Skip to main content

'श्रीमानयोगी'

लेखक अक्षया यांनी बुधवार, 09/12/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं, मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं. आणि एके दिवशी सहज 'श्रीमानयोगी' कादंबरी हातात पडली.

काकासाहेबांची चड्डी - एक टिप्पणी

लेखक भृशुंडी यांनी बुधवार, 09/12/2015 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही नाटकं अशी असतात की जी आपल्या मनात घर करून जातात. आणि नंतरही आपण त्यावर विचार करत रहातो. असंच एक नाटक पाहण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला, त्याबद्दल हे काही थोडं लिहिलं आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ १९९० सालानंतर समाजात जो एक चंगळवाद फोफावला आहे, त्यावर आडून आडून टिप्पणी करणारं आणि उपहासाने त्याकडे बघणारं हे नाटक म्हणजे "काकासाहेबांची चड्डी". नाटकाची पार्श्वभूमी - संदेश देऊलकर ह्या नवोदित नाटककाराने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी हे नाटक लिहिलं. संदेशच्या आधीच्या कथा आणि कवितांमधे जी एक विखारी पण फालतू चमक जाणवते, ती ह्याही नाटकात आहे. मेकॅनिक्समधे सतत ३ वेळा के.टी.

'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 09/12/2015 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बर्‍याचदा हे असं व्हायला लागलंय ....एखादी खुप पुर्वी ऐकलेली कवित्या मनाच्या गाभार्‍यात कोणत्यातरी अंधार्‍या कोनाड्यात खोलवर दडुन बसावी वर्षोनवर्ष..... अन कधीतरी अचानकच जसे रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीवाची सर कोसळुन जावी तशी काहीशी कविता मनाच्या अंगणात भरभरुन बसरावी अन सारेच कसे चिंब चिंब होवुन जावे ! आजकाल बर्‍याचदा हे असं व्हायला लागलंय ________________________________________________________________________________

चॅप्टर १ :" NOW "

साधारण रात्रीचे साडे नऊ वाजुन गेले होते.

माह्या मायेचं कारटं

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 08/12/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
माह्या मायेचं कारटं जाई खळ्यात मळ्यात गाऊनी अभंग खेळी शेणात शेणात माह्या मायेचं कारटं चाले हसत रुसत भाळूनी चंद्राला शोधी आभाळ आभाळ माह्या मायेचं कारटं सुटे ऊन्हात रानात शोधीत पाण्याला होई छप्पर छप्पर माह्या मायेचं कारटं निजे सुखात दु:खात होऊनी भाकरी जाई थापत थापत
काव्यरस

विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 08/12/2015 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 ---- कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या निळ्या वायूच्या लगडी सलग कधी ? कधी अन् जडतेला त्या मनामनाचे आले पोत ? - बा. सी. मर्ढेकर ---- मर्ढेकरांचा हा प्रश्न कळीचा आहे. ‘काही नाही’ या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला?

पालखेडची लढाई - पहिले बाजीराव पेशवे

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 08/12/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एखाद्या पराक्रमी अाणी बुद्धिवान सेनापतीचे नाव घ्यावे लागले तर ते पहिल्या बाजीरावांचे घ्यावे लागेल. ’पालखेडची लढाई' ही पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाची लढाई. ही लढाई 28 फेब्रुवारी 1728 रोजी पहिले बाजीराव पेशवे व हैदराबादचा निझाम यांच्यात महाराष्ट्रातील नाशिक शहराजवळील पालखेड येथे झाली. या लढाईत मराठ्यांचा विजय झाला. पालखेडची लढाई बाजीरावांच्या युद्धतंत्राचे तसेच गनिमी काव्याचे उत्तम उदाहरण आहे.

थांग या आयुष्याचा

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 08/12/2015 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
थांग या आयुष्याचा शोधते आहे नशीबाचे कोडे सोडवते आहे पालवतात आशा आणि गळतातही तरीही अनुभवांचे जळते निखारे घेउन जीवनाची आस बांधते आहे आपलेच करतात आपल्याला घायाळ सत्याला सामोरे जाते आहे सर्व नाती आयुष्याच्या ठिगळातून कालांतराने हळुहळु गळून गेली रोज नवनवीन मैत्र जोडून नव्या उमेदीने आयुष्याला सांधते आहे
काव्यरस

पैस - दुर्गा भागवत

लेखक प्रसाद प्रसाद यांनी मंगळवार, 08/12/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ वाचून खरंच आनंद वाटला. पैसविषयी आधी ऐकलं होतं, पुस्तक वाचताना लेखिकेने हे स्वान्तसुखायच लिहिले असावे असं वाटत राहते. या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे. पहिला ‘स्व‍च्छंद’ ज्यांत याच स्वान्तसुखाय लेखनाची, लेख लिहिण्याच्या ऊर्मीची आणि हे लेख लिहिण्याची सुरुवात कशी झाली हे दुर्गाबाई सांगतात. आत्मचरित्रपर लेख. साधा वाटतो पण लेखिकेच्या सहज सुलभ लेखन शैलीमुळे. छोटासा पण उत्तम आहे. दुसरा लेख ‘पैसाचा खांब’ या लेखावरूनच पुस्तकाला पैस नाव दिले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या छोट्या खांबावरच्या पूर्ण अवकाशाला ज्ञानेश्वर पैस म्हणतात.

सुटलेल्या पोटाची कहाणी -४

लेखक Anand More यांनी मंगळवार, 08/12/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ __________________________________________________________________________________ जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.

वंशशोध

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 08/12/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
त्या करुण हाकासुध्दा त्याला रोखु शकल्या नाहीत तो खोल, खोल अगदी खोल गर्तेत शिरत होता, प्राक्तनाच्या फुटक्या काचभांड्याचे चरे पायात शिरत असताना देखील ! माणसाच्या मुळाच्या उगमापर्यंत जाउन आलेला तो सनातन सत्य वाहत दुर्बोधाच्या जाणिवा नाकारत अज्ञात काळगुहेत शिरत प्रलयंकारी भविष्यकाळास आव्हान देत होता ! परंपरांच्या ओझ्यांचे जोखड मानेवर काही वळ ठेवून होते जे नाकारतोय त्याची जाणीव धिक्कारलेल्या नजरांचे आसुड सार्यारचे मिश्रण ओराखड्यांचे अनाकलनीय चित्र रेखाटत होते ! वंश बुडाल्याचे दुख कधीच नव्हते जिथे शेपुट गळाली अन् माणुस दिसला त्या जागेच्या शोधात कधीतरी परागंदा व्हावेच लागणार होते ! कालवृक्षाच्