Skip to main content

सेल्फी-एक विकार???

लेखक पिके से पिके तक.. यांनी रविवार, 06/03/2016 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!! एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे... एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही.. आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल.... सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर.... विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे... शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात.... सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12795
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

In reply to by जेपी

हे नार्सिसिझम मंजे काय??
नार्सिसिझमची थोडीफार कल्पना येऊ शकेल असे लेखन मी इथे केले आहे.
एखाद्याला कुल्फी आवडत असेल तर काय म्हणाल..
आवड त्याला कुल्फीची sss आवड त्याला कुल्फीची sss कुल्फीच्या काडीची sss

नार्सिझम हा विकार एक व्यक्तिपुरता मर्यादित असतो. सार्वजनिक नार्सिझम ही संकल्पना मी तरी ऐकलेली नाही. सेल्फी हे एक सांप्रत बोकाळलेले खूळ आहे.संगणकावरील चॅटिंग ,वॉलपेपर, फेसबुक ,आर्कुट रिंगटोन या खुळाप्रमाणेच त्याचे होईल.

In reply to by चौकटराजा

नार्सिसिझम हा व्यक्तीपुरता मर्यादीत असला तरी शेवटी व्यक्तींचाच समाज बनतो. सारा समाजच हळूहळू नार्सिसिस्ट होत आहे की काय हा मुद्दा The Narcissism Epidemic: Living in the Age of Entitlement या पुस्तकात छान मांडला आहे. फेसबुक हे नार्सिसिस्टांचं "व्यक्त होण्याचं" आदर्श ठिकाण आहे. एखादया रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर ऑर्डर द्यायच्याही आधी "फेसबुक चेक इन" करून मी कुठे जेवायला आलो आहे हे जगाला सांगणारी व्यक्ती नार्सिसिस्ट असण्याची शक्यता असते. :)

In reply to by सतिश गावडे

माझे वेगवेगळ्या ग्रुपमधले दोन चांगले मित्र आहेत. त्यांची एक खासियत म्हणजे स्वतःच्या पर्सनालिटी अन स्वफोटोविषयी नितांत प्रेम आहे. वेगवेगळ्या ड्रेसमधले, वेगवेगळ्या अ‍ॅक्शनचे अन वेगवेगळ्या ठिकानी स्वतःचे फोटो काढायचे अन ते एडिट करत बसायचा दांडगा छंद आहे दोघांना. त्यातील एकाचे तर जवळ पास ३० ते ३५ हजार स्वफोटो आहेत. त्यातील बरेचसे फेस्बुकावर, वॉटस्पवर टाकणे चालूच असते. सेल्फी त्याला म्हणू शकतो की नाही म्हाईत नाही पण हे फोटो बरेचसे एडिटेड असतात. ह्याला आपण नार्सिसिझम म्हणू शकतो का गावडेसर?

सतत अन जिथे तिथे सेल्फी काढत राहणे हे आत्मरती (Narcissism) चे लक्षण आहे. या सवयीचा मोठ्या प्रमाणात अतिरेक होत असल्याने लोकांवरचा प्रभाव हळू हळू कमी होईल असे वाटते.

सात अब्ज लोकसंख्येत गेल्या दोनतीन वर्षांत ७५०! म्हणजे दरवर्षी एक कोटी लोकसंख्येत तीन! अहो, एवढ्या कमी रेटने कुठचीही अॅक्टिव्हिटी करताना मरायला होतं. झोपाळ्यांवरून पडून, दोरीत गळा अडकून वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात मुलं मरतात. म्हणून 'बागेत खेळणं हा महाभयंकर शोध आहे. त्यापासून सावध राहिलं पाहिजे' असं म्हणणार का तुम्ही? झोपाळ्यावर बसण्याला विकार म्हणणार का? उगीच पान पडल्यावर आकाश कोसळलं म्हणून कशाला ओरडायचं?

In reply to by राजेश घासकडवी

नशीब आकाशगंगेचा हिशोब नाही लावला... राजेश भाई..साधारण पाच वर्षापूर्वी जो आकडा शुन्य होता आणि तेव्हा कोणी कल्पना पण नसेल केली कि पुढे जाऊन सेल्फी पण मृत्यूचे कारण बनू शकेल , तिथे ७५० हा आकडा नक्कीच विचार करण्यालायक आहे.... आणि झोपाळ्यावर झोके घेताना वेगाचे आणि आजूबाजूचे भान नसल्यामुळेच अपघात घडेल.. ..त्याचप्रमाणे सेल्फी घेताना भान विसरणे हेच अपघाताला कारण ठरते.. बाकी सावधानता बाळगावी कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न....

