अझहर...
कथाकथनाचं सगळ्यात प्रभवी माध्यम कोणतं असेल तर नक्किच चित्रपट हेच आहे यात दुमत नाही. मात्र चित्रपटातुन कथाकथन करताना बर्याच गोष्टिंच्या अनुशंगान, त्यांच्या ढंगानं कथेत आणि कथनाच्या पद्धतीत बदल करायचे असतात आणि ते आवश्यकही असतच.
नेते
एक तर तो कधेमधेच कॉलेजला येतो आणि दुसरं म्हणजे वर्गात आल्यावर तो एखाद्या राजकीय पक्ष्याच्या कार्यालयात आल्यासारखा वागतो.
म्हणजे त्याची एंट्रीच कशी जबरदस्त असते पहा;
वर्ग चालु होऊन चांगला अर्धा तास झालेला असणार, एखादा पॉइंट घेऊन शिक्षक रंगात आलेले असणार, आणि तेवढ्यात हा उपटतो;
"आत येऊ, सर"
खरं तर त्याचे विचारणे कधी प्रश्नार्थक नसतेच कारण हे वाक्य संपेपर्यंत त्याचा संबंध देह वर्गात घुसलेला असतो. आणि शिक्षकांना
"या! या! या!" म्हनुस्तव्हर याने पहिल्या बेंचवरच्या पोराच्या हातात हात देऊन, कोपऱ्यात बसलेल्या पोराला डावा हात उंचावून 'सलाम' करत, पहिला बेंच मागे टाकलेला असतो.
उपनिषदे (४)
===================================================================
उपनिषदे :
(१)...
मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः
माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच!
अनेक वेळा खूप वैताग येई.
सापडला पठ्ठ्या एकदाचा!!
एक संघ मैदानातला - भाग १२
केक खाताना दादाचं सेंटी होण उगाच मनात घर करून बसलं होत. बाप आपल्या मुलीचा किती विचार करत असतो ते जाणवलं.
थोड्यावेळाने मँच होती त्या दृष्टीने मानसिक तयारी करण गरजेचं होत पण काही केल्या पुढचा गियर पडत नव्हता. मँचसाठी लागणारा अर्लटनेस, अँग्रेशन मला माझ्यात कुठेच दिसत नव्हत. ह्या टुर्नामेण्टला मी कॅप्टन होते. त्यामुळे माझा मेंदू घोडयापुढे धावण अपेक्षित होत पण इथे तर मन आणि मेंदू कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नव्हते. "देवा… आता काय करू? " मी बाथरूमला जाऊन आले. उगाच तोंडावर भरपूर पाणी मारलं. ग्राउंडमध्ये जाऊन अंदाज घेतला तर तिसरी मँच आत्ता सुरु झाली होती.
आंब्याचे सासम/सासव
सध्या मिपावर आंबा पाकृचा पाऊस पडतोच आहे तर आपण पण थोडे भिजवुया या प्रांजळ विचाराने प्रेरित होउन ही पाकृ देते आहे. ही पारंपारिक सारस्वत पा़कृ आहे. ह्या पाकृसाठी खास रायवळ आंबे उत्तम. कोकणात, गोव्यात ह्या जातीचे आकाराने मोठे आंबे पहावयास मिळतात. मुंबईत मात्र लहान लहान असतात. पण चवीला गोड असले की झाले.
तो प्रवाही प्रवास…!
नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता.
थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती.
मिसळपाव
