Skip to main content

स्त्री जन्मा हि तुझी कहाणी-

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 21/04/2026 20:49 या दिवशी प्रकाशित केले.

स्त्री जन्मा हि तुझी कहाणी-

१) माझ्याकडे बर्याच स्त्रिया येतात सोनोग्राफी साठी का तर पाळी नीट येत नाही म्हणून. म्हणजे केवळ "दोनच दिवस" अंगावर जातं

सोनोग्राफी केल्यावर मी त्यांना विचारतो तुम्हाला त्रास काय आहे? त्रास काही नाही पण "व्यवस्थित" ब्लीडींग होत नाही.

परत --त्याचा तुम्हाला काय त्रास होतो?

--त्रास काही नाही पण चार दिवस व्यवस्थित ब्लिडींग होत नाही.

भूज पर्यटन- डिसेंबर २०२५

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 21/04/2026 12:54 या दिवशी प्रकाशित केले.

भूज लेख. डिसेंबर २०२५.

कच्छ  रणोत्सव जाहिराती आणि विडिओ पाहून  ठरवलं की त्या टेंटसिटीमध्ये नाही राहिलो तरी तो भाग पाहून येऊ. यासाठी कच्छमधले मुख्य शहर भूज येथे   जाण्यायेण्याची रेल्वे तिकिटे काढली डिसेंबर २०२५ मधली. रेल्वे शिवाय विमानाचा पर्याय आहेच. विमानतळ चार किमिटरवर आहे.भौगोलिक दृष्ट्या पाकिस्तान हद्दीजवळ असल्याने  भूजचे महत्त्व आहे.

भूजच्या आसपास पाहाण्यासारखी ठिकाणे...

चालू घडामोडी- एप्रील-मे -२०२६

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 20/04/2026 16:30 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी !

एप्रिल महिना आता सरत आला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मिपा आता एकदाचं नव्या रूपात आपल्या भेटीला आलं आहे. वेबसाइटवर हळूहळू सकारात्मक बदल होत आहेत आणि नवनवीन गोष्टींची भर पडत आहे. अधूनमधून मिपा जे बंद पडतं, ते पडद्यामागे सुरू असलेल्या याच तांत्रिक कामांमुळे.

शिंजीराचं घरटं

लेखक चक्कर_बंडा यांनी सोमवार, 20/04/2026 16:11 या दिवशी प्रकाशित केले.

वसंताच्या मध्यात काटेसावर बहरून येते, पांगराही फुलतो, मकरंदासाठी वेडावलेली पाखरं मग दिसू लागतात, आपल्या सुक्ष्मनळीसारख्या बाकदार चोचीने, पंखांची फडफड करीत फुलाशी लगट करणारा पिटुकला शिंजीर, कधी पिवळ्याधम्मक फुललेल्या बहाव्याच्या पुष्पगुच्छाशी जवळीक साधताना दिसतो तर कधी जास्वंदाच्या दांडीवर उलटं लटकून पंखांची फडफड करीत मकरंद चाखायची कवायत करताना नजरेस पडतो. 

डिजिटल चक्रव्यूह

लेखक ताजे प्रेत यांनी सोमवार, 20/04/2026 01:08 या दिवशी प्रकाशित केले.

आदल्या दिवशी दुपारची वेळ. स्वरालीचा फोन वाजला. पलीकडून रोहनचा मद्याच्या नशेतला आणि विकृत हसण्याचा आवाज आला.

"ऐक भिकारडे, उद्या कोर्टात काय होतंय बघच तू. तुला घटस्फोट देताना अक्षरशः रस्त्यावर आणेन. माझा वकील ॲडव्होकेट हंबीरराव आहे. तो आजवर एकही केस हरला नाहीये, त्याने सगळ्या न्यायाधीशांना पैशाने खिशात टाकलंय. पोटगीचे १५-२० लाख तोंडावर फेकेन आणि माझा अंश तुझ्याकडून कायमचा हिरावून घेईन. आणि हा... जास्त शहाणपणा केलास ना, तर 'चिन्मय भाई' तुझा कायमचा गेम करील!" रोहन बीभत्सपणे हसला आणि त्याने फोन कट केला.

सावलीतले रक्षक

लेखक ताजे प्रेत यांनी सोमवार, 20/04/2026 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये राहुल एका प्रतिष्ठित कंपनीत 'सिस्टीम आर्किटेक्ट' म्हणून काम करत होता. त्याचे राहणीमान उच्च दर्जाचे होते. त्याला आता लवकरात लवकर 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून प्रमोशन हवे होते. पण त्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा होता त्याचा बॉस, राजेश सिन्हा. राजेश मूळचा बिहारचा होता, कडक स्वभावाचा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी. तो राहुलला सतत कामाचा त्रास द्यायचा.

आशा

लेखक सागरसाथी यांनी रविवार, 19/04/2026 22:01 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या सूरामध्ये सूर मिसळून 

हसलो रडलो,

तुझ्या सूरावर डोळे मिटून 

हळूच निजलो.

तुझ्या सुरामध्ये पाऊस गातो

रेशीम गाणी,

तुझ्या सुरानी कळ्या डुलतात

धुंद तराणी.

तुझ्या सुरामध्ये असे सुगंधी

फाया अत्तर.

तुझ्या सुरातून इथे जागतो

राम निरंतर.

तुझ्या सुरासवे होवून गेली

मैफल रीती.

तुझ्या सुरातून सूर उमटावे

शुभंकरोती.

तू होतीस तोवर निसर्गात या

ऋतू बरवा,

तुझ्या पाठी कुठे उरला

मनी गारवा.

-----अभय बापट

मिसळपाव लेखन सोय - चाचणी

लेखक नीलकांत यांनी रविवार, 19/04/2026 07:09 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार, 

मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय. 

तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता. 

कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया. 

धन्यवाद.

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 18/04/2026 20:30 या दिवशी प्रकाशित केले.

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला

माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||

जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||

सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||

साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||

कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||

राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||

- पाभे
१८/०४/२०२६

काव्यरस