Skip to main content

परदेशी पाहूण्यांना फिरवून आणण्याकरिता स्थळ सुचवा

परदेशी पाहूण्यांना फिरवून आणण्याकरिता स्थळ सुचवा

Published on 07/02/2018 - 17:35 प्रकाशित
नमस्कार मिपाकर आमच्या हिंजवडी (पुणे)स्थित कार्यालयाला भेट देण्यास काही परदेशी (युरोपीय) पाहुणे येणार आहेत (यात तीन स्त्रिया , तीन पुरुष आहेत). चार-पाच दिवसांच्या भेटीत एकदा त्यांना साधारण सहा ते सात तासात फिरवून आणता येईल असे स्थळ कृपया सुचवा.
  • हे फिरणे कामाच्या दिवशी असेल
  • दुपारी तीनच्या सुमारास हिंजवडीमधून निघावे असे नियोजन आहे
  • फिरुन झाल्यावर रात्रीचे जेवण (यात मद्यपान असेल) करुन रात्री दहापर्यंत पाहूण्यांना हिंजवडीतील हॉटेलपर्यंत पुन्हा सोडता यावे
  • वाहनांची सोय आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल त्यामुळे त्याची चिंता नाही पण प्रवास फार दूरचा नसावा. खास करुन रात्री मद्यपानानंतर कुणाला जास्त दूर प्रवास नको असतो.
मी जाधवगडचा विचार करत होतो, पण गुगल मॅप्स जरी दीड ते पावणे दोन तास प्रवास दाखवत असला तरी प्रत्यक्षात हिंजवडीपासूनचा एका बाजूचा प्रवास अडीच तासापर्यंत आहे असे कळाले. म्हणजे येण्या जाण्यात पाच तास जातील, इतका मोठा प्रवास नको आहे. आणखी काय पर्याय असू शकतील ? धन्यवाद

याद्या 17293
प्रतिक्रिया 82

सदाशिव पेठ , लक्ष्मी रोड , तुळशीबाग फिरवून आणा ! टू व्हीलरने प्रवास केल्यास अजुन मजा येइल.

In reply to by कंजूस

ही कोणती ठिकाणे आहेत?मुख्य म्हणजे परदेशी पाहूण्यांना आवडू शकेल अशी ठिकाणे त्यात आहेत का ? स्वतःच्या वाहनाने जाण्याची गरज भासणार नाही. कंपनीकडून वाहनांची सोय केली जाईल.

त्यांना घाट दाखवा, एखादा गड किल्ला दाखवा (शनिवार वाडा सोडून) ! काहीही दाखवा पण भारताची खराब इमेज मनात घेऊन जातील असे कटाक्षाने टाळा.

In reply to by धर्मराजमुटके

सगळे बघुन झाल्यावर रात्री इमेज विसरायचा पोग्राम आहेच की. डोन्ट वरी धर्मराजा.

In reply to by अभ्या..

तुमच्या प्रतिसादाचा रोख विनोदी असला तरी मूळ प्रतिसाद दुर्लक्ष करण्यासारखा नाही. पाश्चिमात्य लोकांना आपल्याकडच्या गरीबी, गर्दी, गलिच्छपणा, प्रदूषण, इ. नकारात्मक गोष्टीच प्रकर्षाने दिसत असतात आणि त्यावरच चर्चा करायला आवडते. त्यामुळे शक्य असल्यास आपल्या देशाची प्रगत आणि सुंदर बाजूच दाखवा असा आग्रह मी करेन!

हिन्जेवाडी मधुन लवासा ला जावून या , सनसेट सुंदर दिसेल , येताना चांगले हॉटेल आहेत.

In reply to by कपिलमुनी

लवासाचा विचार चांगला वाटतोय , पण या महिन्यात तिथे फिरण्यासारखे आहे का ? साधारणपणे लोक तिथे पावसाळ्यातच जातात ना

आगाखान पॅलेस आणि राजा केळकर म्युझियम दाखवु शकता. तुमच्या लिमिटेड वेळामधे हे होऊ शकते. वेळ असेल ते पु.ल. देशपांडे उद्यान ही दाखवू शकता. छान आहे.

In reply to by मराठी कथालेखक

भारतीय मुर्तीकलेबद्दल पाश्चात्यांना आकर्षण असते. भुलेश्वर मंदीरात अतिशय सुंदर कोरीव शिल्पे आहेत. नक्कीच आवडतील.

