Skip to main content

फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 28/06/2014 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता.

इमारत..

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 28/06/2014 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
इमारत.. मी टकमक पाहतो त्या उच्चभ्रु अलिशान इमारतीकडॆ जीला गर्व जाणवतो स्वत:च्या उच्च्भ्रु अस्मितेचा आणि तिच्या प्रस्थापित संस्कॄतीचा म्हणुनच; ती हसते माझ्य़ा खुज्या अस्तित्वाकडॆ बघुन.. रंगबेरंगी प्रकाशात ती सजते पिवळ्य़ा कांतीची नववधु भासते आता तीलाही जाणवते स्वत:मधील एक हुकमी अस्तित्व मग; ती स्वत:च्या साहेबांचे अनुकरण करते आणि काही फ़ुटाच्या अंतरावर असलेल्या माझ्य़ाकडॆ व माझ्य़ासारख्या असंख्य लहान खुराड्य़ांकडॆ बघुन ती स्वत:ताला पुन्हा एकदा प्रस्थापित करते....! वैभव देशमुख २३८
काव्यरस

महाभारताची वेगळी कथा...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 27/06/2014 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं. ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव.

कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर? भाग - २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 27/06/2014 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 2
‘...रन, सर्च फॉर शेल्टर यू फूल! व्हेयरीज युवर ट्रेंच रन?... ... एयरमन चेक पोस्ट पार करून शटरवर फुली मारली तेवढ्यात मागून शिटी वाजली. दोन जण धावले मी पटकन एका आडोशाला गेलो. ‘किसने लगाया ये क्रॉस? तुम क्या कर रहे थे? ये गया ना बॉम्ब के धमाकेसे! ...’ म्हणताना ऐकत होतो. ... कडकडून थंडी वाजल्याप्रमाणे मला कंप सुटला होता. ‘आता काय एक्शन घेतली जाणार याची कटू सुनावणी ऐकायला मला भिती वाटायला लागली!’ ... पंधरा दिवसापुर्वी पहिल्या भेटीतील पुसटशी ओळख झालेला एओसी राक्षसाप्रमाणे वाटत होता.’
तेवढ्यात ‘यू, व्हाट इज युवर नेम?

कुटुंबसंस्थेचे चालन

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 27/06/2014 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते असं कोणी म्हणालं. यावर विचार केला असता असे जाणवले कि, एतत्सम विचार करणार्‍या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे. हे पुरुषप्राधान्य पुरुष वा स्त्रीया कोणीही (आपल्या स्वार्थासाठी वा आंधळेपणाने आपल्या अहितासाठी) राबवू शकत असू शकते. उदा. पुरुषप्रधान स्त्री आपल्या पतीचे आडनाव स्वतःला लावायचा आग्रह धरू शकते. पतीने कमवावे व सर्वात मोठी रिस्क त्याने घ्यावी, तिचा (रिस्कचा) माझा संबंध नाही असे ती मानत असू शकते. तसेच पुरुषप्रधान पुरुष माझ्या बहिणीचे लग्न मीच लावून देणार म्हणून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ शकतो.

नारकोन्डम बेट

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 27/06/2014 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
नारकोन्डम बेट -- हे अंदमान बेट समूहातील सर्वात दूर आणि पूर्वेकडे असलेले एक छोटेसे बेट आहे. पहा http://en.wikipedia.org/wiki/Narcondam_Island#mediaviewer/File:Narconda… हे बेट एका मृत किंवा निद्रिस्त ज्वालामुखीच्या शिखरामुळे तयार झालेले असून उत्तर अंदमान च्या बेटांपासून ते ११४ किमी दूर आहे. या बेटाला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. हे पूर्वेच्या समुद्रात या आगामी लेखमालेतील एक पुष्प असून लेखमाला येत्या काही दिवसात लिहिण्याचा विचार आहे.

अविस्मरणीय ग्रीस - भाग २ - अथेन्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 27/06/2014 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय ग्रीस - प्रस्तावना अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स . सकाळी उठून, नाश्ता करून आम्ही हॉटेल खालूनचं टॅक्सी पकडली आणि अरिस्तेप्पू स्ट्रीटवरच्या लायकाबेट्टस टेलेफेरीकला पोहोचलो. टेलेफेरीक ही एक केबल रेल्वे आहे जी तुम्हाला डोंगरमाथ्यावर घेऊन जाते. ह्याला फनीक्युलर रेल्वे असे ही म्हटले जाते.

दुनिया किसीके प्यारमे जन्नतसे कम नही

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 27/06/2014 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या हृदयात फक्त एक दिलरुबा हवी, मग स्वर्ग आकाशाच्या पलिकडे नाही. तुमचं रोजचं आयुष्यच जन्नत आहे. तुमची दिलरुबाच तुमची परी आहे. फक्त नज़रिया बदलायचा अवकाश, एखादीनं तुम्हाला मोहवण्याचा अवकाश आहे. सम्राट अकबर, युवराज सलीमला विचारतो, ‘या नाचिज़ अनारकलीत तू असं काय पाहिलंस’? अकबराला वाटतं, युवराजाच्या मेहेर नज़रेची आस असणार्‍या, सल्तनतेत इतक्या लावण्यवती आहेत की त्याचं मन बदलणं अवघड नाही. आणि सलीम अकबराला कमालीचं दिलकष उत्तर देतो, ‘जहांपनाह, अनारकलीको देखनेके लिए तो सलीमकी नज़र चाहीए’. तुमची दिलरुबा दुनियेसाठी काय आहे यानं काही फरक पडत नाही.

एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 26/06/2014 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात.