समाधान !
कविता हा आधीच औघड प्रकार, त्यात मीटर वगैरे सांभाळायचं म्हणजे कठीणच !
पण म्हणून कुणी प्रयत्न करूच नये की काय?
तरी जिलबी गोड मानून घ्यावी ही विनंती …!
***
होती अमुची प्रिया एक ती
आमची मंजे कंपनीची
सदैव वाटे तिजला कांही
नविन करावे प्रतिमासी
कधी कनेक्टे हार्ट आमुचे
कधी पॉलीस्यां अपडेटवी
तसा एकदा सर्व्हे केला
'समाधान सर्वेक्षण' म्हणुनि !
मनात नसता भाग घेउनि
सारे प्रतीसादून आले
सर्व्हे झाला पटपट आणिक
सार निघाले हो झटपट
स्वमनिचे निष्कर्ष घेऊनि
छान छान पी पी टी सजवून
आली हो ऐटीत पुण्याला
प्रिया विमानी त्वरित बसून
सगळ्यांना गोळा करूनि
पोपटपंची झाली करून
सगळे आपण कित्ती ह्याप्पी
दमली नाही सांगून सांगून
वेगवेगळे वयोगट ते
मुले मुली अन बाप्पेही
असोत अनुभवी वा नवखे
सारेच कसे ते ह्याप्पी-ह्याप्पी
विचारते झाले मग तिजला
अडचणीचे ते प्रश्न असे
सर्वे होता खराच न्युट्रल?
का मागितले लॉगिन असे ?
सांग आम्हाला हेतू आतले
कुणि बनविले प्रश्न यातले
असे प्रश्न का ज्याचे उत्तर
येईल तुझिया मनासारखे?
दमली बिचारी देऊन उत्तर
पळती झाली ट्याब घेऊनि
ल्लूलू ऊउऊऊउ ऊऊ.......!
''विल बी ब्याक टु यू'' म्हणूनि
तेच जाहले चेन्नईत अन
तसेच काही बंगळुरी
'कुठून केला सर्व्हे 'झाले
गेली वैतागूनि अगदी
फुडच्या म्हैन्यातच गेली
प्रिया बिचारी कंपनी सोडून
लीन्क्डीनवरती आता कळले
गेली ती तिथुनीही निघून
कंपनी शिकली एकच यातून
प्रकार असले बंद करून
समाधान जे मनी वसे ते
सर्व्हेने का येई कळून ?
(जिल्बूत) १८/६/२०१६
भारीये! जिलबी म्हणवत नाही!
मस्तच जमलीय की,
हा हा !
मस्तं!
छानेय कविता! :-)
दमली बिचारी देऊन उत्तर
वाचक आणि प्रतिसादकांचे आभार !
=))
एकूण