अंधार क्षण भाग ५ - व्लादिमीर ओग्रिझ्को (लेख २५)
अंधार क्षण - व्लादिमीर ओग्रिझ्को
जर मला आज कोणी विचारलं की १९३९ ते १९४५ हा जो दुस-या महायुद्धाचा संपूर्ण कालखंड आहे त्यातला सर्वात महत्वाचा आणि निर्णायक असा दिवस निवड, तर मी सर्वांना माहीत असलेले दिवस - उदाहरणार्थ ३ सप्टेंबर १९३९, जेव्हा ब्रिटन आणि फ्रान्स यांनी पोलंडवर जर्मनीने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारलं; किंवा ७ डिसेंबर १९४१, जेव्हा जपानने पर्ल हार्बरवर आकस्मिक रीत्या बाँबहल्ला करुन युद्धाला ख-या अर्थाने जागतिक बनवलं; किंवा २२ जून १९४१, जेव्हा जर्मनीने सोविएत रशियावर जगातला सर्वात मोठा आक्रमक हल्ला चढवला - निवडणार नाही.
इनवेस्टमेंट
नमस्कार मित्रानो.
मला इनवेस्टमेंट .संदर्भात माहिती हवी आहे ती पण मराठीत कारणकी माझया मते सर्व साधारण मराठी कुटुंबात या बद्दल खूप कमी माहिती आहे ती सर्व सामान्य माणसाना कलावी या साठी हा धागा उघडला आहे म्हणून यावर लवकरात लवकर प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती.
गुंतवणूक हा एक अतिशय संवेदनशील विषय असल्याने यावर नकीच मिसळ पाव वर चर्चा होणे आपेखित आहे.
यात गुंतवणुकीचे प्रकार, त्यातील वैविध्या उदा. लिक्विड फंड, शेर मार्केट, डेट फंड, कॅपिटल फंड, बॉन्ड्स, म्यूचुयल फंड, एट्सेटरा.
पूर्वेच्या समुद्रात-४
पूर्वेच्या समुद्रात-४
बेयपूर या ठाण्याकडून आम्ही निघालो आणि कोचीकडे कूच केले. समुद्र खवळलेला होताच. पण रोज मरे त्याला कोण रडे या न्यायाने सर्व जण त्याकडे दुर्लक्ष करत होते. हे म्हणजे एखादे आक्रस्ताळे दुसर्याचे मुल रडून तुम्हाला त्रास देत असेल तरी तुम्ही काहीही करू शकत नाही तेंव्हा त्याकडे दुर्लक्ष करायला शिकता तसे.
काही काळाने कोचीचे बंदर दिसू लागले. तेथे समुद्र कायमच अतिशय खवळलेला असतो. तेंव्हा त्या डचमळणार्या समुद्रातून कोचीच्या संथ पाणी असलेल्या कालव्यात (बैक वाटर) शिरली तेंव्हा जोराच्या पावसात आपली गाडी एकदम बोगद्यात शिरते तेंव्हा कसे एकदम आवाज बंद होऊन शांत वाटते तसे वाटू लागले.
स्पर्श आंधळे ,गंध आंधळे भोवताली वनराई ग............
काल office मध्ये बसलो होतो ,अचानक whatsapp आला . requirement of writer tomorrow for visually challenged student .
मी reply केला ,आवश्यक माहिती घेतली आणि confirmation देऊन टाकल थोडी धाकधूक होती कि जमेल काय म्हणून . एकतर बरीच वर्ष झाली होती, लिहायची अशी सवय राहिली नव्हती . whatsapp वर notification आले मी check केलं ,ज्याची exam द्यायची त्याचा contact number आला होता .तन्मय नाव त्याच
मी number डायल केला स्वतःची ओळख करून दिली , विचारलं कि कुठे भेटायचं ?
तन्मय :- तुला कॉलेज माहित आहे .
मी :- नाही कधी गेलो नाही तिथे
तन्मय :- ok . तू घाबरू नकोस ,मी guide करेन तुला ,तू स्टेशनला भेट .
ठाण्याचे नवे मेतकूट हॉटेल - एक वाईट अनुभव
आज सकाळी आम्ही एकुण ८ कुटुंबियांनी दुपारी जेवायला नव्याने सुरू झालेल्या व वॉसप वर प्रचार झालेल्या 'मेतकूट' या मराठमोळ्या उपाहारगृहात जाण्याचे ठरवले. रविवार आहे हे लक्षात घेता आरक्षणासाठी संपर्क साधला तेव्हा दुपारी १२.३० ते १.४५ या वेळत उपाहारगृह पूर्णतः आरक्षित झाले असल्याचे समजले. आम्ही ८ जणांसाठी दुपारी २ वाजताची चौकशी केली व फोनवर श्री सनी पावसकर यांनी आमची वेळ निश्चित केली.
दुपारी १.५५ ला आम्ही पोचलो असता बाहेर बरेच लोक ताटकळताना दिसले. आरक्षण आगाउच केल्याने आम्ही निर्धास्त होतो. आत शिरताच मी नाव व आरक्षणाविषयी सांगताच व्यवस्थापकाने आवंढा गिळला.
एक गोपनिय कट्टा.
राम राम मंडळी, मिपाचे लोक कुठे गप्पा मारत बसतील याची काय ग्यारंटी नै. असेच रमत गमत काही मंडळी वेरुळला येऊन गेली. मलाही काही मिपाकरांना भेटायला नेहमी आवडतं. धन्या आणि वल्ली हे माझे मित्रच पण या निमित्ताने मला अतृप्त आत्मा यांना आणि प्रगोला भेटायला मिळालं.
मिपा मराठी डायलॉग......
मध्यंतरी जालावरती ऐक पिंक टाकलेली पहिली, गमतीशीर वाटली. इंग्रजी चित्रपटांचे जगप्रसिद्ध डायलॉगस गुजरातीत भाषांतरित केल्यास, किती मनोरंजक होतात हे जाणवले, इथे व्याकरण, भाषांतराचे नियम, वैगरे गद्य गोष्टींना स्थान न देत, केवळ मनोरंजनात्मक हेतू ठेवून, पडलेल्या जिलब्या होत्या. त्याच/ तशाच प्रकारे आपण मराठीत हे जगप्रसिद्ध डायलॉगस भाषांतरित केले तर ? मला गुजराती तसूभरही येत नाही, तरीही अंदाजे याचा अर्थ उमगून मजा वाटली. मराठीत हे किंवा असे डायलॉग तयार करताना, व्याकरण/नियम यांचा बागुलबुवा न करता, कोकणी, वऱ्हाडी, नगरी, पुणेरी, कोल्हा/सोला पुरी, ग्रामीण / शहरी मारांग्लीश शब्द वापरून केले, तर ?
किशोरी - २०१५
किशोरी - २०१४
खरे तर जेमतेम १ वर्षांपूर्वी झालेली भेट त्या स्वरांची ...मी लिहून गेलो कि पुढची भेट कधी ठाऊक नाही ...पण आज पुन्हा भेटले ते स्वर ..
आज पार्ले टिळकच्या पटांगणावर सकाळच्या सुखद थंडीत तानपुरे सुरु झाले ... स्टेजवरचे दिवे मालवायला लावले आणि कसलीही नोमतोम वगैरे नं करता माफक आलापीनंतर तोडी सुरु ...
मिसळपाव