Skip to main content

बंगला भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 05/10/2015 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ बहुतेक मी ऑफिसला जायचो तेव्हा तो घरच सामान आणत असावा. कारण त्याला तर कधी मी आवाराबाहेर पडलेला बघितला नाही. फक्त मी जेव्हा बंगल्याच्या बाजूने फेऱ्या मारायचो तेव्हा तो काहीतरी काम करतो आहे अस दाखवत बंगल्याच्या आतून माझ्यावर नजर ठेवून असायचा. त्याला वाटत असेल मला कळत नाही,; पण मला माहित होत की त्याच पहिल्या दिवसापासूनच माझ्याकडे लक्ष होत. मला मात्र त्या बंगल्याबद्दल आणि त्याच्या मालकिणी बद्दल खूप उत्सुकता होती. अनेकदा मी प्रयत्न केला त्या मालकीणबाईना गाठण्याचा. पण त्या कधी बाहेर पडायच्या ते कळलच नाही.

बंगला भाग ३ (शेवटचा)

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 05/10/2015 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १, भाग २ असेच दिवस जात होते. माझी नोकरी छान चालू होती. मध्ये वरची पोस्टमिळणार होती पण मी नाही घेतली. अहो आता काय सांगू तुम्हाला? फिरतीवर जाव लागल असत मला. म्हणजे त्या बंगल्यापासून लांब. म्हणून मग नाही घेतली बढती. हिला बोललो नाही मात्र. मुल मोठी झाली होती माझी. कस ते कळलच नाही. तशी माझी बायको व्यवहारी आणि हुशार. तिनेच वाढवलं मुलांना. मी आपला नावाला. कमावून आणायचं ते तिच्या हातात ठेवायचं आणि घरात रहायचं.... बस! एवढाच केल मी कायम.

बंगला - भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 05/10/2015 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ नविनच फ्लॅट घेतला. थोडा गावा बाहेर. एका नवीन बिल्डींगमधे. मुलांची शाळेची आणि बायकोची ऑफिसची बस जवळच्या वळणावर येत होती. त्यामुळे त्यांना काहीच त्रास नव्हता. माझ ऑफिस जवळच होत. त्यामुळे मी माझ्या स्कूटरने जायचो. मला पहिल्यापासूनच शांतता आवडते. म्हणून तर बायको आणि मुल फारशी तयार नसतानासुद्धा मी हा flat बुक केला होता. खर तर मला बंगलाच आवडला असता. अगदी आमच्या बिल्डिंग समोरच जसा टुमदार बंगला आहे तसा. ते एक मी माझ्या मनाशी जपलेल.... फक्त मलाच माहित आहे..... अस माझ एकट्याच स्वप्न आहे. पण परवडणार नाही म्हणून तर हा फ्लॅट पसंत केला होता.

अगुंबे बद्दल माहिती हवी आहे

लेखक कबीरा यांनी रविवार, 04/10/2015 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी नंतर ३-४ दिवसांसाठी जाण्याचा विचार आहे, तरी पूण्याहून कसे जावे? राहायची सोय काय? मालगुडी डेज चे शुटींग इथे झाले ऐकले आहे, जायची इच्छा आहे

तलवार

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 04/10/2015 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
तलवार २००८ सालच्या आरुषी तलवार "ऑनर किलिंग" या गाजलेल्या प्रकरणावर मेघना तलवार या घेऊन आल्या आहेत "तलवार". या गाजलेल्या प्रकरणात काय घडले असेल याची उत्सुकता त्या काळात शिगेला पोचली होती. नव्हे मिडियाने पोचवली होती. त्यात काय घडले असेल याची नाट्यमय कहाणी म्हणजे “तलवार”. सध्या निकाल लागलेल्या त्या प्रकरणावर पूर्णपणे आधारित आहे हा चित्रपट. आरुषी तिचे आई-वडील अन नोकर हेमराज यांना त्या काळात मिडीयाने लोकप्रिय (?) बनवले होते. जर ते "ऑनर किलिंग" असेल तर त्यात काय घडले असेल? मुळात ऑनर किलंग असेल कि नसेल?

