Skip to main content

राधा

लेखक दिपक विठ्ठल ठुबे यांनी सोमवार, 01/12/2014 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
या शब्दांना दे, सुर तुझे संगीत दरवळू दे गीत, स्वरांच्या लाटेवर जणू दिवाणी राधा, शोधिते कान्हा होऊनी बावरी, प्रीतीच्या वाटेवर || धृ || दाटले मेघ अन तरी लालिमा क्षितिजी मनी भावनांची दाटी अन एकांताची भीतीहि तू समीप येऊन नेत्रांतून बस हृदयी ध्वनी कानी अन, नाव बसू दे तुझेच या ओठांवर || १ || तू श्वास तुझी मज आस अन तुझा ध्यास घेतला मनी... सर्वस्व आणि हे स्वत्व पाचही तत्व वाहते, मी तुझ्या चरणी.. मी शरण सोडूनी मरण आजही जगण्याचीही आस मनी ना उरली || 2 ||

"अर्थ"

लेखक दिपक विठ्ठल ठुबे यांनी सोमवार, 01/12/2014 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांत गुंफले मी हळुवार जाणिवांना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..||धृ|| मज स्मरणात आज ही रे ती संध्या भारलेली संग लाभला तुझा अन काय माझी मोहरली जणू चैत्र वणवा विझावा वळवाच्या सरींनी भिजताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना.. ||१|| हे बंध जे जगाचे पायात घोळणारे माझी अबोल प्रीती जणू भिन्न दोन्ही किनारे दिसतो तुझाच चेहरा माझे प्रतिबिंब पाहताना स्पर्शून अर्थ दे तू माझ्या मुक्या भावनांना..
काव्यरस

बाटली आणि ग्लास

लेखक प्रमोद देर्देकर यांनी सोमवार, 01/12/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी असते बंद कॉर्कने बांधलेली, टेबलावर तोर्‍यात एकटी, तु मात्र मोकळा ढाकळा, पण भाऊबंधांसोबत रांगेतला गडी, मी तुझ्यातच रिक्त होते, कधी स्मॉलने तर कधी लार्जने , तु मात्र उतरतोस दर्दभर्‍या गळ्यात, घुटक्या घुटक्याने, मी असते संपृक्त, विविध रंगाने नटलेली नेहमीच नीट, कधी बर्फ, कधी सोड्याने तु मात्र पचपचीSSत , कधी क्रिस्टील, कधी प्लास्टिक, कधी धातु. काय तुझे नखरे? बॉटम-अपच्या नादात विसरतात तुला सगळे हेच सत्य खरे, हेच सत्य खरे.

प्रसंग - नळ दुरुस्ती

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 01/12/2014 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन ठिकाणी राहायला आलो होतो, नेहमीची आवरा-आवरी, केर काढणे, वस्तू जागेवर लावणे, दुध , वर्तमानपत्र वाल्याची चौकशी करणे अशी कामे करत होतो. हात-पाय धुवायला गेलो तर नळ गच्च बसला होता, आता पंचाईत झाली. बाजूला फरशीपासून कमी उंचीवर छोटा नळ होता; तात्पुरते काम भागले, पण मुख्य नळ दुरुस्त करणे गरजेचे होते. अंधार पडायला लागला होता, बाहेर पडलो सुरक्षा रक्षकाकडून नळ दुरुस्त करणाऱ्या प्लंबरचा मोबाईल क्रमांक घेतला ; त्याचे नाव नंदू. कल्पना नव्हती मला… असा विलक्षण संवाद झाला… वेळ संध्याकाळी ७ ची .

एका नव्या इतिहासाची सुरुवात -४

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 01/12/2014 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१ एका नव्या इतिहासाची सुरुवात -२ एका नव्या इतिहासाची सुरुवात -३ शांतन्यला अर्थातच सर्व काही सांगणे शक्य नव्हते. सांगूनही त्याचा विश्वास बसला असता का, शंकाच होती. सात दिवस ! सात दिवसात तयारी करायची होती ! जन्मोजन्मीचा निरोप घ्यायचा होता. तिच्या शोकाला पारावारच नव्हता. आजवर त्याच्या संगतीत घालवलेले अतीव सुखाचे क्षण तिच्या अंतरात, वादळात विखुरलेल्या पानांप्रमाणे भिरभिरत होते.

एनिग्मा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 01/12/2014 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
Good Evening! This... is the voice of Enigma In the next hour we will take you with us into another world, into the world of music, spirit and meditation Turn off the light, take a deep breath and relax start to move slowly, very slowly Let the rhythm be your guiding light हे शब्द ऐकले... तेंव्हाच्या भाबडेपणामुळे असेल कदाचित, पण मी खरंच डोळे मिटले, आणि लगेच पुढच्या 'सॅडनेस' या गाण्याचा तो युनीक ठेका सुरू झाला. मागे सिन्थेसायझरच्या कॉर्ड्स वाजत होत्या. सर सर सर हातावरचे केस उभे राहिले आणि तत्क्षणापासून 'एनिग्मा' चा मी वेडा झालो.

हाबिणंदण

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 01/12/2014 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/29625 "काण्या तू ? वहिनी कुठाय" या तुझ्या टोकदार प्रश्नानं तु माझ्या पोटाचं मी मोठ्या कष्टाने पट्ट्याने बान्धलेलं गाठोडं टचकन फुटून गेलं, आणि मला (त्या ललने समोर) कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालास.. अभिनंदन!!!

अभिनंदन

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 01/12/2014 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
"कोण तू ? " या तुझ्या टोकदार प्रश्नानं तुझ्या माझ्या क्षणाचं मी मोठ्या कष्टाने बान्धलेलं गाठोडं टचकन फाटून गेलं, आणि मला कफल्लक बनवण्यात तू पुन्हा एकदा यशस्वी झालीस .. अभिनंदन!!!

छावणी - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 01/12/2014 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
छावणी या कादंबरीचा हा अखेरचा भाग. ही कादंबरी प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. हिंदुस्तानची फाळणी ही देशाच्या स्वातंत्र्याची एक भळभळती जखम. आज सत्तर वर्ष होत आली तरीही ही जखम पूर्णपणे भरलेली नाही. फाळणीच्या आगीत जे लोक होरपळले, ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले त्यांना आयुष्यभर तो कालखंड एखाद्या दु:स्वप्नासारखा आठवत राहीला. त्यापैकी बहुतेकजण आज हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेले अनुभव आजही अंगावर काटा आणतात.

अंधार क्षण भाग ४ - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की (लेख १५)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 01/12/2014 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - अलेक्सांद्र मिखाइलोव्हस्की इतिहासाच्या कोणत्याही अभ्यासकाला हे माहीत असतं की आपली भूतकाळाकडे बघण्याची दृष्टी ही सतत बदलत असते. घटनांचे नवीन अर्थ लावले जातात, त्यांच्या जुन्या अर्थांमध्ये सुधारणा केल्या जातात, आक्षेप घेतले जातात. अनेक आदराची स्थानं धुळीला मिळतात, नवीन आदरस्थानं शोधली जातात. कुठलाही इतिहासकार हा भूतकाळाचे दस्तऐवज आणि साक्षीदार यांच्या आधारानेच घटनाक्रमाची निश्चिती करत असतो. जर हे साक्षीदार किंवा दस्तऐवज उपलब्धच झाले नाहीत तर इतिहासलेखनावर साहजिकच मर्यादा येतात. याचं एक बोलकं उदाहरण म्हणजे सोविएत युनियन. १९९१ मध्ये सोविएत युनियन संपुष्टात आलं.