✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!

अ
अज्ञात यांनी
Wed, 05/04/2016 - 19:29  ·  लेख
लेख
सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते! दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील… पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला. युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त्या अती-छोट्या रस्त्यांवरच्या अती-प्रचंड ट्राफिक मध्ये मला त्याचं काही ऐकू येत नव्हतं, आई आपली चालवत होती मला डबलसीट घेऊन जमेल तसं, तिला एकटे चालवायला छान जमत असेल हो! पण कोणाला मागे घेऊन चालवणे वेगळी गोष्ट आहे, असो. माझा फोन चालूच होता 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मंदारला सांगत होतो… सिग्नल आला नळ स्टॉप च्या अलीकडचा, आईनी वाहन थांबवले, माझा फोन चालूच, 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मित्राला वारंवार सांगत होतो ते आईने ऐकले आणि वैतागून मला म्हणाली 'अरे, ऐकायला येत नाही तर… पुढे जाऊन बोल!' हे बाजूच्या दुचाकी वीराने ऐकले… तो उत्तरला "अजून कुढे पुढे जाऊ म्याडम?" मी आणि आईने त्या माणसाकडे पाहिले, आणि मी झालेल्या 'गलतफैमिली' वर हसत उत्तर दिले, (हातातला फोन तसाच ठेवत) 'अहो काका, तुम्हाला नाही बोलली ती, ती माझाशी बोलत आहे, मी फोन वर आहे, आणि मला आवाज येत नाही म्हणून 'पुढे जाउन बोल' असं सांगत्ये, तुम्हाला काही बोलली नाही हो ती!' हे ऐकताच मला तो ईसम म्हणतो कसा... 'अरे पण तू चालव की, आईला कशाला त्रास देतोयस!' ह्यावर मी अजून हसून म्हणालो, "अह्हो, सांगावीपासून मीच चालवतोय, मागच्या सिग्नल पासून आई चालावत आहे, तिला मागे बसून घाबरायला होतंय म्हणून!" हे वाक्य संपताच सिग्नल सुटला, आणि तो सिग्नल हिरवा होताच साहेबांनी जो काय पीकअप घेतला ते थेट सायकल लेन मध्ये, जिथे स्टील चे ३ खांब असतात, जीथे फक्त चालणारे किव्वा सायकल वालेच जाऊ शकतात, त्यात त्यांची ती छोटी दुचाकी त्यांच्या विराट कौशल्याने घुसवत साहेब गायब! शेवटी मी नळ स्टॉपवर आईला म्हणालो 'आई मी चालवतो आता गाडी, तू चालवत असशील नीट, पण एकटे चालवणे वेगळे आणि कोणाला मागे बसवून चालवणे वेगळे!' आईला माझा सल्ला पाटला (किंवा तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हता, असं समजा), मग पौड रोड ला लागेपर्यंत त्या 'दुचाकी वीराबद्दल' आम्ही बोलत होतो! बाकी सिग्नल वर ईतकी बडबड फक्त पुणेरीच करू शकतो, आणि त्यात मी ही अर्धा पुणेकर, तो सिग्नल अजून एक मिनटाचा वगैरे असता तर त्या माणसाचे नाव-गाव ही कळाले असते! असो… ह्या सर्व भानगडीत फोन कधी कट झाला त्याकडे लक्षच गेले नाही. पुन्हा कधी (पुण्यात) मागे बसूनही फोन न घेणे हेच ईष्ट! #साशुश्रीके । ०५ मे २०१६
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10188 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा

एस
Wed, 05/04/2016 - 19:46 नवीन
बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा लेखही सिग्नल सुटायच्या आधी टंकून प्रकाशित केला असता! आहात कुठे?
  • Log in or register to post comments

+1111111111

चांदणे संदीप
Wed, 05/04/2016 - 19:51 नवीन
+1111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

असा सगळा प्रकार झाला तर

स्पा
Wed, 05/04/2016 - 19:57 नवीन
असा सगळा प्रकार झाला तर
  • Log in or register to post comments

=))

विजय पुरोहित
Wed, 05/04/2016 - 21:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

थोडक्यात तुम्हांला डबलसीट

यशोधरा
Wed, 05/04/2016 - 20:06 नवीन
थोडक्यात तुम्हांला डबलसीट गाडी चालवता येत नाही तर! डबलसीट घेता येईना, रस्ते वाकडे? :D
  • Log in or register to post comments

हे पुण्याबाहेरचे लोक असे

सूड
Wed, 05/04/2016 - 20:06 नवीन
हे पुण्याबाहेरचे लोक असे पुण्यात येऊन नसत्या तक्रारी करत बसतात!! आमच्यावेळी असं नव्हतं.
  • Log in or register to post comments

अहो

चाणक्य
Wed, 05/04/2016 - 21:10 नवीन
हे तर काहीच नाही. एकदा कुमठेकर रोडला एका माणसाने सिग्नलला त्याचा चष्मा काढून पुसला आणि सिग्नल लागल्यावर तो निघून गेला. मला फारच माैज वाटली.
  • Log in or register to post comments

सिग्नल लागला की थांबतात ह्या

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 21:16 नवीन
सिग्नल लागला की थांबतात ह्या पुणेकरांच्या शिस्तीचे कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

हा उपरोध समजावा काय ? ;-)

उगा काहितरीच
Wed, 05/04/2016 - 21:53 नवीन
हा उपरोध समजावा काय ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मी पुणेकर नाही... ;)

तर्राट जोकर
Wed, 05/04/2016 - 22:14 नवीन
मी पुणेकर नाही... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

ते सांगावी म्हणजे सांगवी का ?

