Skip to main content

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 09/05/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही.

आखाजीना सन

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/05/2016 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा - नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात) झोका टांगेल शे दारात आंबानं पान हिरवंगार झोका जावूदे जोरदार गवराई चला ग मांडूया पुजा तिची करूया आखाजीना सन शे माहेराला बरकत दे माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले सासर मधार सुख दे (अहीराणी भाषेवर एवढी हुकूमत नसल्याने चुकभूल द्या घ्या) - पाभे
काव्यरस

आखाजीचा सण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 09/05/2016 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
गवराईचा सन आला गवराईचा सन आला या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही - पाभे
काव्यरस

समरस व्हावे ऐसे

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/05/2016 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
थांबल्या पळी या प्रेमाच्या क्षण एक तू डोळ्यांत पहा कृत्रीमतेचा उतरवून साज रेशमी मिठीत सजून पहा दे शब्दांना आधार तुझ्या गंधीत मौनाच्या साथीचा दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे थरथरत्या हळव्या अधरांचा शीतल छाया, मी घनदाट तरू तू वळणारी खळखळ सरिता मी एक डोलता प्राण अचल तुज पाहून, अविचल वाहता मी धागा अतूट प्रितीचा तू फूल एक नाजूकसे गुंफता प्रित, गुंतता हृदय प्रेममाला सुरेख शोभतसे परिणीती, धुंद श्वासांची लयदार काव्यात व्हावी सूर जुळता ही तमवसने कोमल स्वरात न्हावी मी स्वत:स विसरून जावे तू असे मला निरखावे डोळ्यांनी तन्मयतेने मग युगल गीत गावे संकोच मनी, भारल्या क्षणी ना स्पर्शे उभय चित्तांशी तू अवघी तुल

सविता कोर्कू... भाग - १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 09/05/2016 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
सविता कोर्कू मी कर्नल जगदाळे. कर्नल विजय जगदाळे. (निवृत्त) मूळ गाव जामखेड. सध्या मु.पो. पुणे. एक घडलेली गोष्ट सांगतो. मरण्याआधी ती मला कुणालातरी सांगितलीच पाहिजे. कथा आहे एका मुलीची... असे काही शक्य नाही... असे तुम्ही म्हणालही कदाचित, पण असे घडले म्हणून ही कथा जन्माला आली हे लक्षात घ्या. शिवाय तुमचा यावर विश्वास बसतोय की नाही याने मला काहीही फरक पडत नाही. मला ती कुणालातरी सांगायची आहे बस्सऽऽऽ ! पहिली भेट. यावेळी माझी बदली पुण्याला झाली होती. ....या मुलीची आणि माझी पहिली भेट झाली ती एका चोरीच्या प्रकरणात. म्हणजे तिनेच चोरी केली होती व ती चोरी होती माझ्या मुलीच्या मनगटी घड्याळाची.

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 09/05/2016 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ !

सैराटच्या निमित्ताने....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 08/05/2016 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिनेमा बघीतला नाही आणि कदाचित बघणारही नाही.त्यामुळे, "सैराट" न बघताही प्रेमी युगलाची जात एक नसतांना पण संसार सुखी होवू शकतो का? ह्या विषयीचे मी पाहिलेल्या घटना लिहित आहे. १. मुलगा गुजर आणि मुलगी को.ब्रा.मुलगा डिप्लोमा तर मुलगी एम.एस.सी. दोघांचे प्रेम जमल्यावर, मुलाला दम मिळाला.मुलाने आणि मुलीने पळून जावून लग्न गेले. आज दोघेही सुखाने नांदत आहेत. २. मुलगा तामिळ आणि मुलगी कोब्रा.मुलाच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि दोघेही संसारात सुखी आहेत. ३. मुलगा कोब्रा आणि मुलगी ९६ कुळी मराठा.मुलीच्या घरच्यांचा विरोध असून पण दोघांनी लग्न केले आणि सुखाने संसार करत आहेत. ४.

हरिश्चंद्रगड – उत्तरार्ध : साधले घाट

लेखक हकु यांनी रविवार, 08/05/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड – पूर्वार्ध : नळीची वाट आता पुढे - आज माझा दिवस हरिश्चंद्रगडावर उशिराच उगवला. आजसाठी सकाळचा काहीही कार्यक्रम ठरलेला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी आलो होतो तेव्हा तारामती शिखर बघून झालं होतं. सकाळी उठून चहा नाश्ता करून साधले घाटा मार्गे उतरायचं, एवढंच ठरलं होतं. या ट्रेकचा मूळ उद्देश 'नळीची वाट' एवढाच होता मुळी. त्यामुळे बाकी काहीही कार्यक्रम नव्हता. मात्र आज झोपेतून जागं होतानाच एक मजेशीर गोष्ट घडली.

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५

लेखक ५० फक्त यांनी रविवार, 08/05/2016 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 मी बाई होते म्हणुनी ..

निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी रविवार, 08/05/2016 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आज पर्यावरणात अनेक ठिकाणी उद्रेक होताना दिसतात. देशामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पसरला आहे, पहाडामध्ये वणवे पेटत आहेत आणि संपूर्ण जगात कुठे भूकंप येत आहेत, कुठे वादळ तर कुठे लँडस्लाईड. आपल्या देशाच्या संदर्भात दुष्काळाची समस्या अगदी गंभीर स्थितीत आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, ह्या सगळ्यांसाठी आपण काय करू शकतो? ह्या विषयावर आपल्याशी बोलू इच्छितो. आजवर ह्या विषयाबद्दल जे समजून घेतलं ते आपल्याला सांगू इच्छितो. दुष्काळाच्या संदर्भात वर दिसत असलेली स्थिती ही मूळ समस्येची समोरची बाजू. समस्येचं समोर येणारं आणि दिसत असलेलं रूप.