In reply to by पुंबा

भुलेश्वर आवडण्यासारखेच आहे मात्र तुमच्या वेळेत ते बसणारे नाही, हिंजवडीपासून साधारण शंभर सव्वाशे किमी आहे.

In reply to by पुंबा

भाजे,कार्ला, बेडसे लेणी होऊ शकतील. लोहगड पण.होईल कारण वरपर्यंत गाडी जाते आता.

परदेशी लोकाना म्युझियम फार चांगला चॉइस ठरेल असे वाटत नाही.

केळकर संग्रहालय आणि पाताळेश्वर दाखवा. पाताळेश्वर लय भारी आहे आणि फिरंग्यांना जनरली बघता येत नाही अशा प्रकारची जागा आहे. आगाखान प्यालेस अगदीच सामान्य आहे यापुढे.

लवासा आणि मगरपट्टा दाखवू नका. पवारांची ईमेज घेऊन गेल्याने येथील काही सन्माननीय सदस्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अॅग्रो टुरिजम ची एखादी साईट दाखवा हे सुचवू इच्छितो.

लवासा आणि मगरपट्टा दाखवू नका. पवारांची ईमेज घेऊन गेल्याने येथील काही सन्माननीय सदस्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अॅग्रो टुरिजम ची एखादी साईट दाखवा हे सुचवू इच्छितो.

In reply to by विशुमित

लोकांपुढे सगळे भारतीय आहोत. त्याना कोण पवार आणि कोण फडणवीस? त्यान्चा मतलब स्वस्तात चांगले काम करून मिळण्याशी परदेशात मोर्चे काढून आपण जातो त्याना दाखवायला कसे आम्ही जाती मध्ये विभागले गेलो आहोत...

अर्थात 8 वर्षापूर्वीचा.. मी जिथे काम करत होते त्या टीम चा ग्लोबल प्रमुख फार भारताच्या प्रेमात होता. त्याने ग्लोबल मीट ठेवली पुण्यात. एकूण 22 जण होते मग एक दिवस पुणे दर्शन अपरिहार्य होते. मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही खालील ठिकाणी त्याना फिरवले जे बहुधा आवडले. पर्वती राजा केळकर सन्ग्रहालय पाताळेश्वर आगाखान पॅलेस शेवटी त्याना क्याम्प भागात नेले. तिथे शोप्पिन्ग व रात्रीचे जेवण.

In reply to by सुखीमाणूस

धन्यवाद.. पाताळेश्वरचा विचार करतो.. मी आधी एकदा बघून येईन जमल्यास. जेवायला बार्बेक्यू नेशन असा विचार आहे.

गांधीजी बद्दल खूप आकर्षण असते बऱ्याच लोकांना . त्यामुळे त्या संबंधी दाखवा. अर्धा दिवस खूप कमी आहे.

राका केळकर म्यूझिअम, कात्रजचे सर्पोद्यान ह्यामध्ये ३ तास सहज जातील. नंतर श्रमपरिहार सुरू.

कार्ल्याची लेणी आणि चाकणमधील एखादा (माहितीचा) कारखाना असा पुण्याचा जुना + नवा भाग दाखवून तुम्हाला सयाजीला बार्बेक्यू नेशनला नक्कीच ५-६ तासात परतता येईल. आणखी एक पर्याय : महादजी शिन्द्यान्ची छत्री (जुने पुणे) + National War Museum + एखाद्या microbrewery मध्ये सन्ध्याकाळ + जेवण (Effingut ?) + जाता येताना जमतील तेव्हढ्या data centresच्या इमारती बाहेरून बघणे (नगर रोडच्या सुरवातीला अनेक आहेत).

In reply to by शेखरमोघे

कार्ल्याची लेणी पण चांगला पर्याय होवू शकेल माझ्या ध्यानातच नाही आले. शिवाय येता जाता तळेगाव-वडगाव ई मधला निसर्गरम्य परिसर बघता येईल. ट्रॅफिकही जास्त नसेल ..

विश्रामबाग वाडा शिंदे छत्री बनेश्वर केळकर संग्रहालय ( मला असं म्हणायचं आहे की पुणे दर्शन पिएमटी करवते यातून ठिकाणं आणि क्रम घ्या आणि स्वत: कारने त्यातली मोजकी करा म्हणजे वेळेचं आयोजन करता येईल. बनेश्वर अशासाठी घेतलं आहे की वरती घाटातून पुणे शहर दिसते तसेच खेड शिवानगर रोडवर एखादे चांगले गर्दी नसलेले रेस्तरां झाले असेल तर आवडेल.)

भाजे किंवा बेडसे लेणी उत्तम पर्याय वाटत आहे. एकतर २००० वर्षापूर्वीचे अजूनही सुस्थितीत असलेले स्थापत्य, हिंजवडीपासून जवळ. ३ वाजता निघूनही आरामात दिवसाउजेडी सगळे बघून होता येते, बेडसे त्यातले त्यात अधिक उत्तम. अतिशय स्वच्छ परिसर. माफक चढण. भोवतालचा आसमंतही सुंदर. गर्दी जवळजवळ नाहीच.

In reply to by प्रचेतस

पाहुण्यांचे साधारण इन्टरेस्टस काय आहेत हे पण पाहून घ्या. माझ्या मते भाजे पर्फेक्ट !!! कमी दमणुक (फक्त २५० पायर्‍या) वाली भाजे लेणी अतिशय सुंदर ट्रिप होईल. कार्ला उंच व गर्दीचे ठिकाण आहे. भाजे हे बेडसे पेक्षा जास्त महत्वाचे लेणे समजले जाते. अन हा रुट भारी राहिल (कमी ट्रॅफिक अन जाता जाता शेती, फ्लॉरिकल्चर फार्म, ग्रामिण भाग इ. ) हिंजवडी - मारुंजी - कासारसाई (धरणही पाहता येईल.) - बबेडओहळ - शिवणे - कडधे - काळे कॉलनी - पवना डॅम (जलाशयाचे सुंदर दर्शन) लोहगडच्या हिरव्या परिसरातून भाजे लेणी. इथं येई पर्यंत साडेचार -पाच वाजतील. सुर्यास्ताच्या कलत्या उन्हात लेणी व सुर्यास्त पाहुन होइल. वेळ हाताशी असेल दुधिवरे खिंडीच्या अलीकडंच डोंगराच्या कुशीतलं हभप बाबामहाराज सातारकर स्थापित विठठल मंदिर पाहता येईल. (तुमचे अध्यात्मिक इंप्रेशन पडेल. पुढे मागे आयटीकामाला कंटाळून बुवा झालाच तर हे रेडीमेड ग्राहक :-) तुमच्याकडं वेळ कमी आहे (अन नंतर तीर्थप्रसादाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही) नाही तर मारुंजीत शेतकर्‍याच्या रानात ग्रामिण भोजनाची सोय करता आली असती.

In reply to by चौथा कोनाडा

भाजे पेक्षा कार्ल्याला कमी चालावं लागतं बहूधा.. शिवाय कार्ल्याच्या लेण्या मोठ्या आहेत ना ?

In reply to by मराठी कथालेखक

भाज्याची चढण मला कार्ल्यापेक्षा सोपी वाटली. कार्ल्याच्या लेण्याजवळ एकवीरा देवीचं मंदिर असल्यामुळं तिथं भावकांची गर्दी, घाई असते. बाजरूपणा आलाय. पायर्‍या पायर्‍यावर पुजासाहित्याची दुकानं आहेत. मला आठवतंय त्यानुसार काही लेण्या (बहुधा उंचीवरील) वासे लावून बंद केलेत, अपघात होऊ नये म्हणुन ! या कारणांसाठी मला भाजे लेणी बरी वाटतात.
.. शिवाय कार्ल्याच्या लेण्या मोठ्या आहेत ना ?
या बाबत प्रचेतस साहेब्च टिपण्णी करू शकतील ! अणि हो ..... कार्ला, भाजे, बेडसे या पैकी काही ठरलंतर प्रचेतससाहेबांनाच गाईड म्हणुन बरोबर न्या की ( अर्थात त्यांना वेळ असेल तर )

आगाखान पेलेस वा वर सुचवल्याप्रमाणे एखादा किल्ला वा सिंहगड ?.. आपली वाचनालये, धरणे..ह्यात भव्य्,दिव्य ऐतिहासिक काही नाही.

पण एक शंका - परदेशी तुमचे/कंपनीचे पाहुणे आहेत पण प्रवेश शुल्क इकडच्यांना दहा रु परदेशींना दहा डॅालर ( ६५०रु~~) काय करणार?

लेण्या किंवा पाताळेश्वर इत्यादी जागाच सुचवेन. परदेशी लोकांसाठी ते नक्कीच खास असेल. म्युझियम दाखवू नका, त्यात फार काही राम नाही.

In reply to by पिलीयन रायडर

धन्यवाद... पाताळेश्वर अथवा कार्ला वा बेडसे अशा पर्यायाचा विचार करतो आहे . पण पाताळेश्वराला जायचे म्हणजे उगाच कंटाळवाण्या ट्रॅफिकमधून जावे लागेल त्यामुळे बेडसे वा कार्लाला झुकते माप. दोन्हीत जास्त चांगले काय आहे ? शिवाय कुठे कमी चालावे लागेल ?

In reply to by मराठी कथालेखक

कार्ले लेणी अतीव सुंदर आहेत पण प्रचंड गर्दी, पायथ्याला गलिच्छता आहे. कार्ले लेणीचा चैत्यगृह एकमेवाद्वितीय, पण बेडसेचे पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभही अतिशय सुंदर. निवांतपणा बेडसेलाच मिळेल. कार्ले भाजे दोघांचीही चढाई सारखीच आहे, बेडसेला किंचित अधिक पायऱ्या आहेत इतकेच.

हिंजेवाडी मधून निघून लोणावळा गाठा, लोणावळा फिरून झाले की येताना मुळशी मार्गे परत या. २-३ तास छान भटकंती होईल. वाटेत जमल्यास हाडशी मंदिर दाखवा.

In reply to by सतिश पाटील

++१११ अतीशय डोक्यात जातो 'हिंजेवाडी' हा उच्चार. बाकी, तिथल्या लोकल रेमडोक्यांच्या दादागिरीचा व गुंठामंत्र्यांच्या माजाचा निषेध करत असतो पण याबाबतीत त्यांचे म्हणणे सर्वथा योग्य आहे.

In reply to by पुंबा

लोकांच्या एकूण वृत्ती बद्दल खरंच राग येतो पण त्यांच्या हिंजेवाडी बद्दल आक्षेप आहे तो सर्वदा योग्य आहे मुद्दाम उपद्रव देण्यासाठी चुकीचे उच्चार/लिखाण यांच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी कटिबद्ध नाखु पांढरपेशा

In reply to by नाखु

हिंजेवाडी तसंच लोहेगाव... असले चुकीचे उच्चार मुद्दाम पसरविण्यात काही लोकांना काय आनंद मिळतो कुणस ठावूक. हिंजवडी फेज १ मध्ये STPI चं कार्यालय आहे , तिथल्या स्पेलिंगमध्ये Hinjawadi मधला j नंतरचा "a"नंतर चिकटवलेला दिसून येतो. हिंजवडीतील लोकांनी केलेल्या आंदोलनाचा परिणाम असावा.

भुलेश्वर म्हटलं असतं, लांब आहे हे एक कारण आणि आता तिथे इतर मंदिरांसारखाच बाजार असतो. दोन-चार फूलवाले, आत एक भटजी!! तीन साडेतीन वर्षांपूर्वी गेलो होतो असलं काही नव्हतं.

एखाद्या रिसॉर्ट ला घेउन जा, लवासा पण चालेल. तिकडेच गप्पा टप्पा करा, खा प्या आणि परत या. ऑक्सफोर्ड गोल्फ कोर्स हे ठिकाण मस्त आहे, आम्ही गेलेलो एकदा क्लायंटला घेउन दिवसभर

मद्य---विचारावे लागेल बहुतेक बियर आहे. पण आम्ही संध्याकाळ होईपर्यंत थांबलो नाही त्यामुळे बाकी अल्कोहोल बद्दल नक्की सांगु शकत नाही. फोन करुन विचारा. संक्रांतीच्या जवळपास गेलात तर पतंग उडवणे वगैरे प्रकारही असतात, मजा येते एकुण

पंचशिल टेक पार्क मध्ये एक्झॉटिका म्हणुन, नगर रोडला आगाखान पॅलेस नंतर समोरच्या फिनिक्स मॉल मधे जा, किंवा मगरपट्टा मध्ये फिरवा

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद. पण बहूतेक बेडसे लेणी निश्चित करु .. तसंही युरोपीयन पाहुण्यांना मॉल मध्ये काय नावीन्य वाटणार ?