औंध कास भटकंती-भाग २

लेखक अजया यांनी रविवार, 04/10/2015 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ सोमवारी सकाळी उठून रूमबाहेर पाहिलं तर थेट समोर खोल दरी.आणि खालचं सातारा शहर सुर्योदयाबरोबर जागं होत होतं. . निवांत मधला छानसा नाश्ता आटोपून आम्ही कासला जायला सज्ज झालो.हॉटेलवाल्यांनी आवर्जून कुमुदिनी तलाव बघाच असं सुचवलं होतं.तो म्हणे फुलांनी भरून गेलाय.त्यामुळे अगदी उत्सूक होऊन कॅमेरे परजून निघालो.अगदी अर्ध्या तासाच्या आतच पठारापाशी पोचलो.तिथे आमच्याकडून कॅमेरा, पार्किंग आणि कर मिळून १३० रु घेतले

माझ्या आयुष्यातलं एक दुखरं पान

लेखक सुजल यांनी रविवार, 04/10/2015 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसला लागताना आम्ही दोघी एकत्रच लागलो. बाकी सगळे मुलगे होते. मुली अशा आम्ही दोघीच. खर तर ती थोडी उशिरानीच जॉईन झाली . जवळ जवळ एक महिना उशिरा. मी तिची अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि ती जॉईन झाली. साडी नेसलेली ( मी आश्चर्यचकित -ऑफिस ला जॉईन होताना साडी ?). दिसायला पोक्त वगैरे चष्मा/ पदर दोन्ही खांद्यावरून पुढे घेतलेला. डोक्याला चपचपीत तेल लाऊन त्याची एक छोटीशी वेणी घालणारी. बंगलोर जवळच्या एका कुठल्यातरी आडगावातून आलेली. मुंबईत राहायला घर नाही म्हणून लांबच्या नातेवाईकांकडे राहणारी. आली तेव्हा अशी होती. खर सांगायचं तर मी चक्क हिरमुसले.

काहि बालके खुप गोड क्युट असतात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/10/2015 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
काहि बालके खुप गोड क्युट असतात काहि बालके खुप गोड क्युट असतात .. म्हणुन वैशाख वणव्याचा भडका थांबत नाहि श्रावण सर धरतिवर कोसळत असतेच. वठलेल्या वृक्षाला त्याचे काय? . माजघरात बसलेली ति निपुत्रीक बाई थिजलेल्या डोळ्याने सारे पहातच असते

गांधीजयंती निमित्त गझल

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी रविवार, 04/10/2015 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
बापू जिकडे तिकडे हिंसा आता दिसते बापू जनतेला या गरिबी अजून पिसते बापू जेव्हा जेव्हा लूट पाहतो मी सत्याची तुझीच प्रतिमा मनात माझ्या वसते बापू शेतीचाही कणा मोडला दुष्काळाने शेतकय्रांचे जीवन झाले सस्ते बापू मातीमोल रे तुझी अहिंसा झाली आता सदा मनाला चिंता याची डसते बापू भिंतींवरचे फोटो नुसते नावापुरते जनता तुजला जयंतीलाच पुसते बापू खोटे नाटे सारे हे व्यवहार चालती कुठे कुणीही आज कसे रे फसते बापू? खरेच जर तू आठवला असता देशाला खून, दरोडे, बलात्कारही नसते बापू चुकलो आम्ही घे पदराला गुन्हे आमचे दाव खर्‍याचे सर्वांना तू रस्ते बापू मला दिलासा नको कुणाचा जगण्यासाठी हेच मला आधार जगाचे "हसते बापू"
काव्यरस

जमलंच तूला तर....!!

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी रविवार, 04/10/2015 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
जमलंच तुला...... तर जमलंच तुला...... तर करुण दू: खानं ओथंबलेल्या डोळ्यांना धागा (सुखाचा) दे विसावण्यासाठी या लोकशाहीला थोड़ी जागा दे प्रसवण्यासाठी त्यामुळं उघड्यावर होणारे तिचे प्रसव टळतील नाहीतर उगाच लोक बड़बड़तील काहीही अन कुठेही ? जमलंच तुला...... तर कान फूंक त्या बलातकाय्रांचे दे पाणी त्यांना मर्दानी कर्तुत्वाचं ! एरवी गंज चढलाय त्यांच्या माणूसपणाला पौरुषत्वाची एक ठिणगी असते कायम पण तीही पेट घेते फ़क्त वासनेच्या वाय्रानेच त्यांचा पुरुषार्थ शोभून दिसतो टेबलावरच्या कागदी फुलांच्या ताटव्यांत अगदी गुबगुबीत, गुलाबासारखा ना गंध, ना वास! फूल आहे, तेवढा भास ! जमलंच तुला......