|| आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज ||
या उल्लेखातून अनेक प्रश्न उद्भवतात - घुसलखाना याचा शब्दशः अर्थ स्नानगृह. तिथे दरबार का भरवला होता?
शहाजहान बादशाहने आग्र्याच्या किल्ल्यात नवीन इमारती बांधल्या. त्यावेळी बाहेरच्या पटांगणात असणारा दिवाण-इ आम-ओ-खास म्हणजे आम आणि खास या सर्वांसाठी असणारा दिवाणखाना (हॉल), त्याच्या आतल्या चौकातील दिवाण-इ-खास असा दुसरा दिवाणखाना हे दरबारासाठी वापरले जात.
याशिवाय सर्वात आतल्या भागात, जिथे जनानखान्यात असणाऱ्या स्त्रिया सुरक्षित वावरू शकतील अश्या भागात शहाजहान बादशाहने एक फार सुंदर आणि सुबक असा ऐवान म्हणजे हॉल बांधला असा उल्लेख आपल्याला लाहोरी याच्या बाद्शाहनाम्यात सापडतो. या जागी नवीन वर्षाच्या आरंभी अथवा बादशहाच्या वाढदिवशी खास दरबार भरत असे. त्या वेळी बादशहाची तुला होत असे आणि जनानखान्यातल्या महत्वाच्या स्त्रिया अलंकार, रत्ने, वस्त्रे बादशहाच्या तुलेसाठी देत असत. शिवाजी महाराज औंरंगझेबाला भेटले त्या वेळी बादशहाच्या राज्यारोहणाचा असाच मोठा खास उत्सव चालू होता आणि त्यानिमित्त बादशहाने खास दरबार घुसलखान्यात भरावला होता. इथेच औरंगझेब शिवाजी महाराजांना भेटला.
दुर्दैवाने शिवाजी-औरंगझेब भेटीचे अथवा औरंगझेब बादशहाचे या दरबाराचे असे चित्र उपलग्ध नाही. पण काही दशके अगोदर शहाजहान बादशहाचे अगदी याच हॉल मधले तुला होतानाचे चित्र मात्र लाहोरी याच्या बाद्शाहनामा या ग्रंथात आहे. हे एकमेव असे चित्र सध्या ब्रिटिश राजघराण्याच्या खासगी संग्रहात विंड्सर कासल इथे आहे. या चित्रावरून आपल्याला घुसलखाना इथला दरबार कसा दिसत होता, औरंगझेब बादशाह कुठे बसलाअसावा, सरदार उभे राहण्याची जागा किती दूर होती, छत्रपती शिवाजी महाराज कुठे उभे असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो.
हा ऎवान हा एका बाजूने घुसलखाना याला लागून होता असा उल्लेख लाहोरी याने केला आहे. त्याने त्या जागेची गजामध्ये मापेही दिलेली आहेत. त्यावरुन आपल्याला आजच्या लाल किल्ल्यातील या हॉलच्या जागेचा चौथरा शोधून काढता येतो. ही जागा आज अशी दिसते.
ही जागा दिवाण-ए-खासच्या अगदी समोर यमुनेच्या काठी असलेल्या गच्चीवर आहे. तिला अगदी लागूनच आजचा घुसलखाना आहे. हीच जागा आणि हा हॉल एका जुन्या नकाशात हमाम म्हणजे घुसलखाना याला लागून असलेली दिसते. या नकाशात मात्र हा हॉल शाबूत असलेला दिसतो.
या सुंदर संगमरवरी हॉलचा पुढील इतिहासही मोठा रोचक आणि शोकजनक आहे. ऑस्ट्रियन संशोधक एब्बा कोक यांनी त्याचे पुढे काय झाले याची माहिती मोठ्या मेहेनतीने जमा केली आहे.
१८०३ साली दौलतराव शिंदे यांच्या पराभवानंतर आग्रा आणि दिल्ली इंग्रजांनी शिंदे यांच्याकडून आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर १८१५ साली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याच्या हुकुमाने हा संगमरवरी हॉल तोडण्यात आला. त्यातून जे संगमरवर निघाले त्याचा लिलाव झाला. आणि त्यातले सुंदर तुकडे परदेशी इंग्लंडला नेले गेले. तिथे ते काही ठिकाणी प्रदर्शित केले गेल्यावर सध्या कोक यांच्या शोधानुसार आज या हॉलचे काही तुकडे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युसियम या संग्रहालयाच्या तळघरात काही खोक्यांमध्ये ठेवलेले आहेत.
या जुन्या चित्रात आपल्याला हॉल तोडल्यानंतर तिथे बांधलेली झोपडी आणि त्यानंतर तिचे उरलेला मोकळा चौथरा, जो आजही तसाच आहे तो दिसतो. (1876)
नंतर उरलेली रिकामी जागा (1880)
आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!
In reply to लेख,फोटो आवडले. by कंजूस
In reply to औरंगजेबासमोर वाकले नाहीत असे by आनन्दा
In reply to लेख,फोटो आवडले. by कंजूस
आज आग्र्याचा किल्ला उत्तर प्रदेश सरकारच्या ताब्यात आहे. श्री. राम नाईक यांच्या रूपाने एक मराठी व्यक्ती या राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्व ओळखून जर सरकार तिथे एखादा फलक आणि त्या जागेचे मूळ चित्र जर उभारू शकेल तर महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मानबिंदूत छत्रपती शिवाजी महाराज ज्या जागी औरंगझेबासमोर मानाने वागले त्या एका जागेची भर पडेल !!!डॉ आंबेडकर यांच्या बी आर बद्दल खुलासा करणारा लेख म. टा मध्ये प्रकाशित झाला होता. त्यातील ईमेल आयडी वर एक पत्र पाठवले होते. काही उत्तर आले नाही म्हणून त्यांच्या मुलीशी संपर्क साधला होता. ते आलेल्या मेल जरूर पाहतात पण वेळ लागेल असे म्हटले गेले. त्या नंतर नाईकांना मी आधून मधून भेटत असतो म्हणणार्या एका व्यक्तींनी पाहतो काय झाले ते असे म्हटले होते. जे झाले ते झाले. या निमित्ताने त्या मेलची आठवण झाली. त्यातील मजकूर काय होता याची कोणी उत्सुकता दाखवली तर ती शोधून सादर करेन.
