जडण-घडण...5
गिरगावातल्या सेवासदन अध्यापिका विद्यालयातली ती दोन वर्षं कमाल होती. शाळेच्या सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर खूप काळाने मनाजोगा कंपू भेटला होता. हो, आता कंपू ची जाणीव होऊ लागली होती. घरापासून अंधेरी स्टेशनपर्यंत बस, तिथून २ नं. प्लॅटफॉर्मवरून सकाळी ८.५७ ची चर्चगेट स्लो लोकल. रेल्वेच्या नियमित प्रवासाचा पहिला अनुभव, तिथे पाच जणींचा एक कंपू. मग विद्यालयात आमचा १० जणींचा मोठ्ठा कंपू. पूर्ण वेळ अभ्यासक्रम, म्हणजे अख्खा दिवस आम्ही सगळ्या सोबत असायचो. पूर्ण वेळ साडी नेसणं अनिवार्य. सवय नसल्यामुळे सुरूवातीला काही मुली विद्यालयात जाऊन कपडे बदलून साडी नेसायच्या, मग हळू-हळू सरावल्या.
अच्छे बिन आने वाले है, लेकिन अच्छे बिन, महंगे होते है !
वेताळाच्या बेताल बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजा विक्रमादित्य भराभरा रेशमाच्या बागेकडे चालू लागला. वेताळाने राजाला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली..
ओसाडवाडीच्या पंचवार्षिक जत्रेत, सकाळी सकाळी अंबादास बाळाजी मानव (अं.बा.मानव) , सर्व दुकानात, त्याला हवे असलेलं डस्टबिन शोधात होता, साध्याच डस्टबिन दिवसेंदिवस खराब होत चालले होत. खिशात फक्त ऐक रुपयाच होता. तोच ऐका दुकानदाराने त्याला हटकल्यावर थांबला.
दुकानदार: केम भाया, सु आपु तमे ? काय देऊ तुला ?
अं.बा.मानव: चांगले बिन शोधत व्हतो हो, हल्लीच खराब झालं आहे माझं बिन. ऐकुलता ऐक रुपया हाय माझ्याकड.
सेलिब्रेटी येती घरा
नमस्कार मंडळी ,
हा उतारा लिहायचं कारण म्हणजे परवा आमच्या घरी एक मराठी नावाजलेले कवी आले होते आणि तो अनुभव मला लिहावासा वाटला .
माझ्या नवऱ्याच्या मित्राचे सासरे येणार एवढाच मला निरोप होता .ते घरी यायच्या आधी ५ मिनिट अहोंनी सांगितला कवी आहेत त्यांचे बरेच ब्लोग्स वगेरे आहेत . एक तर मला त्यांचा नाव माहित नव्हता आणि माझा नवरा गूगल कर त्यांना म्हणाला. मी त्याला नाव विचारला तर त्याचं नाव शोधण्यात त्याचा १ मिनिट गेला गूगल करून त्यांचा एक एपिसोड बघावा इतक्यात त्यांची गाडी पार्किंग मध्ये आली . माझा नवरा त्यांच्या स्वागतासाठी गेला. त्यांना घरी घेऊन आला .
मला पडलेले काही प्रश्न -
मला पडलेले काही प्रश्न -
१) जर शेतजमिनीचे तुकडे करून (गुंठा) विकणे अनधिकृत आहे तर मग रजिस्ट्रेशन करताना सर्वे नंबर वरून समजत नाही का?
२) ग्रामपंचायत हद्दीमधील घरांचे रजिस्ट्रेशन करताना काहीच check नाही का ?
३) अश्या अनधिकृत शेतजमीन आणि घराचे सगळ्या दैनिकांमध्ये भरपूर जाहिराती असतात तरी त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही ?
४) हीच परिस्तिथी अनधिकृत मसाज पार्लरची आहे? त्यांकडे सरकारचे लक्ष कसे जात नाही?
माझ्या मते या सगळ्यावर निर्बंध आणणे शक्य आहे. आपले काय मत आहे?
माझ्या काही शंका
माझ्या रिकाम्या डोक्यात(म्हणजे रिंगणात) कधीकधी काही शब्दांची,अक्षरांची झटापट,मारामारी (आणि मरामरी सुद्धा)चालू असते.
नवरा आणि नवरी हे शब्द इतके मारामारी करतात की त्यांची घटस्पोट घेण्यापर्यंत मजल जाते.
आता पहा ना,
नवरा म्हणजे न-वरा म्हणजेच ज्याला न वरावा असा.
नवरी म्हणजे न-वरी म्हणजेच त्याला न वरणारी.
पण प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांना वरतात
नंतर मात्र या वरण्यावरून (आणि वरणावरून सुद्धा) भांडत बसतात.
काही अक्षरे आपल्या मृत्युमधून लिंग भेद दाखवतात.
जसे
च_मेली (स्त्री लिंग)------------चमेली
घ _मेलं (नपुसंक लिंग)--------घमेलं
झ_मेला (पुल्लिंग)-------------झमेला
अगदी
ऑरेंज चीली आईसक्रिम
कहां गये वो लोग?--संज्या
कहां गये वो लोग?--बाबूकाका
कहां गये वो लोग?--आजीबाई
कहां गये वो लोग?--नाथा
कहां गये वो लोग?--मंग्या
कॉलेज सुरु होउन काही दिवस झाले होते.पावसाने चांगलाच जोर धरला होता.अशातच एका वीकेंडला ट्रेकला जायची टूम निघाली.ट्रेकिंगविषयी तशी फारशी माहीती कुणालाच नव्हती.कर्जत,पनवेल,
पुराणातली वांगी
पुराणातली वांगी असा एक वाक्प्रचार बरेचदा ऐकण्यात आला. मराठीतले बहुतेक वाक्प्रचार अर्थपूर्ण आहेत. खरं तर सगळेच, पण काहींचे अर्थ मलाच माहिती नाहीत. आता पुराणातली वांगी याचा काय बरं अर्थ असेल, असा प्रश्न बरेच दिवस पडला होता. अलीकडेच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. मूळ वाक्प्रचार पुराणातली वानगी असा आहे म्हणे. म्हणजे आपण म्हणतो ना, वानगीदाखल (उदाहरणार्थ), तसं...
असे आणखी काही वाक्प्रचार अर्थासह समजून घ्यायला आवडतील...
मिसळपाव
बोला! पुंडलिका वरदे हरी विठ्ठल...!!