Skip to main content

खोमनेईची कृपा: गोबरचे राज्य

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 21/04/2026 या दिवशी प्रकाशित केले.

इराण युद्ध असेच सुरू राहिले तर: 

चुलीवरच्या जेवणासाठी गरज नाही गावाला जायची।

 खोमनेईच्या कृपेने आज घरातच पेटली चूल रे।

मर्सडीज गाडीला पहा, बैल कसे ओढतात भारी।

 रुणझुण घंटा नाद ऐकू येतो, आता पुन्हा साद देतो पुराणी।

गाय आणि गोबरचे राज्य पुन्हा आले माझ्या देशा।

 दुधापेक्षा गोबरला आज भाव जास्त मिळाले बघा।

गोबराच्या गोवऱ्यांसाठी सरकारी राशनचे दुकान।

 लाकूडतोड्याला सापडली आज सोन्याची कुऱ्हाड।

हे खोमनेईच्या कृपेचे फळ, प्रगतीचे नवे रूप दिसले।

 चूल, गोबर, बैलगाडी...

काळचक्र पुन्हा फिरले। 

काव्यरस

वाचने 47
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया