Skip to main content

एक जोरदार मिपाकट्टा करू या का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 25/12/2014 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता. त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते. "मिपा" हे पण एक आभासी जग आहे. मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो. स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले. तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?

अंधार क्षण भाग ४ - काॅनी सली (लेख २२)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 25/12/2014 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - काॅनी सली काॅनी सलीला भेटण्याची मला खूप इच्छा होती, कारण तिच्यावर जपान्यांकडून झालेल्या अत्याचारांबद्दल ती बोलायला तयार झाली होती. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने पर्ल हार्बरवर बाँबफेक करुन अमेरिकेला युद्धात ओढलं. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि नेदरलँडस् ह्या प्रशांत महासागरातल्या दोन सागरी सत्ता होत्या. त्यांना नेस्तशब्दकरणं ही जपानची पुढची खेळी होती. त्यामुळे जपानने डच ईस्ट इंडीज म्हणजे आजचा इंडोनेशिया आणि हाँगकाँग यावर एकाच वेळी हल्ला चढवला आणि १९४१ च्या शेवटापर्यंत हे भाग आपल्या टाचेखाली आणले. त्यावेळी हाँगकाँगमधल्या जनतेवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले.

होउ दे श्वास मोकळा

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 24/12/2014 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;) आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809 ------------------------------------------------------------------------------- जगने न तुज्य(कृपे)विना , का रडवतो तू मला, गेला कोंडून तू मजला, जणू श्वास माझा गेला, ये ना परत दाराकडे, कुंथणे आता मुश्किल झाले, नाक माझे हिरमुसले, कससचं म्हणुन बसून राहिले, "ब"

अटलजींना भारतरत्न

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 24/12/2014 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न दिल्याचे आजच जाहिर झाले आहे.काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कुठलाही पुरस्कार देऊन त्या व्यक्तींचा नव्हे तर त्या पुरस्काराचा सन्मान वाढवला जातो. अटलजींना भारतरत्न देऊन भारतरत्न पुरस्काराचा सन्मान अशा प्रकारेच वाढवला गेला आहे अशीच भावना बहुसंख्यांची असणार याविषयी शंका नाही.

Happy new year!!!

लेखक Maheshswami यांनी बुधवार, 24/12/2014 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
बारमध्ये, परमिट रूम मध्ये, लाईट्स जमेल तेवढ्या मंद करून काळाकुट्ट अंधार करून ठेवण्याचे काय प्रयोजन असेल, हा मला नेहमी सतवणारा प्रश्न आहे. दारू पिणे काही गुन्हा आहे काय कि सगळ्यांच्या नजरा चुकवत अंधारात लपून करावा? गेल्या दहा मिनिटात वेटरचे "हेल्लो , शूक शूक " करून लक्ष वेधून घेण्याचा माझा दहावा प्रयत्न या अंधाराने हाणून पाडला होता. शेवटी, जोरात ओरडून बोलावल्यावर तो धावत पळत टेबलाकडे आला . मी तोंड उघडायच्या आधीच माहितीवजा धमकी दिली त्याने . "साब, और कुछ मंगानेका रहेंगा , तो अब्भीच बोलो . कल कि थरटी फष्ट की तैय्यारी के वास्ते बार आज जल्दी बंद होएंगा .

असं का?

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी बुधवार, 24/12/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅडमिनना विनंती. ह्या लेखामधे काही आ़क्षेपार्ह गोष्टींचा उल्लेख केला जाणार आहे. जर आपल्या नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवुन लावावी. मी एक मुलगा असल्यानी मी माझ्या दृष्टीकोनामधुन हा लेख लिहिला आहे. कदाचित वाईस व्हर्सा अनुभव मुलींनाही येत असेल.
३-४ दिवसापुर्वी बस नी प्रवास करायला लागला. माझ्या शेजारी एक जेमतेम २०-२१ वर्षाचा म्हणजे माझ्यापे़क्षा ५-६ वर्षानी लहान कॉलेजकुमार बसला होता. फोनवर मित्राशी आपल्या सो कॉल्ड "प्रेमप्रकरणाबद्द्ल" गप्पा चालल्या होत्या.

