Skip to main content

कृतार्थ !..... एक भयकथा !

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 03/07/2014 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
रुचिता चपलेचा तुटलेला बंद पायाच्या अंगठ्यात आणि त्याच्या शेजारच्या बोटात घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत तशीच फरपटत चालत होती. ‘आत्ता जवळ मोबाईल असायला हवा होता...कोणालातरी घ्यायला तरी बोलावलं असतं. आता मेन रोड पर्यंत चालत जाव लागणार ! मग तिथे रिक्षा मिळेलच....’ कपाळावर आठ्या आणत ती स्वतःशीच पुटपुटत होती. शेजारून एखाद वाहन जाईल, आणि आपण लिफ्ट घेऊन घरी जाऊ ; अस स्वप्नरंजन करत तिने जवळ-जवळ अर्धा रस्ता पायीच पूर्ण केला होता. पण दुर्दैव म्हणजे एकही गाडी या रस्त्यावरून गेली नव्हती. खरेतर, इतक्या रात्री अश्या या आड रस्त्यावरून कोण कशाला प्रवास करेल ?

माउलींच्या पालखी सोबत एक दिवस :- भाग २

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 03/07/2014 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
माउलींच्या पालखी बरोबर एक दिवस - भाग १ साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला| ठायीच मुरला अनुभव|| कापुराच्या वाती उजळली ज्योती| ठायीची समाप्ती झाली जैसी|| मोक्षरेखे आला भाग्ये विनाटला| साधूंचा अंकीला हरिभक्त|| ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी| हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी|| फोटो क्र. ३१ फोटो क्र. ३१ या वारीत अनेक बलुतेदारसुध्दा सामिल झाले होते.

कहां गये वो लोग?--आजीबाई

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/07/2014 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन काल का नाही आलीस गे आजीबाई? येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती? तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची.

कहां गये वो लोग?--बाबूकाका

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/07/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे. लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 02/07/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.

'चर्निंग ऑफ द सिटी' (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी बुधवार, 02/07/2014 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!) ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली? आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे. ‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे.

ट्रफिक जाम

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 02/07/2014 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.

"माझी गझल निराळी" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 01/07/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक : ०१-०७-२०१४

"माझी गझल निराळी" : दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा