Skip to main content

सेल्फी-एक विकार???

लेखक पिके से पिके तक.. यांनी रविवार, 06/03/2016 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!! एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे... एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही.. आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल.... सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर.... विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे... शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात.... सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12795
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

ही चूक मोबाईल निर्मात्याची आहे, मूळातच मागच्या कॅमेरा मध्ये समोरचा व्ह्यू दिसताना त्यात फ्रंट कॅमेरातून मोबाईलधारकाचाही व्ह्यू असे कंबाईन फोटू काढणारा डिव्हाईस तयार व्हायला हवा जेणेकरुन फोटोग्राफरचे लक्ष समोरच्या धोका लाईनवर (लक्ष्मण रेषेवर) राहील . आणि ते काय ७५० का काय जीव वाचतील.

संपादक मंडळ तर्राट जोकर यांना समज देईल का ? - खुले आम बोलतोय.यांचे योगदान चर्चा भरकटवणे,इतरांना हिणवणे आणी ट्रोलींग करणे या पलिकडे काहि ही नाही. - बाकी मर्जी संम आणी मालकांची

माझे मिपा वरचे लिखाण पाहिले तर मी तुम्हा सगळ्यांच्या समोर उभाच राहू शकत नाही. पण मी गेली २ वर्षे मिपा चा नियमित वाचक आहे. कोणत्या अधिकाराने मी बोलतोय मला माहीत नाही. तजो सर तुम्ही असे नाही आहात, पण गेले आठवडाभर तुम्ही अगदी पिसाळल्यासारखे सगळ्यांवर शब्दबाण सोडत आहात.
मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?
आता तुम्हीच इथे हे लिहिलंय.आज हा धागा व्यवस्थितपणे सेल्फी च्या दुष्परिणामाबद्दल चालू असताना तुम्ही हे विधान केलेत
अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! >> विद्यमान पंतप्रधानांनाही ???
आता इथे मोदींचा विषय काढून आग पेटवायची काही गरज होती का ?एकतर सगळ्यांना मोडी समर्थक म्हणून हिणवायचं आणि कोणी काही बोललं कि आकांड तांडव करायचं.अस नका वागू सर प्लीज तुम्हाला अस बघवत नाही हो.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

हेच म्हणत होतो. त्यांना मिपावरच्या कुठल्यातरी मृत आयडीने पछाडलेय बहुतेक.. आत्मूकाकांना विचारले पाहिजे.

In reply to by गणेश उमाजी पाजवे

आता इथे मोदींचा विषय काढून आग पेटवायची काही गरज होती का ?
कोणताही विषय असला तरी काही जणांना त्यात मोदी आणल्याशिवाय चैन पडत नाही.