Skip to main content

दोन मूठ राख

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/07/2016 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
काव्यरस

अंबाड्याचे लोणचे

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/07/2016 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ किलो अंबाडे पाव किलो जाडे मिठ (नसेल तर घरचे बारीक चालेल) १०० ग्रॅम राईची डाळ १ चमचा मेथी १ छोटा चमचा हिंग ४ चमचे हळद ८ चमचे लाल तिखट तेल पाव किलो (गरज लागल्यास जास्तही लागू शकत).

कचरापेटी - शतशब्दकथा

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 21/07/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची नेहमीची बेल वाजली. कचरापेटी घेऊन जाण्या-या बाईची ती रोजची वेळ होती. आज त्या कच-यापेटीतून खुपच कुबट वास येत होता. नाक दाबत तिच्या हातात कचरापेटी दिली. अगदी निर्विकार चेह-याने तिने ती क्षणात रिकामी करुन मला परत दिली. या प्रसंगाने विनाकारण मला उदास करून टाकले. दुस-यादिवशी मी मुद्दाहुन ताजी फुले आणुन ती कचरापेटीत भरुन ठेवली. सकाळी जेव्हा मी तिला ती कचरापेटी दिली तेव्हा काहीही विचार न करता , न पहाता तिने ती पेटी तिच्याकडच्या एका मोठ्या डब्यात ओतली... मग लक्ष्ात आले की आपल्याला कच-याची इतकी सवय झाली असते की त्यात फुले जरी पडलेली असली , तरी आपण कचरा समजून ती फेकून देत राहतो.

सुलतान नव्हे ,तर सुलताना

लेखक एकुलता एक डॉन यांनी गुरुवार, 21/07/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुलतान ची बरीच परीक्षणे वाचली ,मिपावर पण पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली अनुष्का शर्मा एक मुलगा आपली छेड काढतो तर हुरळून ना जात उलटे उत्तर देणारी त्याला काहीतरी बन असे शिकवणारी स्वतःच्या carrer चा त्याग करणारी गरज पडली तर नवऱ्याला अक्कल शिकवणारी व त्याचा त्याग करणारी ते पण शैक्षणिक दृष्ट्या मागास लेल्या पुरोगामी समाजातून तिला लाख लाख सलाम

भेट.. तुझी अन माझी...

लेखक प्रसाद_कुलकर्णी यांनी गुरुवार, 21/07/2016 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात काही 'व्यक्ती' अशा भेटतात, कि ज्यांचा सहवास किंवा भेट खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या मनावर खूप खोल छाप मारून जातात.. कुठे तरी घर करून बसतात... आणि नंतर तुम्हाला परत-परत आठवत राहतात :P :P मी त्या वेळी इंजिनीरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होतो... लोणी वरून बसने घरी जात होतो... 'राहुरी'च्या बस स्टँड वर अशीच 'ती' (व्यक्ती :P ) मला नजरेस पडली... ती बहुदा तिथेच कुठेतरी कॉलेजला असावी... बसची वाट पहात उभी होती... मस्त दिसत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंड ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने...

निर्गुणी भजने‬ (भाग २.१) - सुनता है गुरु ग्यानी

लेखक Anand More यांनी गुरुवार, 21/07/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे निर्गुणी भजनांची सिरीज सुरू केली होती, पण तेंव्हा मनमेघ यांनी देखील त्याच विषयावर आणि वेगवेगळ्या निर्गुणी भजनांवर माझ्या आधी सिरीज सुरू केली होती. त्यामुळे मी थांबलो. नंतर इथे पोस्ट करायचे राहूनच गेले. 'आता आमोद सुनांस जाले' वर परवा लिहिलं तेंव्हा आठवलं की मिपावर निर्गुणी भजनेची सिरीज टाकायची राहून गेली आहे. मग इथे ती सिरीज टाकायच्या विचाराने उचल खाल्ली. जरी ही सिरीज आठ भागांची असली तरी यात वेगवेगळी भजने नसून एकाच भजनासोबत मी केलेली मुशाफिरी आहे. आज जेंव्हा मी हे वाचतो तेव्हा मला जाणवते की मी लिहिताना अनेक ठिकाणी पसरट झालेलो आहे. पण ते कुठे एडिट करू ते कळण्याइतपत समज मला आलेली नाही.

नंदनवन

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 21/07/2016 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
चंदीगढच्या त्यांच्या घरात गोरे-पान, नाकेले, उंच रैनाजी टी व्ही समोर बसून काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीविषयीची बातमी पाहत होते. समोरच सोफ्यावर तिशीतला मुलगा अविनाश आणि स्वयंपाकघरातून त्यांची पत्नी आरतीदेवी हेही लक्ष देऊन पाहत होते. काश्मिरी पंडितांचं हे विस्थापित कुटुंब. १९९० च्या अखेरीस अतिरेक्यांनी सोपोर मधल्या काली मन्दिराच्या केलेल्या विध्वंसानंतर तिथले पुजारी असलेले रैनाजींचे वृद्ध वडील आणि इतर रैना कुटुंबीय आधी दिल्लीला आणि तिथून चंदीगढला येऊन स्थिरावले होते.

पाहुण तुमी कोण गावचं?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 20/07/2016 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? लाल गावचं कि हिरव्या गावचं पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं. निळ्या गावचं कि टोपी गावचं. पाहुणं म्हणे, ऐका राव मान मोठा मिळे ज्या गावात चरायला मिळते सारे रान तोची आहे आमुचा गाव. सरडा आमचा गुरु भाई त्याच्या सवे रंग बदलतो. शिकारीच्या गावी मुक्काम ठोकतो. या गावचं, त्या गावचं पाहुणं तुमी कोण गावचं? टीप: या कवितेचा राजनेत्यांशी काही एक संबंध नाही.
काव्यरस

भारतरत्न सचिन....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी बुधवार, 20/07/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच..

बऱ्याचदा वाटतं....

लेखक वटवट यांनी बुधवार, 20/07/2016 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा वाटतं.... वागावं अगदी बावळटासारखं.... शर्टाच्या वरच्या दोन गुंड्या लावूच नयेत... लागली असावी खूप भूक...