्यारे१
मस्त लॉजिक
In reply to मस्त लॉजिक by सखी
इथे काही माहिती मिळाली
In reply to मस्त लॉजिक by सखी
अधिक मास राहिले. ८१ वर्षात २७
:)
बघा, खरं बोललं तर आम्हालाच
वरचे गणित चुकले आहे. सौर
In reply to वरचे गणित चुकले आहे. सौर by इन्दुसुता
जरा गणित करून दाखवलंत तर
In reply to जरा गणित करून दाखवलंत तर by आदूबाळ
सहस्त्रचन्द्रदर्शन हा ७५व्या वाढदिवसाच्या आधि येतो