Skip to main content

वॅली ऑफ फ्लॉवर्स : १ : कशीबशी केलेली बुकिंग

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 04/11/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पहिली नोकरी होती मुंबईला "ओरॅकल फिनान्शियल सर्विसेस" येथे. तिथे माझ्यासोबत कॉलेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या आणखी काहीजणांनी एकाच दिवशी कंपनीत आणि करियरमध्ये प्रवेश केला. पुढचे २-३ महिने आमचं सोबत प्रशिक्षण झालं. अगदी पद्धतशीर वर्गात बसुन, कॉलेजसारखंच (वातावरणाच्या बाबतीत) पण दर्जा खूप चांगला. त्यानंतर १-२ वर्ष आमचे प्रोजेक्टसुद्धा सारखेच होते. आम्ही एकाच मोठ्या टीममध्ये होतो. त्यामुळे आमची सर्वांची एकमेकांशी मस्त गट्टी जमली. या ग्रुपचं नाव पडलं "डस्सुझ". थोडक्यात कारण यातले सगळे आपापल्या पद्धतीने दुसऱ्यांना डसत राहतात.

कॅनडाच्या लोकसभेत पंजाबी तिसर्‍या क्रमांकाची भाषा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
१९ ऑक्टोबरच्या सार्वत्रिक कॅनेडियन निवडणुकीत तेथील लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) एकूण २३ भारतीय वंशाचे आमदार निवडून आले. त्यापैकी २० जणांची पंजाबी मातृभाषा आहे. त्यामुळे, इंग्लिश व फ्रेंच या भाषांच्या नंतर पंजाबी कॅनडाच्या लोकसभेत (हाउस ऑफ कॉमन्स) तिसर्‍या क्रमांकाची भाषा झाली आहे. लवकरच बनवण्यात येणार्‍या केंद्रिय मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या काही आमदारांची वर्णी लागेल अशी अपेक्षा आहे. कॅनडाच्या २०११ च्या जनगणनेप्रमाणे ४५६,०९० लोकांनी पंजाबीला आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. हे प्रमाण कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या १.३% आहे.

चारोळी

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी
काव्यरस

भय इथले संपत नाही.....

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्याठण्ण विहिरीच्या तळाशी- गर्द वडाच्या पारंब्याना लोंबकळते- पडक्या वाड्याच्या ची-याची-यांतून- काळ्याकपारीमध्ये दडलेले- काहीतरी...... जे आहे फार प्राचीन जे आहेदुष्ट क्रूर अन वखवखलेले ज्याचा आहे स्पर्श दाहक ज्याचा विचारही भिववणारा इथला आसमंत भारलेला इथे कशाचीतरी हुकुमत इथली शांताताही असहय इथले आवाज तसेच भयानक इथल्या सावल्या हलतात इथली झाडे कुजबुजतात इथले खडकही शहारतात सततचे नाट्य इथले थांबत नाही भय.....भय इथले संपत नाही.....

'ट्वेल्व्ह अँग्री मेन' आणि ’मॅनेजरियल ग्रिड’ .....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/11/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
. . 'ट्वेल्व्ह अँग्री मेन' हा चित्रपट आजवर इतक्या वेळा बघून झालाय की आता किती वेळा पाहिलाय हेसुद्धा आठवत नाही. त्यानंतर कधीतरी एक-दोन वेळा 'एक रुका हुआ फैसला'सुद्धा पाहून झाला. आवडलासुद्धा.... पण का कोण जाणे, हिंदी आवृत्ती तितकीशी भावली नव्हती. परवा एक सन्मित्र श्री. अतुल ठाकुर यांची फेसबुकवरील या संदर्भातील पोस्ट वाचली.

अंदमान - एक अविस्मरणीय सफर -१

लेखक तिमा यांनी मंगळवार, 03/11/2015 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २: http://www.misalpav.com/node/33589 अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो.

