Skip to main content

होऊ द्या खर्चाला थोडा विलंब

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 25/11/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले. कुठेतरी मिपावर सहिष्णुता, विनोदीवृत्ती ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या डिझाईनांना हात घातला. मात्र अशा कामाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या कामाला चाप बसली आहे. खाली काही चोरलेल्या डिझाईनची सॅम्पल्स देतो आहे. मी टीशर्टांचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही. टीशर्ट डिझाईन विषयी अजून काही प्रयोग करण्याआधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, अमेरिकेत तसेच अन्य बर्‍याच देशांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या वस्त्राची ओळख आणि आरामदायकता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या डिझाईन्समागे होते आणि राहतील. डिझाईनचा आत्मा सोडून किंवा बदलून कलाकृती करण्यात मला स्वारस्य नाही आणि मिपाकरांचीची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे डिझाईन करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच. धन्यवाद. t1 t2 ............................................... चित्तरकथेतील अभिकुमार
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18028
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

:)

डिज़ाइन सुचत नसतील अन काय! नुसतं सुरुवात करुन काही होत नसतंय. तसं नसतं तर सतराशे साठ आर्डरी पेंडिंग पडल्या नसत्या. कळलं का चो रा? ;)

In reply to by स्पा

मिपा बरेच जण पाहात असतात. कालच एका सदस्याकडे जयहिंद अन वामाच्या मालकांनी मिपावर प्रसिद्ध टीशर्ट डिझाईनची मागणी केली असे कळले. बर्‍याच जणांचे मिपावर प्रसिद्ध झालेले टीशर्ट बाहेर दिवाळी सणात लोकांच्या अंगावर येऊन गेले आहेत, येत आहेत. त्यामुळे मिपावर टीशर्ट डिझाईन येताच असे डिझाईन दोन दिवसात गोव्यामध्ये आले यात काही नवल वाटले नाही. यामागे बरीच कारणे असू शकतात. मात्र डिझाईनमध्ये नेमका संदेश काय आहे तर ते प्रसार स्वरूपाचे समजले जाईल याबद्दल कोणा तज्ञ माणासाने सांगावे. इनटॉलरन्स क्राईमशी संबंधित, वकील लोक सांगू शकतील. (मग मी हे सगळं का लिहिलेय?) . हैशा

हल्लीचे डिझाईनर आळशी झाले असल्यानं असं झालं असावं असा प्राथमिक कयास आहे. इकडचं तिकडचं उचलतात आणि डिझाईन करतात. मागे तुमचं 'थांब अर्नोल्ड कुंकू लावते' हे डिझाइन आलं होतं त्यानंतर थोड़याच दिवसात बऱ्याच ठिकाणी हे डिझाइन ढापलं गेलं. त्यामुळे त्याबाबत फार विचार करु नये असं वाटतं. बाकी डिझाईन पूर्ण करण्यासाठी याचा फ़क्त पार्श्वभूमी म्हणून विचार करायला हरकत नाही. - patheticbhendi

In reply to by नाखु

पथेटिक भेंडी, बॅचेतस अणि संपृक्त द्रावण भय्यानक अवडण्यात अले अहे. . मी प्रतिसादकात असतो तर अटलांटिक रेडा किंवा अंटार्क्टिक मेंढी लिहिले असते. ;)

In reply to by प्रचेतस

@बाकी तुम्हाला असले शब्द बरोब्बर अवडतात.>> हो ना! आणि तुम्हाला "आमचे असे शब्द आवडणं":- हे आमच्या असल्या अवडण्या पेक्षा कित्तितरि पटीने अधिक आवडत..,हे केव्हढ़ आSSश्चर्य!!! http://freesmileyface.net/smiley/tongue/mockery-022.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

आदल्या दिवशी 'पथेटिक भेंडी' खाल्ल्यावर दुसर्या दिवशी सकाळी काय मिळनार तर 'ओथेंटीक लेंडी'

In reply to by पगला गजोधर

गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच आवडला मला गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच आवडला मला असाच १तांब्या टी शर्ट (अता!)त्यांना http://freesmileyface.net/smiley/animals/emoticon-elephant.gif देऊ.... चला!!! http://freesmileyface.net/smiley/tongue/tongue-004.gif

In reply to by पगला गजोधर

ह्या माणसाच्या मापात अधांतरी तांब्या दिसतोय ते ठिकाय गजोधरभैय्या . पण वल्लीच्या मापाच्या टीशरटावर त्याचे घंगाळ होईल. ;) वल्ल्याव हल्का घे रे (तांब्या)

=))

आता ते मगच्या ८ टीशर्टांचं आन ५ फ्लेक्सबोर्डांचा काम कधीचं अर्धवट ठेवलंय ते पुरं करायाला घ्या ..

प्रत्यक्ष वापर आणि काल्पनिक डिजाइन - या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . टीशर्ट डिझाईन ला नियम लावायचा म्हटलं तर किमान ५० टक्के टीशर्ट वर बंदी घालावी लागेल. असो . अवांतर - अन्य कुणीतरी असे डिजाईन करणं थांबवलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल ;-)

कायतरी कारणं काढून आमचे टीशर्ट्स दिले नाहीत इतकं खरं! मराठी माणसाला कष्ट नकोत करायला अगदी!! दुत्त!

