Skip to main content

गुप्त भिमाशंकर नेचर ट्रेल

लेखक नांदेडीअन यांनी शनिवार, 12/07/2014 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
शेकरूने यावेळीसुद्धा दगा दिला. अगदी ५० फुटांपेक्षाही जवळून आवाज येत होता, पण दर्शन मात्र झाले नाही.

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 11/07/2014 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक उदासीचा महौल, बहादुरशा जफ़रचा सिद्धहस्त कलाम, आणि मेहदी हसन साहेबांची पेशकश! नकोनकोशी वाटणारी उदासी देखिल किती कलात्मकपणे मांडता येते, याची कमाल म्हणजे ही ग़ज़ल. पावसाळी कुंद हवेत या ग़ज़लची जादू असा काही रंग घेते की इन्शाल्ला, आपण नि:शब्द होऊन जातो! संदीप म्हणतो : बरा बोलता बोलता स्तब्द्ध होतो, कशी शांतता शून्य, शब्दात येते. आताशा असे हे मला काय होते कुण्या काळचे पाणी डोळ्यांत येते । ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, बोलणं मुश्कील झालं असतांना, ते शब्दात उतरवणं, ही उस्ताद बहादुरशा ज़फ़रची कमाल.

'विठोबा'

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 11/07/2014 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा जन्मभर होतीच आषाढी, विठोबा मोजली कोणी अशी ही पापपुण्ये चांगला तू आण मापारी, विठोबा पारखोनी घे जरासे भक्त आता हे तुला विकतील व्यापारी, विठोबा शेवटी आलास ना गोत्यात तूही माणसे असतात थापाडी, विठोबा सोड गाभारा, अता घे वीट हाती झोड जी झोडायची माथी, विठोबा देहभर पाण्यात तरला जन्म देवा तू खरा निष्णात नावाडी, विठोबा ! डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

गरुडघरटे

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 11/07/2014 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी भ्रमणमंडळ जेव्हा बेरेष्टेसगार्टनला गेले होते तेव्हा खराब हवेमुळे इगल्सनेस्ट ला भेट द्यायची राहिली होती, नंतर जेव्हा जेव्हा त्या भागात गेलो तेव्हा मुद्दाम केहलष्टाइनहाउस ला जाऊन आलो..) ओबेरसाल्झबुर्ग आणि बेरेष्टेसगार्टन! पृथ्वीवरच्या स्वर्गातील एक बाग जणू.. ह्याच ओबेरसाल्झबुर्ग मध्ये केहलष्टाइन हाउसच्या पायथ्याशी लपले आहेत हिटलरचे बंकर्स.. तेथे परत जाउन नव्याने उमगल्या काही गोष्टी..

मनमोहक बाली : ०९ : महानाट्य बाली अगुंग आणि इतर काही थोडेसे... इकडचे-तिकडचे (समाप्त)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 10/07/2014 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

दांभिक

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 10/07/2014 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
फारच कंटाळा आल्याने ही एक जिलबी पाडण्याची खुमखुमी आली आहे ...

स्वप्नातली ती

लेखक चैतू यांनी गुरुवार, 10/07/2014 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गातून अवतरली तु, जणु मदनाची रती, लावण्यवती परी तु, पाहताक्षणी गुंग झाली मती तु येताच पक्षी, गातात स्वागतगीते, दवावरून चालते तु, तेव्हा गवतही शहारते केसांशी खेळत जेव्हा, वारा तुला झोंबी घालतो, मनातल्या मनात तेव्हा, त्याचाही हेवा वाटतो शृंगारासाठी तु एक, टवटवीत गूलाब हाती घेतला, पण सौँदर्य तुझे पाहुन, बिचारा गूलाबही लाजला तु जिथे ठेवते पाऊल, तिथे धरणीलाही प्रेमांकुर फूटतो, आणि तुझ्या बागडण्याने, प्रेमाचा सुगंध दरवळतो चिँब पावसात भिजताना, तु बेधुंद झाली, आणि तुझ्यासमवेत नशा, मलाही चढत गेली दाट धुक्याला लपेटून, हरवून गेली कुठे, वेडे फक्त स्वप्नातच येते, भेटायला सांग येशील कुठे
काव्यरस

अर्थसंकल्प-२०१४

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 10/07/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्री.अरुण जेटली संसदेत बजेट सादर करत आहे . अर्थसंकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा !!

चित्रवीणा

लेखक मितान यांनी गुरुवार, 10/07/2014 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
बोरकरांच्या कविता नेमक्या कधीपासून वाचायला लागले ते आठवत नाही. त्या वाचलेल्या कविता कधीपासून उमगायला लागल्या ते ही सांगता येत नाही. परवा अचानक बोरकरांची कविता पुन्हा भेटली. ८ जुलै हा बोरकरांचा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने काही बोरकरप्रेमी मित्रांनी त्यांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम ठरवला. त्यात मलाही बोरकरांच्या कविता वाचायला बोलावलं आणि हेच निमित्त झालं पुन्हा कविता शोधायला. कवितांचे २ खंड, समीक्षेची पुस्तकं, नक्षत्रांचे देणे आणि मुख्य म्हणजे पु लं आणि सुनिताबाईनी बोरकरांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले त्याचे भाग एवढं सगळं जमा झालं. एकेक कविता वाचायला घेतली.

निवांत

लेखक भृशुंडी यांनी गुरुवार, 10/07/2014 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
खच्चून भरलेल्या लोकलमागे रिकाम्या लोकलची वाट न बघणार्या लोकांसाठी ही गोष्ट नाहीये. बागेत जाउन उगाच तास दीडतास बसणं ज्यांना शि़क्षा वाटते त्या लोकांसाठीपण ही गोष्ट नाहीये. तासन्तास चहाच्या कपाच्या कडेवर एकच माशी घोंघावताना बघण्याची कल्पनाच ज्यांना भयानक वाटते अशा लोकांसाठीसुद्धा ही गोष्ट नाहिये. ==== तर १९९० सालची गोष्ट. खरं तर असलं काही सांगायची गरज नाही, पण एक गोष्टीचा फील येतो. तर डिसेंबर महिन्याची सकाळ होती. नाही, दुपार. बहुतेक ३ वाजले होते. म्हणजे संध्याकाळच म्हणा ना. अस्सल चहाबाजांची ३रा चहा घ्यायची वेळ. दुकानावर गरदी नव्हती.