Skip to main content

सॉल्विंग द मॅन-कोलोन जिगसॉ : उर्फ एनिमाचे भांडे

लेखक चित्रगुप्त यांनी मंगळवार, 01/11/2016 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
. डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे.

तुझ्या आठवणीत...

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 01/11/2016 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या आठवणीत... बहरलेल्या वेलीवर एक कळी खोळंबली तुझ्या आठवणीत ति अजून नाही उमलली गाभाऱ्यातील ज्योत मंदपणे तेवली तुझ्या आठवणीत हळूच लवलवली आभाळातील चांदणी रात्रभर गुरफटली तुझ्या आठवणीत पहाटे ति चमचमली राजेंद्र देवी

दिवाळीचे दिवस - डॉ. सुधीर रा. देवरे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/11/2016 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणी दिवाळी आली की नव्या कपड्यांपेक्षा फटाकड्यांचीच जास्त ओढ लागायची. पंधरा दिवस दिवाळी पुढे रहायची अशा बेताने मी आण्णांच्या मागे फटाकडे आणण्याचे टुमणं लावत असे. दुसरीकडे माझी आकाशदिव्याची तयारी सुरू व्हायची. तेव्हा सुध्दा विरगावला व्यापार्‍यांच्या दोन तीन घरांमध्ये रेडीमेड आकाशदिव्यांची फॅशन सुरू झाली होती. पण सर्वच गाव टोकरांच्या कामड्यांपासून तयार केलेल्या घरगुती आकाशदिव्यातच समाधान मानणारे होते. मला विमान आणि चांदणीचे आकाशदिवे करता येऊ लागले होते. म्हणून एका वर्षाआड मी आकाशदिवा करत असे. सलग दोन वर्ष मी तोच आकाशदिवा लावत असे.

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 01/11/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.

प्रो.के एस कृष्णमुर्ती

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 01/11/2016 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषशास्त्र हा ज्यांचा आवडीचा विषय आहे त्यांना, कृष्णमुर्ती ही ज्योतिषपध्दती नक्कीच परिचयाची किंवा निदान ऐकून तरी नक्की माहिती असेल. कोण होते हे कृष्णमुर्ती? काय योगदान होतं त्यांचं ज्योतिषशास्त्रात? या कृष्णमुर्ती पध्दतीचे जनक प्रोफेसर के.एस.

विज्ञानकथा आहेत का कुठे?

लेखक kool.amol यांनी मंगळवार, 01/11/2016 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसाने विज्ञान क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वैज्ञानिक हि मराठी परंपरा.विज्ञानकथा हा प्रांत मराठीला तसा चांगलाच परिचयाचा आहे. इथे देखील आपला ठसा हा बऱ्यापैकी ठळक म्हणावा असाच. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके यांनी विज्ञान लेखनाला चांगले दिवस आणले. पण हि परंपरा कुठेतरी थिजली आहे असे वाटते. मराठी साहित्यातील हा रंग फिकट होतो आहे असे नाही का वाटत? दिवाळी अंकातदेखील अगदी मोजकच म्हणता येतील इतक लिखाण पण दिसत नाही. काय कारण असावीत या परिस्थितीला?

कोल्हापूरकर आहेत का कुणी?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 31/10/2016 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मिरचीच्या लागवडीच्या निमित्ताने, येत्या २-३ दिवसांत, कोल्हापूरला जाण्याचा विचार आहे. ह्या वेळी आमची सौ. पण आमच्या बरोबर असेलच. ह्या निमित्ताने कोल्हापूरकरांना भेटता येईल म्हणून हा धागा प्रपंच. कळावे, लोभ आहेच, तो वाढेल ही खात्री पण आहे. आपलाच, मुवि.

फक्त तुझ्यासाठी...!

लेखक Bhagyashri satish vasane यांनी सोमवार, 31/10/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी खुप आठवण आली तर काय करु? तुलाही माझी आठवण करुण देऊ की एकटीच तुझ्या आठवणीत झरु तुझ्याशी बोलावसं वाटलं तर काय करु? स्वत:शीच गप्पा मारु की अबोल राहुन मौन व्रत धरु तुला बघावस वाटलं तर काय करु? तुला शोधत राहू की स्वत:ला एकांतात नेऊ तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करु? तुझा पहिला स्पर्श आठवू की तु आता माझा नाहिस ही मनाला जाणीव करुन देऊ तुझी आठवण घेऊन जाऊ की तुला विसरण्यासाठी जीव देऊ...!
काव्यरस

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 31/10/2016 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच

सायकलिंग

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 31/10/2016 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, ट्रेकिंग कमी करून सायकलिंग सुरु करावे असा विचारएक दोन वर्ष सुरु होता.गेल्या मे मध्ये जालोरी पास सायकल ट्रेक केल्यावर तर निर्णय पक्का झाला होता.स्वताच्या धरसोड स्वभावाची खात्री असल्याने गेल्या वर्षी साधीच हिरोची गिअर वाली सायकल घेतली होती, पण आता खात्री वाटू लागली कि काही वर्षे तरी आपण सायकलिंग करत राहू. त्यामुळे गेल्या २०तारखेला , scott sub cross 40 असे मॉडेल चे नाव असलेली सायकल घेतली.(मला यातलं फार काही कळत नाही) सलग दोन दिवस ६०/६५ किमी सायकलिंग केले. एकदिवस अंबरनाथ ते नेरळ व दुसऱ्या दिवशी अंबरनाथ ते दिघा असे. त्यानंतर सलग पाचही दिवस कामावर गेलो.