उगा काहितरीच
Wed, 05/04/2016 - 21:51 नवीन
ते सांगावी म्हणजे सांगवी का ? नवी का जुनी ? रच्याकने मी पण सांगवीतच रहातो बरं जमल्यास भेटू कधी... ;-)
  • Log in or register to post comments

मी पण

वगिश
गुरुवार, 05/05/2016 - 16:41 नवीन
मी पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

पप्पु महाजनचं खानदेश कट्टा

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 05/05/2016 - 16:49 नवीन
पप्पु महाजनचं खानदेश कट्टा सुरु आहे का हो अजुन ? पुलाच्या जवळ पेट्रोल पंपापुढले? सांगवी मधले गजानन महाराज मंदिर आमचा खास मानसिक अन भावनिक आसरा होता पुण्यात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

मला काही खास नाही आवडलं तेथील

उगा काहितरीच
गुरुवार, 05/05/2016 - 17:24 नवीन
मला काही खास नाही आवडलं तेथील जेवण... असते एकेकाची आवड. आहे अजून चालू ! बाकी गजानन महाराज मंदिराबद्दल सहमत. छान आहे मंदिर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 05/05/2016 - 17:51 नवीन
आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका त्यामुळे तुमच्या मताचा आदर, अन्नाला नावे ठेऊ नये असे म्हणतात पण मेसमधुन रोज डब्यात येणारा "धोका" पचवला की एखाददिवस पप्पु बरा वाटे अन एखादाच् दिवस परवडे सुद्धा त्याकाळी ;) असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

येथील जेवण इतर खानदेशी

उगा काहितरीच
गुरुवार, 05/05/2016 - 21:49 नवीन
येथील जेवण इतर खानदेशी हॉटेलसारखेच तिखट असते त्यामुळे कदाचित आवडत नसावे मला . बाकी अन्नाला नावे ठेवू नयेत सहमत पण मेसवाल्यांचे अन्न याला अपवाद असावे. -(मेसग्रस्त) उका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

अगगा नको त्या मेसच्या आठवणी

त्रिवेणी
Sun, 05/08/2016 - 00:21 नवीन
अगगा नको त्या मेसच्या आठवणी Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

त्याचे १४ शब्द, तुमचे ३१

sagarpdy
Wed, 05/04/2016 - 21:54 नवीन
त्याचे १४ शब्द, तुमचे ३१ थोडक्यात अर्धवट पुणेकरच सिग्नल वर जास्त बोलतात.
  • Log in or register to post comments

एवढी घाई असताना इतकी माणुसकी

भक्त प्रल्हाद
Wed, 05/04/2016 - 22:42 नवीन
एवढी घाई असताना इतकी माणुसकी फक्त पुणेकरच दाखवु शकतात.
  • Log in or register to post comments

डियर सशुश्रीके

चांदणे संदीप
गुरुवार, 05/05/2016 - 07:11 नवीन
राग आला तरी चालेल - आपल्या डायरीतली फाडलेली पाने नका हो इथे चिकटवत जाऊ! कधीतरी तुमचे लेखन आवडलेलेही आहे. इथे मिपावर किती दर्जा राखून लिहिणारे लेखक/कवी आहेत, त्यांचे लेखन वाचले तरी लक्षात येईल आपल्याला कस लिहिलं पाहिजे, अभ्यास म्हणा हवं तर. सल्लाच आहे हा, कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा! आता - माझा आयडी उडला तरी चालेल! हे विजय पुरोहित उर्फ मांत्रिक म्हणजे जाम बालिश प्रकरण आहे! सोबतीला डेडपुल म्हणजे टुकारवाडीतली बन्याबापूची जोडीच! आता येतील माझ्या प्रतिसादावर धावून....हरकत नाही. हा माझा पहिला "जाहीर" प्रतिसाद आयडींविरूद्ध लिहायचा! असले बालीश (पक्षी : टुकार/भिकार) वाद-प्रतिसाद वाचून इरिटेट होण्यापेक्षा आयडी घालवून वाचनमात्र झालेले बरे! म्हणजे, पुन्हा कितीही वैताग झाला तरी प्रतिसाद लिहिता येणार नाही! आता लिहिलाच आहे! ;) जय महाराष्ट्र! Sandy
  • Log in or register to post comments