In reply to by मराठी कथालेखक

चांगली माहिती रंजक पद्धतीने देणारा गाईड घेऊन लेणी दाखवा. वेळ मिळाला आणि शक्य असेलतर एखादी शेती आणि दुग्धव्यवसाय? ते त्यांना कितपत आवडेल माहित नाही. पण शहरात शक्यतो नेऊ नकाच!

In reply to by एमी

इंग्लिश बोलता येवू शकणारा गाईड मिळाला तर घेवू. बेडसे + वेळ मिळाल्यास पवना धरण/तलाव असा विचार आहे.. बॉसला विचारुन निश्चित करतोय आता

भाजे लेणीतील गूढ शिल्प: https://www.misalpav.com/node/20767 प्राचीन भारतः भाजे लेणी : https://www.misalpav.com/node/17433 प्राचीन भारतः बेडसे लेणी http://www.misalpav.com/node/16902 प्राचीन भारतः कार्ले लेणी http://www.misalpav.com/node/17159

In reply to by प्रचेतस

धन्यवाद, प्रचेतस इथं लिंक दिल्याबद्दल. वेळ काढून लेख आवर्जून वाचला. खुप सुंदर लेख ! जबरदस्त शैली ! इतिहासाच्या गर्भात शिरून उत्कटपणे हा केलेला हा जिवंत महापट ! वाचताना भूतकाळ, वर्तमान काळ चित्रपटासारखे डोळ्यांपुढं तरळू लागले ! हे सर्व परिच्छेद वाचताना खिळवून ठेवतात ! वल्ली-प्रचेतसने निर्मिलेला हा भव्यपटात गुंगून मंत्रमुग्ध सोडतो आपल्याला ! खरंच त्या स्वच्छंदी मनोजचे आभार मानायला हवेत ज्यांनी मागे लागून हा सुंदर लेख लिहून घेतला ! मामलेदारचा पंखा म्हणतात त्या नुसार " हे जे प्रचेतस उर्फ वल्ली सर आहेत ना त्यांचा हा पुनर्जन्म आहे.... ते अगम्य शिलालेख त्यांनीच गतजन्मी लिहिलेले असावेत आणि या जन्मात त्यांचा अर्थ समजावून सांगायला ते परत आलेत..." + १ मामलेदारचा पंखा ! फोटोज आणि त्या अनुषंगाने लिहिलेली माहिती अप्रतिम ! सर्व शिलालेख अन त्याचा अर्थ उलगडत असताना स्तिमित व्हायला होते. यवन म्हणजे मुसलमान ही माहिती प्रथमच समजली. इतरांप्रमाणे मी देखील यवन म्हंजे मुसलमान समजत होतो. लेखाखालील प्रतिसाद देखील सुंदर आहेत. प्रचेतस साहेब, या लेखाच्या नांवात "कार्ले लेणी" या शब्दांचा समावेश करता येईल का ? समावेश केल्यास सर्च करताना सहजपणे सापडेल व आणखी वाचकांसमोर पोहोचेल ! धन्यवाद !

In reply to by चौथा कोनाडा

धन्यवाद... बेडसे मधले "प्रासाद व गवाक्षांची जाळीदार रचना" विशेष आवडले.

In reply to by मराठी कथालेखक

बेडसे निश्चित करणार असाल तर तिथून २-३ किलोमीटरवर पवनाहट्स नावाचा ऍग्रोपिकनिक स्पॉट आहे. एकदा वेबसाईट पाहून घ्या, जनरली आवडेल असं ठिकाण आहे.

मोराची चिंचोली. अगदी 'भारत स्पेशल' होईल. बाकी गार्डन, मॉल ह्यात आपल्याला इंटरेस्ट. त्यांना त्यात नाविन्य वाटणार नाही. त्यांना खरेदी करायचीच असेल तर ethnicity दुकान परफेक्ट आहे, 'भारत स्पेशल' म्हणून. Phoenix mall मध्ये आहे ते.

