Skip to main content

जा जरा पूर्वेकडे (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 27/02/2015 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
संघर्ष हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. माणसाच्या जवळजवळ ३५०० वर्षांच्या लिखित इतिहासात अजिबात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नसलेली वर्षे जेमतेम २०० असतील. जसजशी माणसाने भौतिक प्रगती केली, तसतशी प्रगती संघर्षांमध्येही होत गेलेली आहे. विसाव्या शतकातल्या दोन महायुद्धांनी तर हे सिद्ध केलं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा माणसांना मारण्यासाठी फार प्रभावीपणे वापर करता येतो. इतर प्राणी गरज असेल तरच दुस-या प्राण्यांची शिकार करतात.

अंगोर वाट, कंबोडिया

लेखक श्रीनिवास टिळक यांनी गुरुवार, 26/02/2015 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजच (गुरवार २६ फेब्रुवारी) मी सिएम रीप (अंगोर वाट, कंबोडिया ) येथे पाच दिवसासाठी पर्यटक म्हणून आलो आहे. सुदैवाने मागील आठवड्यातच पुण्याला श्री उदयन इंदुलकर यांचे कंबोडियातील मंदिरे या विषयावर एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला होता. त्यात बरीच माहिती मिळाली. मीपावर या विषयावर अधिक माहिती उपलब्ध असल्यास सूज्ञ सभासदांनी त्याबद्दलचे दुवे (links) दयावे हि विनंती.

खुशबू (भाग ८)

लेखक पगला गजोधर यांनी गुरुवार, 26/02/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ | भाग ७ तो संध्याकाळी निवांत बालगंधर्वपुलावर रेलींगला टेकून बसला होता… खांदा मानेचं धनुष्य ताणून, बोटांना सिगरे

ई बे वरिल ऑनलाईन खरेदी

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 26/02/2015 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
ई बे वर नुकताच मी एक मोबाइल फोन खरेदी केला. फोन ची कंडीशन व पर्फोर्मन्स हे दोन्ही पण योग्य वाटत आहे. हा फोन इम्पोर्टेड असल्यामुळे तो बराच स्वस्त मिळाला. (२६००० रुपये ओरिजनल किंमत असलेला फोन १२००० ला मिळाला ) फोन चेक केला असता तो unsealed होता. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले कि हे फोन इम्पोर्टेड असल्यामुळे त्यांचे कस्टम कडून चेकिंग होते. तसेच या फोन मधले अक्सेसरीज देखील थोडी वेगळी आहेत. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिले कि हे सर्व अक्सेसरीज भारतासाठी नसून ते इतर देशांसाठी केले जातात त्यामुळे ती वेगळी आहेत. हे सर्व त्याने त्याच्या जाहिरातीमध्येही नमूद केले होते.

काही शब्दप्रयोग.

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 26/02/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषा नवशब्दप्रयोगपिपासू आहे किंवा कसे ...आता हे किंवा कसे हे खास म टा चे मराठी ... हल्ली कुणीतरी कुठेतरी वाय फाय ऐकले काय, जो उठतो तो आपला अमुक एरिया वाय फाय करणार ;तमुक स्टेशन वाय फाय होणार ........ शब्द वापरणार्याचा उत्साह असा जणू काही ह्यांनीच ते शोधले आहे आणि काहीतरी अद्वितीय अद्भुत गोष्ट करताहेत. परीर्लुप्त.. हा असाच एक शब्द ..लहानपणापासून क्वचित ऐकतोय ...पण अजून वाक्यात उपयोग करायची वेळ आलेली नाही ...

