Skip to main content

वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 26/11/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल की परवाच वर्तक कुटुंबियांना दुबईतुन भारतात जाउन सहा वर्षे पूर्ण झाली! आणि आज ब्लॉग चाळता चाळता हा लेख मिळाला… वर्तक कुटुंब... एक ३ पात्री 'मित्र' अभिजीत वर्तक. चैत्रा वर्तक. प्राजक्ता वर्तक. सुरुवात करतो अभिजीत पासून... सुरुवातीला झीरो कट... नंतर सचिन टाइप्स... आता जवळपास झाकीर.. किव्वा डिट्टो शंकर महादेवनचा मुलगा, सेम हेयर स्टाइल! फूल दिल से क्यारेक्टर... सीधी बात नो बकवास वाला! आमची ओळख कशी झाली, डोक्याला ताण द्यावा लागतोय, आठवलं... २००८.. नवीनच होतो दुबैत, एका कामा निमित्त मी त्याच्या घरी गेलेलो, ८-९वाजले असतील...

पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आन्दणात मी कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा किती पडाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी विशाल (२६-११-२०१५)

खफवरची गाणी

लेखक मांत्रिक यांनी गुरुवार, 26/11/2015 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाचे एक सदस्य नाव आडनाव यांनी विनंती केल्यावरुन खरडफळ्यावर मी अपलोड केलेल्या काही गाण्यांच्या लिंक्स येथे एकत्रित स्वरुपात देत आहे. खरडफळ्यावर डस्टर फिरवल्यावर अर्थातच ते सर्व उडल्या गेले आहे. गाणी मुख्यतः वेस्टर्नच आहेत. हिंदी गाणी आपल्या सर्वांना माहीतच असतात, म्हणून नमूद करत नाही. गाणी मुद्दाम embed न करता केवळ टेक्स्च्युल यूट्यूब लिंक्स देत आहे. त्यामुळे धागा उघडल्यानेच डाटा खर्च झाला असं नको व्हायला. ज्यांना या धाग्यात रस नाही, अशा व्यक्तिंचे त्यामुळे नुकसान होणार नाही. प्रत्येक गाण्याचे शक्य तितके ऑफिशियल व्हर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

"आत्मा" ज्ञान!!

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 26/11/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष :- १९८९-९० स्थळ :- १०१ ची गच्ची वेळ :- पोटं भरलेल्याची पात्रं :- मेंदू क्रमांक-१ (संजय पाटील) मेंदू क्रमांक-२ (बाजी प्रभू) मेंदू क्रमांक-३ (किरण केंचे) मेंदू क्रमांक-४ (राजेश सोनावणे) एका टळटळीत दुपारच्यावेळी संजयने शिट्टी मारून ९७ मध्ये असलेल्या मला!..येण्याचा इशारा केला. उड्या मारत त्याच्याकडे गेलो तर तिकडे बाकीचे दोन मेंदू आधीच हजर होते...संजयच्या पहिल्याच प्रश्नाने मी ताडकन उडालो.... ये आपण 'प्लँचेट करायचं का? खरंतर संजयला करूयात का?

पूर्वेच्या समुद्रात - ११

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 26/11/2015 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेच्या समुद्रात- १, , , , , , , , , १० पूर्वेच्या समुद्रात - ११ नारकोंडम बेटाची सफर हा भाग मी अगोदरच लिहिला होता.

२६/११

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 26/11/2015 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
1 2
आज २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला झालेल्या घटनेस सात वर्षे पूर्ण झाली , या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व शहीद जवान ,पोलिस आणि निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ३

लेखक भानिम यांनी गुरुवार, 26/11/2015 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या दोन भागांमधून आपण भारतीय संस्कृतीचा प्रसार दक्षिण व पूर्व आशियातील म्यानमार, चीन, कोरिया, जपान, थायलंड इत्यादी देशांत कसा झाला ते पाहिले. आता आपण कंबोडिया, विएतनाम, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांमधील भारतीय संस्कृतीची वाटचाल पाहू. आतापर्यंत आपण पाहिलेल्या इतिहासात, कंबोडियातील राज्यसत्तेला भारताबाहेरील भारतीय संस्कृतीचे अत्यंत गौरवशाली आणि वैभवशाली पर्व असे म्हणता येईल.

तारा वर्तक..व तीचे बाळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/11/2015 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
तारा वर्तक..व तीचे बाळ ..................................... धनंजय जोशी ब्यांकेत ऑफिसर होता.. गावात वडलोपार्जीत राहता बंगला. पत्नी शकुंतला... तो प्रेमाने तिला शकू म्हणायचा व ती जय... शकूच पहिले मूल गेले होते..गर्भाशय व नलिकेत काही कोम्पिकेशन्स झाली होती... डॉक्टरांनी औषधे दिली होती.. शकू पुन्हा गर्वार्शी होती ७ महिन्याची...रिपोर्ट्स नॉर्मल होते ..जय काळजी घेत होता.. जय ला जवळच कुणीच नव्हत..आई बाबा पण देवाघरी नुकतेच गेले होते.. लग्नात देणी घेणी..मानापनावरुन शकुच्या घरच्या शि बिनसले होते..त्या मुळे शकू व जय ने शकुच्या माहेरच्या शी संबंध तोडलेले होते.. जय ची दूरची आत्या होती.तीच पण वय झालं होत.."

इतस्तत:

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 25/11/2015 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या डोंगरकडांवरुन वाहणारे वारे गारठा घेऊन पश्चिमेकडील पाटवाटा समृद्ध करत गेले. बुंदेलखंडाच्या तीव्र ऊतारावरुन अवजड शिळा गडगडत खाली आली. काम फत्ते झाले. चढणी भाजणीचा रस्ता तुडवत वर्दी द्यायला भिवा गडावर पोहोचला. तुघलक खान दाढी कुरवाळत सिंहासनावर आरुढ होता. "क्या पैगाम लाये हो?" "वो पत्थर हमने हटाया जनाब" "बहोत खुब, सुभा नल्ला" अक्रम पठाणाकडे नजरत-ए-हुकुम गेला. दाढीदारी सैन्य डोंगर उतारावर एकवटले. जिथुन शिळा काढली होती तिथे एक भलामोठा खंदक पडला होता. पहारी तुटून पडल्या. त्या खंदकात जोमाने खोदकाम सुरु झाले. धामनीच्या सुभेदाराकडे खबर उडत उडत गेली.

होऊ द्या खर्चाला थोडा विलंब

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 25/11/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले.