Skip to main content

भेट

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 09/06/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
महायुध्दाला सुरवात होऊन सोळा दिवस उलटले होते. " राजमाता, आपल्या दर्शनासाठी एक देवी आल्या आहेत. " दूताने वर्दी दिली. " आता ? या वेळी ?" राजमातेने आश्चर्याने विचारलं. रात्रीच्या दुसरा प्रहर सुरू झाला होता. " हो !" " कोण आहे ?" " नाव सांगितलं नाही राजमाता, परंतु आपल्याच दर्शनाची त्यांची आग्रही विनंती आहे !" राजमातेने मानेनेच होकार दिला. राजमातेच्या शेजारीच बसलेली द्रौपदीही विचारात पडली होती. काही क्षणांतच मुख आच्छादलेली एक स्त्री राजमातेसमोर आली.

अनप्रेडीक्टेबल भाग्यश्री...!!

लेखक वटवट यांनी सोमवार, 09/06/2014 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर कोणीही जन्माला येताना त्याचा असा स्वतःचा पिंड घेऊन येतो तर काहीजणांचा पिंड घडला जातो. हे घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य घासून घासून गुळगुळीत होऊ पहाणार्या आयुष्याच्या प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक कोपर्यावर, हमरस्त्यावर आणि आडवाटेवर तर हमखास भेटतंच भेटतं. कधी कधी हे असंच भेटतं तर कधी कधी अगदी कडकडून भेटतं…. आता भेटतं त्याला मी काय करणार?? भेटतं तर भेटतं. आणि मला तर खूपदा भेटलंय. पण काहीजणांच्या बाबतीत प्रचंड संभ्रम पडतो कि ह्यांचा पिंड हा जन्मतःच असा कि नंतर घडला… आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्या व्यक्तीकडे असेलच ह्याची खात्री नाही. आणि मिळालंच तरी ते खरं असेलच ह्याचीही खात्री नाही….

गंगा शुद्धीकरण -एक शिवधनुष्य

लेखक उडन खटोला यांनी सोमवार, 09/06/2014 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन! प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .

महापुरुषांची (ऑनलाईन) बदनामी: एक कायमची डोकेदुखी?

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 08/06/2014 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे झालेल्या शिवाजी महाराज व बाळ ठाकर्‍यांच्या फेसबुकवरील काही प्रक्षोभक चित्रांमुळे पुण्यात काही भागात वातावरण तंग होते. त्यात एका निरपराध मुस्लिम युवकाचा मारहाणीत मृत्यू झाला. हे अगदी चुकीचे आहे. त्याच्या खुनाला जबाबदार असणार्‍यांना शक्य तेवढी कठोर सजा व्हावी. अगदी फाशीदेखील. मग त्यांना आपण हुतात्मा आहोत असे वाटले तरी बेहत्तर. पण ह्यावर उपाय काय? फेसबुक वा ट्विटर जगभर वापरले जाते. कुणी कुठे काय प्रकारची पोस्ट करेल ह्याला काही धरबंध नाही. अनेक देशात टोकाचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.

काही लँडस्केप्स...............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 08/06/2014 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे...... कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे.

मदत हवी आहे..जर्मनी...

लेखक vrushali n यांनी शनिवार, 07/06/2014 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझी लहान बहीण २९ जुन ते २९ जुले ह्या कालावधीत कंपनी तर्फे stuttgart जर्मनीत प्रोजेक्ट साठी जातेय्.त्यासाठी काही महिती हवि आहे,जसे की काय काळजी घ्यावी,तिथे आजुबाजुला काय काय फिरन्यासरखी ठीकाणे आहेत, आणी कही सुचना असल्यास जरुर सांगाव्यात. आभारी आहे

उच्चारातल्या गमती...

लेखक माधुरी विनायक यांनी शनिवार, 07/06/2014 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
भडकमकर या आडनावाचा भडक मकर असा उच्चार करणाऱ्या सरदारजीचा विनोद फार जुना झाला, नाही का. उच्चारातल्या या आणखी काही गमती-जमती.. कार्यबाहुल्यामुळे - या शब्दाचा उच्चार कार्यबाहु ल्ल्या मुळे असा केला जातो. (ल वर आघात) नवख्या /अमराठी माध्यमात शिकलेल्या मुलांकडून कार्य बाहुल्या मुळे (बाहुला?) असा उच्चार ऐकून मौज वाटली. 'काटकसर' -काही वर्षांपूर्वी शेजारची पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी लोकसत्ता घेऊन आली. मला एका पानावरची गोष्ट, खरं तर शीर्षक दाखवलं. ते होतं, 'काटकसर'. तिची तक्रार - ताई, या गोष्टीत कोणीच काटक सर नाहीत... क्वात्रोची - हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजत होतं, तेव्हाची गोष्ट.

Vivid Sydney - रंगबिरंगी सिडनीतला रंगबिरंगी कलाविष्कार...

लेखक नानबा यांनी शनिवार, 07/06/2014 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण गोलार्धामधली सगळ्यात happening city म्हणजे सिडनी. अमेरिका युरोप आणि एकूणच बहुतांश प्रगत जगापेक्षा उलट्या बाजूला असलेल्या ऑस्ट्रेलिया मधलं सगळ्यात मोठं शहर. पृथ्वीच्या दक्षिणेकडे असल्यामुळे उत्तरेकडच्या जगापेक्षा इकडे सगळंच उलटं. एप्रिल मे मध्ये जगभर उन्हाळा असताना इकडे कडक थंडी, तर सारं जग बर्फ़ात आणि थंडीत कुडकुडत सांताक्लॉजचं स्वागत करत असताना इकडे मरणाचा उकाडा. अशा सिडनीतला सगळ्यात entertaining festivals मधला एक महत्त्वाचा festival म्हणजे Vivid Sydney. दरवर्षी हिवाळ्याच्या सुरूवातीला, म्हणजे मे च्या अखेरीस हा festival आयोजित केला जातो.

कृष्ण

लेखक आनंदमयी यांनी शनिवार, 07/06/2014 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
रूप सावळे आतीव सुंदर भक्तिरसाचा मनात पाझर उठे शहारा अंगांगावर अंतरात वसतो मुरलीधर निळा गंध त्या निळसर देही मोहक इतुका तो निर्मोही वरवर सारे चंचल श्यामल आत गूढ अविचलसे काही चराचरांतून घुमे बासरी सप्तसूर सावळा मुरारी वाहे यमुना अमृत होवुन उठती आतुन अथांग लहरी प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे कृष्णातच समरसून जावे © डॉ.अदिती जोशी
काव्यरस