Skip to main content

अगुंबे बद्दल माहिती हवी आहे

लेखक कबीरा यांनी रविवार, 04/10/2015 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी नंतर ३-४ दिवसांसाठी जाण्याचा विचार आहे, तरी पूण्याहून कसे जावे? राहायची सोय काय? मालगुडी डेज चे शुटींग इथे झाले ऐकले आहे, जायची इच्छा आहे

वाचने 5279
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पुण्याहून मिरज किंवा कोल्हापूर मार्गे हुबळी आणि तिथून शिमोग्याला जा. शिमोग्याहून अंगुब्याला जा.

पुणे एरनाकुलम पूर्ण एक्स्प्रेस हि आठवड्यातून तीन वेळेस जाणारी गाडी घेऊन उडूपीला उतरा तेथून ५५ किमी वर अगुंबे आहे आणि तेथुन भरपूर बसेस मिळतात ( मणिपाल वाटेत लागते). आठवड्यात दोन वेळेस हि गाडी कराड मिरज वरून जाते त्याने गेलात तर गोव्यात प्रवेश करण्याच्या अगोदर दुधसागर धबधबा पण फुकटात पाहायला मिळेल. आणि आठवड्यात एकदा पनवेल वरून जाणारी असेल तर कोकण रेल्वेचा प्रवास घडेल कोणत्याही मार्गाने गेलात तरी दृष्टी सुख भरपूर मिळेल

रोम्युलस व्हिटेकर! तिथे नागराज ऊर्फ किंग कोब्राचे फोटो काढण्यासाठी एकदा जाणार आहे.

कुठे रहाल? अगुंबे जरी खूप प्रसिद्ध पर्यटन स्थळ असले तरी तिथे राहाण्याची अजिबात सोय नाही. एकच लॉज आहे (माल्या रेसिडंसी) पण ते खूपचं साधं आहे. फॅमिली सोबत असेल तर तिर्थहळ्ळी/शिवामोगा/उडुपी/स्रिंगेरी ला राहाण्याचा पर्याय निवडावा. काय बघाल? अगुंबे घाट ( २१ हेरक्लिप टर्न्स), Agumbe Rainforest Research Station, स्रिंगेरी (मंदिर), कुंदादरी (हिल स्टेशन), कुद्रेमुख (शोला फॉरेस्ट) खाली दिलेले रस्ते हे खूप दाट जंगलातुन जातात आणि वन्य प्राणी दिसण्याचे खूप चांसेस आहेत, १) अगुंबे - सोमेश्वर( नागराज साठी प्रसिद्ध) २) अगुंबे -कुंदादरी - तिर्थहळ्ळी ३) अगुंबे -किग्गा ४) माया घाट मला नागराज ( किंग कोब्रा) चं एवढं आकर्षण आहे की २ वर्षांपुर्वी मी एकटाच Agumbe Rainforest Research Station ला भेट देण्यासाठी गेलो होतो. ते पण बाईक वर. दुर्दॅवाने तेंव्हा किंग कोब्रा रिसर्च संपला होता आणि व्हिटेकर आणि गवरीशंकर (https://pogirigowrishankar.wordpress.com/) दोघेही नेलोर ल गेले होते.

In reply to by जिन्क्स

हे ठिकाण भारी वाटतंय... आणि ती दोन माणसं, खासकरून. जायला हवं.... २१ हेअरपिन बेंड्स... साउंड्स कूल

गेले पाच दिवस तिथेच होतो. आजच (५ ऑक्टोबर) दुपारी परतलोय. बाकी कसे जाल, कुठे राहाल, काय पाहाल याबाबत जाणकार मिपाकरांनी वर उपयुक्त मार्गदर्शन केलं आहेच. काही विशेष माहिती हवी असेल तर व्यनि करा.

In reply to by सुधांशुनूलकर

काय पाहिले आम्हाला पण सांगा ना. मिपावर काही लोक असे लिहितात वर्णन करतात की प्रत्यक्ष जाण्यापेक्षा त्यांचे लेखच जास्त जिवंत अनुभव देतात. त्यात माझ्या यादीत तुम्हीही आहात. लेखाची वाट बघतोय.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वृत्तान्त लिहिणारच आहे. पश्चिम घाटातलं जीववैविध्य भाग ३. लिहायला सुरुवात करतोच आहे. जरा वेळ लागेल..