हेरंब कुलकर्णी यांच्याशी बातचीत

लेखक विशाखा पाटील यांनी मंगळवार, 03/11/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
. . शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने केलेली प्रगती यावर उलटसुलट चर्चा होत असते. शिक्षणाचा प्रसार झाला, गावागावापर्यंत शाळा उघडल्या गेल्या हे खरे असले, तरी प्रश्न संपलेले नाहीत. एकीकडे चकचकीत इंटरनॅशनल स्कूल, तर दुसरीकडे दुर्गम भागातल्या शाळांची दुरवस्था, हे आपल्या राज्याचे चित्र. हेरंब कुलकर्णी हे नाव शिक्षणक्षेत्राशी आज जोडले गेलेय.

लॉटरी-२

लेखक सायकलस्वार यांनी मंगळवार, 03/11/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
लॉटरी
'तिकडे प्रिन्सेस बारच्या मागे एक लॉज आहे. तिथे तासावर रूम मिळते' अमोल आणि प्रितेश दोघेही उडाले. 'भडव्या उगाच खेचतोयस का आमची' 'खेचत नाही. पुढचं ऐक' असे म्हणून समीरने पुढचा सर्व प्रसंग डिटेलवार सांगितला.
. . . त्याने काहीही सांगायचे बाकी ठेवले नाही. ते दोघे मग तिथून बारकडे गेले. तिथे खरोखरच एक लॉज होता. समीरने पैसे भरले आणि काउंटरवरच्या माणसाने त्याच्या हातात किल्ली दिली. तिने सरळ रूमकडे चालायला सुरवात केली आणि समीर तिच्या मागून गेला. त्यानंतरची स्टोरी समीरने अगदी ग्राफिक डिटेल्समध्ये ऐकवली.

॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 03/11/2015 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जय जय्य एंड्रॉइड समर्थ ॥ पहिला मोबाइल! तो दिवस आठवाला की वाइट वाटतं, खरं तर मला मुळीच घ्यायचा नव्हता... आधीच नवीन जॉब त्यात मोबाइल मग परत महिन्याचा खर्च वेगळा, पण अमृता म्हणाली, तू घेच मोबाइल! मला हवा तेव्हा तुला कॉंटॅक्ट करता येईल. तेव्हा तिच्या कड़े बीएसएनएल चा 'तरंग' नामक सेलफोन होता, सेलफोन कसला... काळी वीट होती ती! सिम नसलेला CDMA फोन! असो... तशी तेव्हा फोनची दुकानं कमीच, त्यातल्यात्यात डेक्कनला होती ४-५.. सागर आर्केड मधे गेलो, संध्याकाळची वेळ, गर्दी अपेक्षेप्रमाणे, नोकियाचे फोन तर भाजी विकल्यासारखे खपायचे तेव्हा, माझं लक्ष्य गेलं मोटोरोलाच्या रंगीत स्क्रीन असलेल्या मोबाइलवर...

अॅनी हॉल: एका नात्याचा प्रवास

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 03/11/2015 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
प्रौढ नायक अणि तितकीच प्रौढ नायिका टेनिस खेळायच्या निमित्याने भेटतात. मग त्यांच्या भेटी होत जातात. लगेच बेडरुमपर्यंत जातात. मग दोघे एकत्र राहायला लागतात. मधेच भांडणे होतात तेंव्हा रागावून काही काळ विभक्त होतात. दोघे एकमेकापासून दूर राहू शकत नाही म्हणून मग परत एकत्र येतात. आयुष्याच्या एका टप्प्यावर दोघांनाही जाणवते का आता आपले एकत्र राहणे शक्य नाही. परत विभक्त होण्याचा निर्णय घेतात, आता मात्र शांतपणे विचार करुन हा निर्णय घेतला असतो. तरीही तो तिच्याकडे येतो तिला सोबत चल म्हणतो. ती नाही म्हणते. मी आनंदी आहे असे सांगते. तो तुटतो. नंतर परत ती त्याच्या गावात जाते आणि चित्रपट संपतो.