In reply to ताजमहाल ? by रमेश आठवले
In reply to पु ना ओक यांच्या पुस्तकात असे by मनो
In reply to पुरावा by रमेश आठवले
In reply to आठवले सर, एका लाकडी by मनो
In reply to लाकडी खांब by रमेश आठवले
In reply to माफ करा... by समीरसूर
In reply to इतिहास संशोधन आणि इतिहासात by आनन्दा
In reply to बरोबर आहे...पण by समीरसूर
In reply to माफ करा... by समीरसूर
In reply to इतक्या माहितीपूर्ण आणि मेहनत by उपेक्षित
In reply to तुमचा सल्ला by समीरसूर
In reply to चीलमाडी समीर काका, नका मनाला by उपेक्षित
In reply to माफ करा... by समीरसूर
In reply to इतिहासातल्या वांग्याची आणि by मनो
In reply to इतिहासातल्या वांग्याची आणि by मनो
In reply to मनो, by भंकस बाबा
In reply to समीरसुर सारख्या लोकांच्या अपेक्षेकड़े by समीरसूर
In reply to समीरसुर साहेब, by भंकस बाबा
In reply to इतिहास... by समीरसूर
In reply to समीरसुर साहेब, by भंकस बाबा
In reply to नाव घेतल्याने नव्हे... by समीरसूर
In reply to समीरसुर साहेब, by भंकस बाबा
In reply to समीरसुर साहेब, by भंकस बाबा
In reply to जाऊ द्या हो... by समीरसूर
In reply to इतिहासातल्या वांग्याची आणि by मनो
In reply to मान्य! by समीरसूर
In reply to मनो यांना by समीरसूर
In reply to एकाच मुद्द्यावर थोडं जास्त by मनो
In reply to इतिहासातल्या वांग्याची आणि by मनो
In reply to माफ करा... by समीरसूर
In reply to असे म्हणतात कि by जालिम लोशन
In reply to मनो, तुम्ही मिसळपाववर एक by यशोधरा
In reply to * संशोधनाविषयी गम्य नसलेले, by यशोधरा
In reply to मुळात संशोधनासाठी वेळ पुरत by मनो
In reply to मुळात संशोधनासाठी वेळ पुरत by मनो
In reply to १)बसलेले लोक तेव्हा मांडी by कंजूस
In reply to अजून काही विशेष म्हणजे बादशाह by मनो
अशा पद्धतीचं संशोधन बंद करता येईल का या दृष्टीने थोडी चाचपणी करायला पाहिजे. आपण खूप जास्त इतिहासात रमतोय असं मला वाटतं.यावर अनेकांनी सांगितलंय तेच सांगतो. इतिहासाचं संशोधन करायचं ते त्यातनं शिकण्यासाठी, रमण्यासाठी नव्हे. २.
या माहितीचा तसा उपयोग शून्य आहे.आजिबात नाही. उलट शिवाजीमहाराजांच्या सैनिकी व नागरी हालचालींचा अभ्यास करायला हवा. दुसऱ्या महायुद्धातला प्रसिद्ध जनरल माँटगोमेरीने थोरल्या बाजीरावांच्या पालखेडच्या लढाईचा केला होता तसाच. ३.
ढोबळ मानाने काय झालं होतं वगैरे आपल्याला माहिती आहे आणि तेवढं पुरेसं आहे.माहिती पुरेशी कधीच नसते. एखादा नवं तथ्य नवा पैलू उघड करून जाऊ शकतं. कुणास ठाऊक काय नवीन शिकायला मिळेल त्यातनं. ४.
आपल्याकडे इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर होतो.तसा तो व्हायलाच हवा. नाहीतर परचक्र नशिबी येईल. ५.
अतिरंजित इतिहासाचा टोकदार अस्मितेची प्रतिके म्हणून राजकीय वापर होतो.प्रस्तुत इतिहास अतिरंजित आजिबात नाही. उलट तो व्यवहारी ( = down to earth ) आहे. ६.
कित्येक काल्पनिक कथांचा जाती-धर्मामध्ये द्वेष पसरवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो.काल्पनिक कथांचा इतिहासाशी संबंध नाही. तसंच काल्पनिक कथांचा दुरुपयोग होतो म्हणून खरा इतिहास शोधायचा नाही, हे योग्य नव्हे. ७.
तिथे चीन आपल्या कित्येक लाख किलोमीटर पुढे निघून गेलंय.चीनमध्ये लोकशाही नसून हुकुमशाही आहे. ८.
इतिहासाच्या संशोधनामुळे आपण आत्ताच्या घडीला जे आवश्यक आहे ते संशोधन करत नाही आहोत.आवश्यक संशोधन कोणते व ते इतिहासाच्या संशोधनामुळे कसे अडून राहिले आहे हे कृपया स्पष्ट करावे. आ.न., -गा.पै.
In reply to इतिहास व टोकदार अस्मिता... by जॉनविक्क
In reply to ? by माहितगार
लेख,फोटो आवडले.