Skip to main content

पर्यटन

परदेशी पाहूण्यांना फिरवून आणण्याकरिता स्थळ सुचवा

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 07/02/2018 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर आमच्या हिंजवडी (पुणे)स्थित कार्यालयाला भेट देण्यास काही परदेशी (युरोपीय) पाहुणे येणार आहेत (यात तीन स्त्रिया , तीन पुरुष आहेत). चार-पाच दिवसांच्या भेटीत एकदा त्यांना साधारण सहा ते सात तासात फिरवून आणता येईल असे स्थळ कृपया सुचवा.
  • हे फिरणे कामाच्या दिवशी असेल
  • दुपारी तीनच्या सुमारास हिंजवडीमधून निघावे असे नियोजन आहे
  • फिरुन झाल्यावर रात्रीचे जेवण (यात मद्यपान असेल) करुन रात्री दहापर्यंत पाहूण्यांना हिंजवडीतील हॉटेलपर्यंत पुन्हा सोडता यावे
  • वाहनांची सोय आमच्या कार्यालयाकडून करण्यात येईल त्यामुळे त्याची चिंता नाही पण प्रवास फार दूरचा नसावा.

मुरुड चौपाटीवर नक्की काय घडले??

लेखक चलत मुसाफिर यांनी मंगळवार, 02/02/2016 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुरुड येथे आलेल्या महाविद्यालयीन सहलीतील अकरा विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बातमी सर्वांना धक्का देऊन गेली असेल. मी महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असल्यामुळे जे इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आले व आंतरजालावर प्रसिद्ध झाले, तेवढे कळले (मराठी वृत्तवाहिन्या दिसत नाहीत). ही शोकांतिका कशी घडली, हे समजले नाही. मुले मोठ्या संख्येने होती. तशी जाणत्या वयाची होती. शिक्षक सोबत होते. दिवसाची वेळ होती. किनाराही आडवाटेचा नसून प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा होता. पावसाळा नव्हता आणि समुद्र खवळलेला नव्हता (नसावा). असे असूनही हे का झाले? कुणाची हलगर्जी याला कारणीभूत होती का?