राग आला तरी चालेल - आपल्या

आदूबाळ
गुरुवार, 05/05/2016 - 16:19 नवीन
राग आला तरी चालेल - आपल्या डायरीतली फाडलेली पाने नका हो इथे चिकटवत जाऊ! कधीतरी तुमचे लेखन आवडलेलेही आहे. इथे मिपावर किती दर्जा राखून लिहिणारे लेखक/कवी आहेत, त्यांचे लेखन वाचले तरी लक्षात येईल आपल्याला कस लिहिलं पाहिजे, अभ्यास म्हणा हवं तर. सल्लाच आहे हा, कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा!
याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कैच्या कैच

नाखु
गुरुवार, 05/05/2016 - 17:32 नवीन
ते थोडीच इतरांच वाचायला येतात मिपावर, ते तर निमिष भाऊंचे वर्गमित्र आहेत. इतराम्नी त्यांच लिखाण वाचायच अस्त आणि चान चान म्हणायच असतं. तुम्ही नका लक्ष्य देऊ या नतद्रष्टाकडे उरलेली पानं पण चिटकवा डायरीची इथे... रोज एक या प्रमाणे (धुराळी धागे खाली तरी जातील) लोहा लोहेको काटता है !! आप्ला अगदीच स्मरणशील नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ते थोडीच इतरांच वाचायला येतात

प्रचेतस
गुरुवार, 05/05/2016 - 19:00 नवीन
ते थोडीच इतरांच वाचायला येतात मिपावर, ते तर निमिष भाऊंचे वर्गमित्र आहेत. इतराम्नी त्यांच लिखाण वाचायच अस्त आणि चान चान म्हणायच असतं
आणि आपल्याच धाग्यावर महिनाभरानं परत धन्यवाद धन्यवाद करत सुटायचं असतं हे विसरलात नाखुन अंकल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

पुण्यात जायचे होते सांगावीहुन

काळा पहाड
गुरुवार, 05/05/2016 - 11:03 नवीन
पुण्यात जायचे होते सांगावीहुन
दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं
पौड रोड म्हणजे पुणे नव्हे याची कृपया नोंद घ्यावी. पुण्याची हद्द सगळ्या पुलांच्या अलीकडे पर्यंत संपते याची सुद्धा नोंद घ्यावी. अवांतरः पौड रोडला जायला से.बा.रोड हा काही जवळचा मार्ग नव्हे. मात्र जवळचा मार्ग सांगण्याचा आमचा कोणताही विचार नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

अगदी

वपाडाव
गुरुवार, 05/05/2016 - 16:06 नवीन
हेच्च लिहायला आलो होतो... टंकनश्रम वाचव्ल्याबद्दल धन्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

(No subject)

त्रिवेणी
गुरुवार, 05/05/2016 - 13:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

त्रि

सविता००१
गुरुवार, 05/05/2016 - 16:59 नवीन
मस्त स्मायली. अगदी हीच पोझ घेतली आहे मी आत्ता;)
  • Log in or register to post comments

नावावरुन काहितरि

palambar
गुरुवार, 05/05/2016 - 18:45 नवीन
नावावरुन काहितरि विन्टरेस्टिंग वाचायला मिळेल असे वाट्ले होते , पण... असो.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आहेत की इंटरेस्टिंग!

हकु
गुरुवार, 05/05/2016 - 20:44 नवीन
प्रतिसाद आहेत की इंटरेस्टिंग! (नेहमीप्रमाणेच ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: palambar

असो!

वैभव जाधव
गुरुवार, 05/05/2016 - 19:37 नवीन
असो!
  • Log in or register to post comments

भयंकर पाणचट

shvinayakruti
Fri, 05/06/2016 - 17:38 नवीन
भयंकर पाणचट
  • Log in or register to post comments

पन्नाशी निमीत्त धागाकर्तेला

जेपी
Fri, 05/06/2016 - 18:01 नवीन
पन्नाशी निमीत्त धागाकर्तेला एक नारळ आणी मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाची पायरेटेड सिडी देऊन सत्कार करण्यात येत आहे..
  • Log in or register to post comments

नशीब मुंपुमुं २ नाही दिला =))

रातराणी
Tue, 05/10/2016 - 00:09 नवीन
नशीब मुंपुमुं २ नाही दिला =)) थोडक्यात वाचलात सशुश्रीके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मुक्तपीठ. लेखापेक्षा

अभिजीत अवलिया
Sun, 05/08/2016 - 17:28 नवीन
मुक्तपीठ. लेखापेक्षा प्रतिक्रिया उत्तम.
  • Log in or register to post comments

मात्रूदीणाणिमीत्त तुमच्याकून

खटासि खट
Mon, 05/09/2016 - 14:04 नवीन
मात्रूदीणाणिमीत्त तुमच्याकून असलच भारि गिफ्टची भेट प्रेझेण्ट मधि मीळणार हि १०१ टक्के खात्रिचि ग्यारण्टी व्हती राव. सांगवी ते पुणं या जर्नीवर पिच्चर निघल लका. स्वप्निल जोशि अन श्रद्धा कपुर
  • Log in or register to post comments

जाहिरात, जाहिरात, जाहिरात

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/10/2016 - 00:00 नवीन
मला वाटलं माझाच धागा वर आला का काय! असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा