[शतशब्दकथा स्पर्धा] लव्ह
तो सगळ्यांपासून अलिप्त राहणारा, वेगळा वेगळा होता. म्हणूनच तिला आवडायचा. तू काहीच कुणाशी शेअर का करत नाहीस असं तिने विचारल्यावर तो म्हणाला 'सिगरेट, मोजे आणि अंडरवेअर कधी शेअर करू नये'. हे ऐकल्यावरच तिने ठरवलं, ह्यालाच मी लव्ह देणार.
आज वाढदिवसानिमित्त तिला शेकडो गिफ्ट्स मिळाल्या, पण त्यात तिला शष्प इंटरेस्ट नव्हता. रूममेट झोपल्यावर त्याने दिलेली गिफ्ट तिने उघडली. एक सुंदर बाहुली होती. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची. बाहुलीला छातीशी कवटाळून, त्याच्या विचारात ती गाढ झोपी गेली.
मध्यरात्री कसल्याशा आवाजाने रूममेटला जाग आली. बघते तर काय, ती निरागसपणे झोपली होती...
मिसळपाव
किल्ले सुवर्णदुर्ग, हर्णे
याची कहाणी सुरु होते कोकण किनार्याजवळ असणार्या आपल्या मराठ्यांच्या सुवर्णदुर्ग पासूनच.