सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!
दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील…
पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला.
युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त्या अती-छोट्या रस्त्यांवरच्या अती-प्रचंड ट्राफिक मध्ये मला त्याचं काही ऐकू येत नव्हतं, आई आपली चालवत होती मला डबलसीट घेऊन जमेल तसं, तिला एकटे चालवायला छान जमत असेल हो! पण कोणाला मागे घेऊन चालवणे वेगळी गोष्ट आहे, असो. माझा फोन चालूच होता 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मंदारला सांगत होतो…
सिग्नल आला नळ स्टॉप च्या अलीकडचा, आईनी वाहन थांबवले, माझा फोन चालूच, 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मित्राला वारंवार सांगत होतो ते आईने ऐकले आणि वैतागून मला म्हणाली 'अरे, ऐकायला येत नाही तर… पुढे जाऊन बोल!' हे बाजूच्या दुचाकी वीराने ऐकले… तो उत्तरला "अजून कुढे पुढे जाऊ म्याडम?" मी आणि आईने त्या माणसाकडे पाहिले, आणि मी झालेल्या 'गलतफैमिली' वर हसत उत्तर दिले, (हातातला फोन तसाच ठेवत) 'अहो काका, तुम्हाला नाही बोलली ती, ती माझाशी बोलत आहे, मी फोन वर आहे, आणि मला आवाज येत नाही म्हणून 'पुढे जाउन बोल' असं सांगत्ये, तुम्हाला काही बोलली नाही हो ती!' हे ऐकताच मला तो ईसम म्हणतो कसा... 'अरे पण तू चालव की, आईला कशाला त्रास देतोयस!' ह्यावर मी अजून हसून म्हणालो, "अह्हो, सांगावीपासून मीच चालवतोय, मागच्या सिग्नल पासून आई चालावत आहे, तिला मागे बसून घाबरायला होतंय म्हणून!" हे वाक्य संपताच सिग्नल सुटला, आणि तो सिग्नल हिरवा होताच साहेबांनी जो काय पीकअप घेतला ते थेट सायकल लेन मध्ये, जिथे स्टील चे ३ खांब असतात, जीथे फक्त चालणारे किव्वा सायकल वालेच जाऊ शकतात, त्यात त्यांची ती छोटी दुचाकी त्यांच्या विराट कौशल्याने घुसवत साहेब गायब! शेवटी मी नळ स्टॉपवर आईला म्हणालो 'आई मी चालवतो आता गाडी, तू चालवत असशील नीट, पण एकटे चालवणे वेगळे आणि कोणाला मागे बसवून चालवणे वेगळे!' आईला माझा सल्ला पाटला (किंवा तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हता, असं समजा), मग पौड रोड ला लागेपर्यंत त्या 'दुचाकी वीराबद्दल' आम्ही बोलत होतो!
बाकी सिग्नल वर ईतकी बडबड फक्त पुणेरीच करू शकतो, आणि त्यात मी ही अर्धा पुणेकर, तो सिग्नल अजून एक मिनटाचा वगैरे असता तर त्या माणसाचे नाव-गाव ही कळाले असते! असो…
ह्या सर्व भानगडीत फोन कधी कट झाला त्याकडे लक्षच गेले नाही. पुन्हा कधी (पुण्यात) मागे बसूनही फोन न घेणे हेच ईष्ट!
#साशुश्रीके । ०५ मे २०१६
वाचने
10248
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा
+1111111111
In reply to बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा by एस
असा सगळा प्रकार झाला तर
=))
In reply to असा सगळा प्रकार झाला तर by स्पा
थोडक्यात तुम्हांला डबलसीट
हे पुण्याबाहेरचे लोक असे
अहो
सिग्नल लागला की थांबतात ह्या
हा उपरोध समजावा काय ? ;-)
In reply to सिग्नल लागला की थांबतात ह्या by तर्राट जोकर
मी पुणेकर नाही... ;)
In reply to हा उपरोध समजावा काय ? ;-) by उगा काहितरीच
ते सांगावी म्हणजे सांगवी का ?
मी पण
In reply to ते सांगावी म्हणजे सांगवी का ? by उगा काहितरीच
पप्पु महाजनचं खानदेश कट्टा
In reply to ते सांगावी म्हणजे सांगवी का ? by उगा काहितरीच
मला काही खास नाही आवडलं तेथील
In reply to पप्पु महाजनचं खानदेश कट्टा by कैलासवासी सोन्याबापु
आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका
In reply to मला काही खास नाही आवडलं तेथील by उगा काहितरीच
येथील जेवण इतर खानदेशी
In reply to आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका by कैलासवासी सोन्याबापु
अगगा नको त्या मेसच्या आठवणी
In reply to आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका by कैलासवासी सोन्याबापु
त्याचे १४ शब्द, तुमचे ३१
एवढी घाई असताना इतकी माणुसकी
डियर सशुश्रीके
राग आला तरी चालेल - आपल्या
In reply to डियर सशुश्रीके by चांदणे संदीप
कैच्या कैच
In reply to राग आला तरी चालेल - आपल्या by आदूबाळ
ते थोडीच इतरांच वाचायला येतात
In reply to कैच्या कैच by नाखु
पुण्यात जायचे होते सांगावीहुन
अगदी
In reply to पुण्यात जायचे होते सांगावीहुन by काळा पहाड
(No subject)
त्रि
नावावरुन काहितरि
प्रतिसाद आहेत की इंटरेस्टिंग!
In reply to नावावरुन काहितरि by palambar
असो!
भयंकर पाणचट
पन्नाशी निमीत्त धागाकर्तेला
नशीब मुंपुमुं २ नाही दिला =))
In reply to पन्नाशी निमीत्त धागाकर्तेला by जेपी
मुक्तपीठ. लेखापेक्षा
मात्रूदीणाणिमीत्त तुमच्याकून
जाहिरात, जाहिरात, जाहिरात