Skip to main content

राधा कृष्ण

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 20/01/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
राधा कृष्ण राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतात, राधा केवळ कृष्णाची भक्त होती. कुणी म्हणतात ती केवळ त्याची प्रेयसी होती. पण राधा-कृष्ण हे पती-पत्नी असण्याबद्दल बर्याच शंका-कुशंका आहेत. थोडक्यात काय तर राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती आणि याचे संदर्भ बर्याच ग्रंथात सापडतील. कृष्णाची पत्नी कोण हा प्रश्न समोर आला तर उत्तरादाखल पुढील नावं येतील – रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजित्ति, लक्षणा, कालिन्दि, भद्रा आणि मित्रवृन्दा. तशा कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या. पण कृष्ण-राधा हे पती-पत्नी नव्हते, मग त्यांचं नेमकं नातं काय? ते कितपत योग्य?

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 20/01/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.

भंगार परिक्षणाचे परिक्षण

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 19/01/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
हे असले काही खरडण्याची आमची सोय व्हावी म्हणून मिपा व्यवस्थापनाला अशी जाहीर विनंती करण्यात येत आहे की 'वाचलेले भिकार काही' नावाचे सदर सुरू करावे. मागणी समाप्त. आता उंदरीला ५० पिल्ले झाली, त्यातली ४ भुंकली, १० रेकली आणि २० खोकली तर त्याला गाढव बिचारे काय करणार? आणि चुकून दिलीच मांजरीने अंडी तर काय आता सुपरमॅनचं देऊळ बांधू की डिंकाचे लाडू करू? नाही जमत... कितीही प्रयत्न केला तरी 'पाहावे मनाचे' ह्या सायटीवरील 'लोकमान्य' सिनेमाच्या परिक्षणाइतके असंबद्ध, भिकार आणि गचाळ लिहिणे नाही जमत.

चौघांची गोष्ट !

लेखक मन यांनी सोमवार, 19/01/2015 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
एक कथा काही दिवसांपासून डोक्यात घोळते आहे. नेमकी हव्या त्या फॉर्म्याट मध्ये लिहिता येत नाहिये. जशी आहे तशी ... आहे त्या रुपात इथे सादर करत आहे. **********************कथा सुरु***************************** जुनी आहे एक गोष्ट. झाली असतील काही शे वर्ष. एक होतं गाव. खरं तर ते नव्हतं नुसतं गाव. ते होतं मोठं राजधानीचं गाव. मोठ्ठं गाव. प्रसिद्ध गाव. प्रसिद्ध ठिकाणी वर्दळ.भरपूर प्रवाशी. देषोदेशीचे प्रवाशी. गावंही मोठ्ठं. गावात होते भटजी.मोठ्ठ्या गावातले मोठ्ठे भटजी. पण हे आटपाट नगरातले नव्हते. आटपाट नगरातले म्हंजे "एक होतं आटपाट नगर.

बाभळीच्या काट्यांची उसळ

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 19/01/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
इथे एका पेक्षा एक पाककृती टाकून लोकांना आनंदी करणाऱ्या सगळ्यांची माफी मागून . . हापिसात जात नसलेला वेळ . . आणि आत्ताच खाल्लेल्या तंदुरी चिकन आणि बिर्याणीने पोट भरल्यामुळे कैच्या काय चालणारं डोकं . . याचा हा परिणाम तर . . मंडळी . . बाभळीच्या काट्यांची उसळ :- साहित्य :- १५० - २०० बाभळीचे काटे . . कमीत कमी ३ - ४ इंच लांबीचे (आता हे कुठून मिळवायचे हे तुमचं तुम्ही बघा ) २ वाट्या दही . . जितकं आंबट असेल तितकं चांगलं . . २ - ३ दिवस खाण्याच्या कपाटात दह्याचं भांडं उघडं ठेवलं कि होईल आंबट . . ( खाण्याचं कपाट काय हे समजलं नसेल तर जवळपास च्या "वाड्यात" राहणाऱ्या लोकांना विचारा . .

जडण-घडण १८

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 19/01/2015 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
दारावरची बेल वाजली आणि मी विचारांच्या, आठवणींच्या तंद्रीमधून बाहेर आले, वास्तवात आले. फेरफटका मारायला गेलेले आई-बाबा घरी परतले होते. मी पुन्हा माझ्या कामात गढून गेले. आता सध्या आकाशवाणी आणि शुभेच्छापत्रांसाठी फ्री लान्सींग असं काम सुरू होतं. माझीही भटकंती, अवांतर वाचन आणि अर्थात वर्तमानपत्र वाचन नियमीत सुरू होतं. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची जाहिरात वाचली. खरं तर अध्यापन पेशा सोडून साधारण तीन वर्षं उलटून गेली होती, तरीही प्रयत्न करून बघावा का, असं मनात आलं. मग म्हटलं, करूयाच प्रयत्न. घरी फारशी कल्पना न देताच शाळेत पोहोचले. शाळा मालाडमध्ये. चर्चशी जोडलेली. आधी लेसन झाला.

पिल्लु

लेखक गणेशा यांनी सोमवार, 19/01/2015 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
इवल्याशा डोळ्यातला भाव तो काय ? नभातल्या चांदण्याचा गाव तो हाय पायातल्या छुमछुमचा नाद तो काय ? आनंदाच्या लहरीचा ठेका तो हाय बोबड्या भाषेतले बोल ते काय ? चिऊच्या घरट्यातले हे पिल्लु हाय गोबर्‍या गालातले हास्य ते काय ? बाबांच्या पप्पीचे हे कारण हाय. - शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५
काव्यरस

बूमरँग

लेखक मंदार कात्रे यांनी सोमवार, 19/01/2015 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेश कडे आज सत्यनारायणची पूजा होती. वडिलांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी तीर्थ प्रसादाला गेलो होतो. प्रसाद घेऊन थोडावेळ गप्पा मारीत बसलो होतो. शैलेश चे वडील म्हणाले , आता पोरगा चांगला लाइन ला लागलाय . आता त्याच्यासाठी मुली शोधायला हव्यात . मी होय म्हणालो. शैलेश नुकताच दुबई वरुन परतला होता ,त्यामुळे सगळे आनंदात होते. शैलेश , आमच्या गावातील एक जिगरबाज होतकरू तरुण . गावाची दहीहंडी फोडण्यात दरवर्षी हाच पुढे असायचा .