पटलं तर व्हय म्हणा ! !

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 24/12/2014 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कोल्हापूरकडे एक भारी म्हण आहे, ‘पटलं तर व्हय म्हणा, न्हाईतर सोडा !’ कालचा प्रसंग. एका परिचितांच्या घरी गेले होते. मुलीच्या शाळेची वेळ. रिक्षावाला दारात थांबून हॉर्न वाजत होता. गृहपाठाचं पुस्तक सापडत नव्हतं. मुलगी युनिफॉर्म घालून पळापळ करतेय आणि बाबा आरडओरडा. आई गोंधळलेली. बाबा : असं कसं सापडत नाही ? सापडलंच पाहिजे. आई : अहो, शाळेला उशीर होतोय, जाऊदे तिला. उद्या दाखवेल गृहपाठ. बाबा : केलाय ना खपून काल ? मग न घेता का जायचं ? तूही शोध. सापडल्याशिवाय जायचं नाही ! आता आईपण शोधू लागली. मुलगी : ‘बाबा, राहूदे, ना, मी सांगते शाळेत, उद्या देईन म्हणून.’ पण बाबा ठाम.

अभिनंदन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 24/12/2014 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मालवीय, वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ आज महामहीम राष्ट्रपति प्रणव मुखर्जी ह्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय ह्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला . :) अटलजींच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या ... जगाचा विरोध धुडकावुन केलेली पोखरण अणु चाचणी , दिल्ली लाहोर साठी सुरु केलेली बस , पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसुन सुरु केलेले कारगिल युध्द , तिथे आपल्या सैन्याने परत एकदा त्यांना चारीमुंड्याचीत करुन मिळवलेला विजय ...

अफलातून धंदे

लेखक रमेश भिडे यांनी बुधवार, 24/12/2014 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच भारत भेटीमध्ये एका मित्राने काही किस्से सांगितले. मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही : १) काही लोक अमेरिकेत ट्रस्ट चालवतात आणि अमेरिकेतून वापरलेले कपडे हिंदुस्तानात गरीब लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात (विना मुल्य आणि विना इम्पोर्ट ड्युटी) आणि मुंबईत रस्त्यावर `स्वस्त कपडे' म्हणून विकतात. २) काल एक माणूस ऑफिस मध्ये आला होता. माझ्या गाडीचा एक्सिडेंट राजेस्थानला झाला, ड्रायवर पळून गेलाय. म्हणून दुसऱ्या एका ड्रायवरला राजेस्थानच्या एका गावात पोलिस स्टेशन मध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातोय, साला १०००० मागतोय, कारण १ दिवस जेल मध्ये बसावे लागेल.

मला मिपा का आवडते? उर्फ माझी पण नर्मदा परीक्रमा....

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 24/12/2014 05:26 या दिवशी प्रकाशित केले.
यानबूला येण्यापुर्वी, काहीतरी वाचायला हवे म्हणून, जगन्नाथ कुंटे ह्यांची पुस्तके आणली.ती वाचून मला पण नर्मदा परीक्रमा करण्याची इच्छा झाली.मुळात माझा पिंड अध्यात्मिक.पण वेगळा.आमची मुंज पण वेगळी आणि आमचे सत्यनारायण पण वेगळे. मुद्दाम नर्मदाच्या परीक्रमेला कदाचित जाईनही.पण माझ्यासाठी म्हणून देवाने काहीतरी वेगळी व्यवस्था केली असेलच की, विचार करता करता जाणवले की, यस्स्स्स्स्स...माझी नर्मदाच वेगळी. मुळातच माझा स्वभाव स्वच्छंदी आणि बहूदा त्यामुळेच एककल्ली.आंतरजालावर इकडे-तिकडे भटकट असतांना, मराठी संकेत-स्थळांचा शोध लागला.