ह्या अश्या क्लायंट व्हिजिट होत असतात, त्यामुळे अनुभवावरून सांगतोय, दुपारी ३ ला निघून फार लांब लांबचे प्रवास टाळा. एकतर ते जेट ल्याग मध्ये असतात, त्यात दिवस भर प्रेसेंटेशन मिटींग्स करून कंटाळलेले असतात. खूप लांबचा प्रवास त्यांना त्रासदायक ठरेल. तुम्ही लिहिलंय वर कि ३ महिला आहेत, त्यांना एखाद्या स्त्री कलीग सोबत लक्ष्मी रोड ला पाठवा. तिथे त्या मनसोक्त शॉपिंग करू शकतील. तो पर्येंत पुरुष मंडळींना (त्यांना शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नसल्यास) पुणे दर्शन धावती विझिट द्या (सारस बाग, पार्वती, पाताळेशवर इत्यादी). रात्रीच्या मेजवानी साठी बार्बेक्यू नेशन किंवा सीग्री मध्ये मनसोक्त बिअर आणि कबाब इत्यादी साठी अवश्य घेऊन जा. त्यांना निश्चित आवडेल. त्या साठी आधीच टेबल राखून ठेवा. बहुदा ते हिंजवडीत कुठल्या तरी हॉटेल ला राहणार असतील, तर त्यांना सयाजी मधल्या बार्बेक्यू नेशन ला नेलेलं उत्तम, म्हणजे लवकर हॉटेल वर पोचून आराम करता येईल.

In reply to by केडी

बार्बेक्यू नेशन किंवा तत्सम लाईव्ह ग्रिलवाली ठिकाणे शक्यतो टाळा. कलकलाट फार असतो अशा ठिकाणी, कोपा कबाना किंवा मेझा नाईन सारख्या ठिकाणी हट बुक करून निवांत जेवा.

In reply to by केडी

चार दिवसाच्या भेटीत तिसर्‍या दिवशी ही सहल असेल.. त्यामुळे जेट लॉग वगैरे आटोपलेलं असेल. बाकी युरोपातील बायका लक्ष्मी रोडला काय शॉपिंग करणार ? साडी की सलवार ? असो. तसंही इतक्या गर्दीत त्या गोंधळून जातील. सयाजीतल्या बार्बेक्यूतच नेण्याचा विचार आहे.

त्यांना मराठी येत असेल तर हा धागाच वाचायला द्या (तुमच्या सटीप अनुवाद विश्लेषण सह) एकतर भारतातच राहतील. पाहुण्यांसकट सर्वांनी गमतीजमतीत घेणे, लगेच मोर्चा काढण्यात येईल असे नको, चर्चेत सुटणारे प्रश्न मोर्च्याने जटील समस्या बनतात हे माहीत असलेला मिपाकर नाखु

मला वाटते "कात्रज सर्पोद्यान" योग्य राहिल. एकतर दिवसभर काम केल्यानंतर लेणी पहाण्यासाठी डोंगर चढणे जीवावर येईल. त्यातून प्रत्येकाला ते आवडेल का ते पहा. प्राणी पहाणे आणि ते सुध्दा साप, नाग, वाघ असे खास ईंडियन स्पेशल जास्त आवडेल.आधी त्यांच्या आवडीचा अंदाज घ्या ईतकेच सुचवेन. शेवटी प्रश्न देशाच्या प्रतिष्ठेचा आहे.

एव्हढ्या लोकांनी सुचविले, शेवटी कुठे नेले पाहुण्यांना ? मिपा कट्टया सारखा वृत्तांत येऊ द्या ☺

सर्वांचे आभार. मी बेडसे लेणी जवळपास निश्चित केली होती. पण काही कारणानी पाहुण्यांची ही भेट पुढे ढकलली गेली. आता हे पाहुणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतील. त्यावेळी उन्हाळा सुरु झालेला असेल त्यामुळे वाढत्या तापमानाचा विचार करुन बाहेर फिरण्याचा बेत आखावा लागेल किंवा कदाचित रद्दही करावा लागेल...बघू..

अर्रर्र मक्ले सर, आम्ही एका देशस्थ मिपाकराचा परदेशस्थ सहकाऱ्यांबरोबर देशी कट्टा या वृत्तांताची उत्सुकतेने वाट पाहत होतो. असो, आता आणखी थोडे कळ काढावी लागेल !