आळशांची कहाणी (अंतिम भाग )
उद्घाटनाच्या दिवशीचा कार्यक्रम खालील प्रमाणे होता. :-
१) दरवाजावरची फीत कापणे.
२)राजेसाहेबांचे स्वागत व सत्कार
३)राजेसाहेबांचे भाषण
४)पदवीदान समारंभ
प्रथम मुख्य शृंगारलेल्या दरवाजाला लावलेली फीत राजेसाहेबांनी कात्रीने कापून विद्यालयाचे उद्घाटन झाल्याचे स्वतः जाहीर केले. मग राजेसाहेबांचा थोडक्यात परिचय प्राचार्यांनी करून दिला. तेच कसे योग्य राजे आहेत हेही विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवले. इतर विद्यार्थी व पदवीची अपेक्षा करणारे विद्यार्थी आपापल्या बिछान्यांना व्हील चेअर सारखी चाके बसवून , ते ढकलत तिथे आलेले होते.
मिसळपाव