लिहायचे आहे, पण कसे?
थोड्या धाकधुकीनेच हा धागा काढतोय पण माझ्यासारख्या नवख्याला तुमच्यासारख्या दिग्गज लोकांकडून मार्गदर्शन मिळेल हीच अपेक्षा आहे.
लहापणापासून मी वाचन भरपूर केलंय, करतोय. पुस्तक, कादंबऱ्या, मोठ्या बहिणीची चार वर्ष पुढची पाठ्यपुस्तक, वानसामानाचे कागद, बाबांच्या ऑफिसातले रद्दीचे पेपर, वाचनालयातील पुस्तक, मासिक काही काही म्हणून सोडलं नाही. काही वर्षांनी आंतरजालीय लिखाण आलं आणि मग वाचनाला सीमाच नाही उरली. त्यातच काही दिवसांनी वाटलं कि लिहून पाहूया. एक दोन लेख लिहून जिलब्या पाडल्या पण मध्येच अखंड असा खंड पडला. आता लिहायची उर्मी परत वर येतेय, म्हटलं जरा शास्त्रशुद्ध काही पायऱ्या असतील तर त्या अभ्यासून लिहावं त्यासाठीच हा प्रपंच.
ठळक मुद्दे असे कि -
१) लिखाणाचं अस काही शिक्षण आहे का कि उस्फुर्त लिहीत सुटावं :D ,आणि शिक्षण असेल तर कस मिळवावं?
२) अनुभवानेच सगळं शिकायचं असेल तर कुणी अनुभव शेअर करेल का? कि कशी तयारी केलीत, काय स्किल्स वाढवलेत?
३) थोडक्यात आपले म्हणणं कस मांडावं (लिखाणात)
अँड सो ऑन..
ऍडमिन ना विनंती धागा नियमात नसेल तर माहिती देऊन उडवून लावावा!
वाचन
9498
प्रतिक्रिया
0