Skip to main content

बाभळीच्या काट्यांची उसळ

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 19/01/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
इथे एका पेक्षा एक पाककृती टाकून लोकांना आनंदी करणाऱ्या सगळ्यांची माफी मागून . . हापिसात जात नसलेला वेळ . . आणि आत्ताच खाल्लेल्या तंदुरी चिकन आणि बिर्याणीने पोट भरल्यामुळे कैच्या काय चालणारं डोकं . . याचा हा परिणाम तर . . मंडळी . . बाभळीच्या काट्यांची उसळ :- साहित्य :- १५० - २०० बाभळीचे काटे . . कमीत कमी ३ - ४ इंच लांबीचे (आता हे कुठून मिळवायचे हे तुमचं तुम्ही बघा ) २ वाट्या दही . . जितकं आंबट असेल तितकं चांगलं . . २ - ३ दिवस खाण्याच्या कपाटात दह्याचं भांडं उघडं ठेवलं कि होईल आंबट . . ( खाण्याचं कपाट काय हे समजलं नसेल तर जवळपास च्या "वाड्यात" राहणाऱ्या लोकांना विचारा . . सांगतील ते ) ३-४ कांदे . . लहान असतील तर ५-६ घ्या . पाव किलो शेंगाचा कूट ( काट्यात भरण्यासाठी . ) गरम मसाले . तिखट , ३-४ चमचे (हे आपापल्या तिखट खाण्याच्या क्याप्याशिटी वर अवलंबून ) मीठ चवीनुसार . कृती :- काटे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत . गरम असेल तर चांगलं . काटे धुवून झाले कि ते उन्हात वाळू द्यावेत थोडे . इकडून तिकडून उडून आलेली वाळू त्यांना लागू नये म्हणून वरून पण पातळ कापड ठेवलं तरी चालेल . (कापडाच्या चारी कोपऱ्यावर काही तरी जड ठेवायचं विसरू नका . . ) काटे वाळले . कि नाजूक हाताने त्यात उभे काप द्यावेत . आता साहित्यात असलेल्या शेंगाच्या कुटात थोडं तीखट मीठ घालावं . त्याची छान चटणी केलीत तरी चालेल . आता उभ्या चिरलेल्या काट्यात आडव्या हाताने ती चटणी / तिखट मीठ लावलेलं कूट भरावं . आता . जसे भरलेले /किंवा वरून बेसन लावलेले म्हणा, बांगडे गरम तेलात सोडतात (शाकाहारी लोकांनी या जागी कांदा भजी वाचली तरी चालेल) तसे ते उकळत्या तेलात सोडावेत . थोड्या वेळाने . काट्यांचा वरचा काळसर रंग अजून काळा होऊ लागेल . मग ते बाहेर काढावेत . आता . हे सगळं बाजूला ठेऊन . उरलेल्या कुटात थोडं पाणी मिसळून . गरजेनुसार मसाला , तिखट , मीठ , जिरे , काळी मिरची . तीळ , हिंग , हळद , दालचिनी , वेलदोडे , कडलिंब , इत्यादी साहित्य घालून मस्त ग्रेवी करावी . आता हे सगळं मिश्रण गरम करायला ठेऊन . त्यात ते तळलेले काटे सोडावेत . तयारी झाला बाभळीच्या काट्यांची उसळ . सोबतीला आंबोळी / भाकरी / चपाती / पोळी / पुरी / पिज्झा बेस . जे आवडेल ते घेऊ शकता . आता प्रश्न तो . दही आणि कांद्याचं काय करायचं हा . तर हे सगळं वाचून ज्यांची डोकी गरम होतील त्यांनी दही डोक्यावर थापून घ्यावं . आणि ज्यांना भोवळ येईल त्यांच्या आजूबाजूच्यांनी कांदा त्यांच्या म्हणजेच भोवळ आलेल्यांच्या नाकाशी धरावा

वाचने 11618
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

बाभळीच्या काट्याची उसळ मुळ्व्याधावर अत्यंत गुण्कारी असे कुठल्यातरी कुठेतरी वाचल्याचे आठवतय. राव साहेबांनी प्रकाश टाकावा!

In reply to by स्पा

कोणा ना कोणाचा तरी . "शी . हे बघून मला उलट्या येताएत " तत्सम मेसेज वाचण्यास तयार रहा . . मी मेल वर ज्यांना हि पाकृ पाठवली त्यापैकी काही जणींचे सुरु झालेत =))

In reply to by अद्द्या

काय प्रगत टेक्नॉलॉजी आहे. प्राचीन काळी मंत्र इ. मिळाला की तसे मेसेज यायचे. आता फक्त एका एसेमेसने येतात. काय काय घडेल या जगात कै नेम नाही.

फोटो नसल्याने पाकृ बाद ठरली आहे.

वरील पाककृती केल्यावर त्या बल्लवाचार्याला प्रथम या पदार्थावर बसवावे, म्हणजे उरलेल्यांना काटेविरहित डिश खायला मिळेल.

अतिशय उत्तम " पाकक्रुती " ह्या असल्या पाकक्रुती पुर्वी www.bajbajpuri.com या संस्थळावर उपलब्ध होत्या. दुर्दैवाने ते संस्थळ बन्द झाले. आपण ही पाकक्रुती त्या " संस्थळाची आठवण " म्हणुन टाकलीत की काय? का त्या संस्थळाच्या खजिन्यातुन ही "ढापलीत " काय?

फकस्त "पाक" लोकांसाठी असून त्यानंतरच "काट्याने काटा काढणे" हा वाकप्रचार वापरात आणला जाईल. == स्वगत : कशेळी कट्ट्यामध्ये करून बघावी काय अनायसे "ट्रायल" साठी बरीच "गुणग्राहक" तयार आहेत्च.