Skip to main content

विरोध शिवाजी राजेंना आहे, पुरंदरे याना नाही

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 22/08/2015 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
(एक गैर मराठी माणूस या घटनेकडे कसे पाहतो. हे हि लोकांना कळले पाहिजे. म्हणून हा लेख). दिल्लीची मेट्रो अजब-गजब आहे, इथे नानाविध लोक भेटतात. कालचीच गोष्ट संध्याकाळी सीपी स्टेशनहून मेट्रो घेतली. मेट्रोत डोक्यावरचे पांढरे केस पाहून हि सहजा-सहजी कुणी बसायला जागा देत नाही. उभा असतानाच सौ.चा फोन आला. फोनवर अर्थातच मराठीत बोललो. समोर बसलेल्या माणसांनी अंकल आप बैठीये म्हणून जागा दिली. मी धन्यवाद म्हंटले (मला जागा देणारे लोक मला देवासारखेच वाटतात). त्याने मला विचारले, अंकल आप महाराष्ट्रीयन हो. मी हो म्हंटले. त्याने आपला परिचय दिला, तो काही वर्षांपासून मुंबईत राहतो. काही कामासाठी दिल्लीत आला होता.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...

लेखक मार्गी यांनी शनिवार, 22/08/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

द स्केअरक्रो - भाग ‍१९

लेखक बोका-ए-आझम यांनी शनिवार, 22/08/2015 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
द स्केेअरक्रो भाग १८ द स्केअरक्रो भाग १९ (मूळ लेखक मायकेल कॉनेली) सोमवारी सकाळी मी एकदम फ्रेश होतो. रॅशेलचा फोन कधीही येऊ शकला असता. मला त्याच्यासाठी तयार राहायचं होतं. त्यामुळे सकाळी सहा वाजताच मी टाइम्सच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. मला फाईल्सवर काम करायचं होतं. आमची न्यूजरूम पूर्णपणे रिकामी होती. अगदी एखादं चिटपाखरूही नव्हतं. एकही रिपोर्टर किंवा एडिटर नव्हता. भविष्यकाळाच्या कल्पनेने माझ्या मनात चरकलं. एकेकाळी हीच न्यूजरूम म्हणजे जगातली सर्वोत्तम जागा होती काम करण्यासाठी.

सुखी जग

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 22/08/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!
काव्यरस

शाळा

लेखक जानु यांनी शुक्रवार, 21/08/2015 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ झाली आज शाळेत जायचा कंटाळा आलेला होता. पण काय करणार कंटाळा करुन जमणार नाही. शाळा उघडणे तर आवश्यक होते. मुले वाट पाहत बसुन असतात. आई वडील शेतात कामाला गेले की त्यांना घरात कोणी राहु देत नाही. कुलुप लावले की मुलांचे व पालकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे शाळेचे मैदान आणि शाळाच. त्यांचा विचार येताच गणेशने आळस झटकला आणि सकाळची त्याच्या वाटणीची कामे करु लागला. स्वाती आणि गणेश दोघे जिल्हा परिषदेत शिक्षक. दोघांचा सकाळ पासुनचा दिनक्रम हा घड्याळ्याच्या काट्यावर बांधलेला. चुका करण्यास, वेळ वाया घालवण्यास सक्त मनाई.

[शतशब्दकथा स्पर्धा] थोडक्यात वाचलो! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्धः 'परत तेच! मुद्दाम करतेय का?' पुढच्याच टेबलवर पाठमोरं बसलेल्या तिने तीनदा वळून त्याच्याकडे, आणि नजरभेट होताच मागे विमानतळाकडे पाहिलं होतं, मग मान वळवून घेतली होती. तिशीच्या आसपासचा आकर्षक चेहेरा आणि बांधा. डोळ्यांत धास्ती होती का? 'विचारावं का मदत हवीय का म्हणून?

आक्रोश! - (द्विशतशब्दकथा)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/08/2015 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
"अच्छा हुआ वो पाववालेका दुकान जला दिया. बच्चा देखके बेवकूफ बनाता था वो. ऐसाहीच मांगता था उसको. अब कलसे हम चाचाके दुकानसे पाव लेंगे..." सायंकाळच्या वेळी शहर जाळपोळींनी उजळून निघाले होते. तसाच उजळलेला तो एक निरागस चेहरा. पाववाल्याला धडा मिळाला, आणि उद्या सुद्धा शाळेला सुट्टी असणार, या दुहेरी आनंदात झोपी गेला.. दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे, शहर पुन्हा उठले. पुन्हा पेटले. उजाडता उजाडता काही दिवे, पुन्हा मालवले.. कायमचेच.. त्याचे मात्र आज काहीतरी बिनसले होते.

(मौजमजा) आमचेही पहिलेवहिले प्रेम...

लेखक एस यांनी शुक्रवार, 21/08/2015 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रत वरील दोन धागे मिपावर प्रचंड लोकप्रियता मिळवत असल्याचे पाहोन प्रस्तुत लेखकासही त्याचे पहिलेवहिले प्रेम आठवले आणि त्या उमाळ्यात/ऊर्मीत/उकाळ्यात मागचापुढचा विचार न करता हरहमेश जैशे येक हाडाचा मिपाकर करतो तैशेच प्रस्तुत लेखकाने (येथून पुढे प्र.

ओल्या काजूगरांची भाजी

लेखक नूतन सावंत यांनी शुक्रवार, 21/08/2015 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी माहेरची भंडारी.एरवी आठवड्यातून ५ दिवस तरी मासे हवेतच.पण श्रावण सुरु झाला की,सगळ्या देवांचे सप्ते असतात देवळात. ( सप्ते हे सप्ताचे अनेकवचन.सप्ता=साप्ताह.या सात दिवसात अखंड जागरण असते यासाठी प्रत्येक वाडीचे नंबर लागलेले असतात.वेळ ठरवून दिलेली असते.) श्रावणात येणाऱ्या प्रत्येक देवाच्या पहिल्या वारापासून हे सप्ते सुरु होतात. भैरी म्हणजे कालभैरव.रत्नागिरीतले जागरूक देवस्थान.भैरी हे त्याचे प्रेमाचे नाव.भैरी, शंकर आणि दत्ताचा सप्ता संपेपर्यंत मात्र आमच्या घरी सगळे शिवराक.

शिर्षकविहीन (शतशब्दकथा) - उत्तरार्ध..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 21/08/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन.. ************************************************************************************** गळ्यातून उसळणार्‍या रक्ताला कसंबसं थोपवत ती कोसळली. तिच्यावर झुकून अश्रु ढाळणार्‍या त्याच्याकडे बघत गुरगुरली, "आय लव्ह यु टू, नासीर! पण सर्वस्व नव्हता कधीच तू माझं ! सॉरी हनी..." त्याच्या विस्फारत्या डोळ्यांत बघतच तीनं तो सुरा हिसकला, आणि पुर्ण ताकदीनीशी त्याच्या छाताडात खुपसला. पार आतवर शिरला त्याच्या हृद्यात तो घाव.... तिच्यासारखाच ! अंगावर कोसळणार्‍या नासीरला बाजुला ढकलत ती खुरडायला लागली.