केवळ मागे, एका अख्ख्या होल धाग्यात, कबूल केलेला आमचा टी शर्ट आम्हाला द्यायची टाळाटाळ म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत, हे आम्ही पूर्णपणे जाणून आहोत. याच्या निषेधात आम्ही टीशर्ट परत करायच्या विचारात होतो. पण ध्यानात आले की तुम्ही अजून आम्हाला टीशर्ट दिलाच नाहीत... आणि आमचा टीशर्ट तुम्हाला देऊन आम्हाला सलमान होण्याची इछा अजिबात नाही... तेव्हा हा आमचा असा उगाच कोरडा णिषेध ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही येऊ घातलेला म्हणजे आगावू (टी शर्ट देणारा आगावू ) नाहीतर अ‍ॅडव्हानसम्ध्ये परत दिलाय असे सांगा. म्हणजे त्याला टी शर्ट द्यावाच लागेल...हा का ना का कॅप्टन मॅती मारो

निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन. टीशर्ट डीझाइनच्या संदर्भात फुकट देण्याबद्दल दोन वर्षांआधीच इत्थंभूत अभ्यास केला असल्याने याबद्दल फुकट्या किंवा चापलूस लोकांना उगाच माहिती होणे डीझाईनर्ससाठीच घातक ठरू शकते हे माहित आहे. जसे लेडी गागा सामान्यांपासून दूर राहणे आवश्यक, नाहीतर त्याचा 'आठवले' होतो, तसंच हेही आहे. आपल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! इच्छुक आपल्या जबाबदारीवर अधिक संशोधन करू शकतात.

In reply to by संदीप डांगे

जसे लेडी गागा सामान्यांपासून दूर राहणे आवश्यक, नाहीतर त्याचा 'आठवले' होतो, तसंच हेही आहे.
लोलियत! __/\__

"काल्पनिक" असा शिक्का मारलेले सत्याच्या जवळपास जाणारे डिजाइन्स बहुधा कायद्याच्या कचाट्यात सापडत नसावे . तरीही योग्य शहनिशा करूनच डिजाइन्स प्रकाशीत करावे . उगाच आम्हाला दर्शनाची मेजवानी देण्याच्या नादात तुम्हाला वैयक्तिकरित्या काही नुकसान होऊ नये असे वाटते . तरी शक्य असल्यास (आपल्याला कुठलाही त्रास न होता) पुढील भाग प्रकाशीत करावेत . ही नम्र विनंती. मुद्दाम काहीतरीच

In reply to by पिशी अबोली

आता तर आमचा प्रतिसादही सेफ रहात नाही. लै बेक्कार असहिष्णुता चाल्लीये बॉ मिपावर !

मला वाटते डार्क टी शर्टच्या माहीतीत जे धोके आहेत ते कदाचित मिपाकर समजून घेऊ शकनार. व्हाइट टी शर्ट घालून मिसळपाव खायला हरकत नसावी.

धाग्याच्या पन्नाशी निमित्त मा.अभ्या आणि शब्द्प्रभू प्रचेतसजी यांचा शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार खालील टी-शर्ट आणि सव्वाशेर पथेटीक नसलेली ताजी ताजी भेंडी देऊन करण्यात यावा ही माननीयांना नम्र विनंती. ts_arnie ता.क: डिझाईन अजिबात ढापलेले नसून आत्ताच ताजे छापलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by नीलमोहर

पारच गळपाटलाय प्रतिसाद... सत्काराची घाई नडली अजून काय, ;) " धाग्याच्या पन्नाशी निमित्त मा.अभ्या आणि शब्द्प्रभू प्रचेतसजी यांचा शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार खालील टी-शर्ट आणि सव्वाशेर पथेटीक नसलेली ताजी ताजी भेंडी देऊन करण्यात यावा ही माननीयांना नम्र विनंती. * टी शर्ट * ता.क: डिझाईन अजिबात ढापलेले नसून आत्ताच ताजे छापलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी." कृपया असे वाचावे सर्वांनी :) [कॉलिंग सं.मं]

In reply to by नीलमोहर

मध्ये: नीमोप्रीमोजीमो आणि तमाम सेल्फी(श) नसलेले कार्यकर्ते असे ल्हायचे र्हायले काय? शंखा-नै-वाजम

In reply to by नीलमोहर

@ फैण्डिंग्नीमो, चित्र पण जरा गळपाटलेय. त्यो कूंकूवाला अर्नॉल्ड असा होता. a त्यातल्या आद्य समाजहितेला डावलल्याबद्दल एक सोलापुरी टर्कीश बीच टॉवेल देऊन निषेध.

In reply to by अभ्या..

मैंसाहेबांचा असा शिवाजीनगरसोबत जाहीर फोटो लावल्याबादल तीव्र णीषेध…

In reply to by नीलमोहर

करेक्ट... ते चित्र "माहेरचा कमांडो"चं आहे.

झकास.

धाग्यानिमित्त वाचकांच्या शब्दकोशात पडलेली भरः पथेटिक भेंडी, अरेबिक शेंडी, अटलांटिक रेडा, अंटार्क्टिक मेंढी, मांजरचोर, चादरसोड... कुठे नेऊन ठेवलीय मराठी मिपाची ??

In reply to by नीलमोहर

कलेक्शन करणारच होतो. धाग्याचा विषय अभ्या ची कुचंबणा असा असताना धागा भरकटवणार्‍या सर्व ज्येश्ठ मिपाकरांना पाहून एक ड्यु मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. - सिंथेटीक भांडी

In reply to by अभ्या..

यांच्यापेक्षाही चिवट एक सरजी होते इथे ..हेवनवासी झाले बिचारे ! बादवे गेंडी ही गेंड्यापेक्षा चिवटपणात सरस असते का ?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रतिसादातला (उठवलेला) (भेंडी)बाजारही आवाल्डा!
तुम्हाला आवड्ला, तर मग आम्ही धन्य जाहलो._/\_ -म्हैसा