गूढ कथा: "शिकारी रात्र!"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 26/02/2015 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्र उलटून गेलेली असते. वातावरणात खूप थंडी असते. एक बैलगाडी गावाबाहेरच्या निर्मनुष्य मैदानातून चंद्राच्या उजेडात गावाकडे जात असते. अचानक दोन्ही बैलाच्या मधोमध एक भयप्रद कुत्रा येतो आणि गाडीच्या खाली सरकतो आणि दोन्ही चाकांच्या मधोमध चालायला लागतो. बरोबर बैलांच्या वेगात वेग मिसळून तो चालतो. बैलगाडी हाकणारा (नायबा) बैलगाडीवर बसलेल्या दुसर्‍या माणसाला (होयबा) म्हणतो, "या गाडीखाली एक कुत्रा चालत आहे. त्या कुत्र्याला हाकलू नकोस आणि त्याचेकडे बघू नकोस गावची वेस (बाॅर्डर) येईपर्यंत! एकदा गावात शिरलो की हा कुत्रा नाहीसा होईल." होयबा म्हणतो, "मी हे मानत नाही.

रेल्वे अर्थसंकल्प

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 26/02/2015 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज श्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री, यांनी २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यातील महत्वाच्या तरतूदी इथे टाकत आहे. - प्रवासी भाड्यांमधे कुठलीही वाढ नाही. (अर्थात अंतरिम अर्थसंकल्पात केली होती.) - १७००० शौचालये बायो-शौचालयांत रुपांतरित होणार - १३८ नंबरची रेल्वे चौकशीची दूरध्वनी सेवा १ मार्च पासून पुनरुज्जिवित होणार - प्रवाशांच्या तक्रारींसाठी मोबाईल अ‍ॅप बनविणार - ऑपरेशन ५ मिनिट्स. अनारक्षित तिकीट मोबाईलद्वारे ५ मिनिटात काढता येणार. - टीटीईंकडे हँडहेल्ड उपकरण. इ-तिकीट पेपरलेस होणार. - गाडीच्या वेळेसंदर्भात प्रवाशांना एसएमएस अलर्ट येणार.

थ्री क्वशन्स- लिओ टॉलस्टॉय

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 26/02/2015 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
उद्याच्या जागतिक मराठी दिनानिमित्त लिओ टॉलस्टॉय यांच्या 'थ्री क्वशन्स' कथेचा स्वैर अनुवाद... एकेकाळी एका राजाच्या कारकिर्दीत घडलेली ही एक एक घटना आहे. कोणताही अचूक निर्णय घेण्याची निश्चित वेळ कोणती? कोणाचे म्हणणे गांभिर्यपूर्वक ऐकावे आणि कोणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे?

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन- कार्यक्रमांची माहिती

लेखक बीएमएम२०१५ यांनी गुरुवार, 26/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे एक महत्वाचे विशेष म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये उत्तर अमेरिकेतील कलाकारांना आपली कला लोकांपुढे सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते. अधिवेशन समितीने आलेल्या प्रवेशिकातून अनेक दर्जेदार कार्यक्रम निवडले आहेत. नाट्य रसिकांसाठी यावेळी विशेष मेजवानी आहे. ’मी आणि माझा ओझे (Jose)’ हे विनोदी नाटक न्यू जर्सीच्या कलाकारांकडून यावेळी सादर होणार आहे. ह्युस्टनचे कलाकार यावेळी ‘दुर्गा झाली गौरी’ हे सुप्रसिद्ध नाटक सादर करणार आहेत.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३१

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 26/02/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. फक्त तो जेव्हढा याबाबतीत सशक्त होत जाइल्,तेव्हढं हे फळ आपल्याला अधिकाधिक खणखणीत आणि वाजवून मिळेल. ================================ अध्ययन आणि खरेखुरे गुरुसंस्कार याच्या सहाय्याने आंम्ही मुलं खरोखर मोठी होत होतो.आणि अपरिहार्यपणे पाठशाळेतून बाहेर पडायचं वर्षंही जवळ येत चाललेलं होतं. आंम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला तो एक अत्यंत जड अवघड दिवस असे. अगदी माझ्या चार महिने आधी,असेच ३ विद्यार्थी अध्ययन संपवून शाळेतून बाहेर पडले होते. त्यात ती जोडगोळीही होती. श्रीराम व जयराम .