In reply to by पिके से पिके तक..

हेच तर.. सेल्फीचा किंवा झोक्याचा कशाला... सर्वच अपघात हे वेगाचे आणि आजूबाजूचे भान (आणि तारतम्य) नसल्यामुळे होतात.

In reply to by राजेश घासकडवी

अपघात होणं आणि नको तिथे मुर्खपणा करताना अपघात ओढवुन घेणं ह्यात फरक नाही का? तुम्ही दिलेली उदाहरणं झालेल्या अपघाताची आहेत. मधे व्हॉट्स अ‍ॅपवर एका कड्याच्या टोकाला बसुन सेल्फी स्टिकने सेल्फी काढणार्‍या दिडशहाण्या ग्रुपचा फोटो आलेला त्यामधे ऑलमोस्ट अपघाताला निमंत्रण दिलेलं. दोन्हीमधे फरक आहे सर.

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! AMERICAN PSYCHIATRIC ASSOCIATION MAKES IT OFFICIAL: ‘SELFIE’ A MENTAL DISORDER त्यांनी त्या रोगाचे नाव सेल्फायटीस असे ठेवले आहे आणि तिचे वर्गिकरणही केले आहे... Borderline selfitis : taking photos of one’s self at least three times a day but not posting them on social media Acute selfitis: taking photos of one’s self at least three times a day and posting each of the photos on social media Chronic selfitis: Uncontrollable urge to take photos of one’s self round the clock and posting the photos on social media more than six times a day

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉक्टरसाहेब, हीच माहिती देणार्‍या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेच्या एखाद्या वेबसाईचा किंवा त्यांनी प्रमाणित केलेल्या एखाद्या पेपर चा दुवा आहे का?

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे ! >> विद्यमान पंतप्रधानांनाही ???

In reply to by तर्राट जोकर

Consistent Irrelevancy हासुद्धा एक मानसिक विकार असावा का? रच्याकने तुमचे प्रतिसाद वाचुन आमच्या संन्यासात गेलेल्या एका मित्रांची आठवण येते. त्यांचं नाव तीन अक्षरी आणि आडनाव दोन अक्षरी आहे. तुम्ही तेचं तर नव्हे?>

In reply to by तर्राट जोकर

http://www.misalpav.com/comment/814307#comment-814307
ह्या ठिकाणी श्री. तर्राट जोकर काय म्हणता नीट पहा
मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?
कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्
ओह आय सी. धाग्याचा विषय मोदी होता तर. सॉरी माफ करा. मला वाटलं धोकादायक पद्धतीने सेल्फी काढण्याबद्दल धागा होता का काय ते.

असे तर सगळीकडेच लोक सेल्फी काढताना, आज काय खाल्ले काय पिले हे सांगताना , फिलिंग यो आणि फिलिंग त्यों म्हणताना आणि पोस्ट करताना दिसतात. (मला शिकायचेय ते अजून) अश्या गोष्टी सारख्या वाचून वाचून मला सगळीकडे असे आपली टिमकी वाजवणारे लोक दिसू लागतात. कळत नाही - सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन. त्यातील लक्षुमण रेषा आपण सामान्य तर ओळखुच नाही शकणार, ओळखायचा प्रयत्न केला तरी नक्की नाही सांगता येणार. डॉक्टर्सना / psychologist ना चांगले दिवस आलेत का ?

In reply to by तर्राट जोकर

असे विधान मी तरी नाही केले. तुम्ही थोडा भाग उचलून त्याला ' येत ' असे जोडलंत. हे अति नाही का ? (खर तर मला हे सगळच अति वाटते. पण इथे दिग्गज लोक आहेत आपण त्यांचे विचार ऐकुयात.)

In reply to by सप्तरंगी

कळत नाही - सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन.>> ह्याचा अर्थ काय घ्यावा?

In reply to by तर्राट जोकर

बाकी - मी उगीचच कोणाला तरी सल्ले द्यायला जात नाही. पण तुमची माझ्या मनातली पहिली प्रतिमा एका त्रयस्थ विचारवंताची होती. नंतर ती बदलून हळूहळू "सार्वकालीन विरोधकाची" बनत गेली. असे वाटू लागले की मिपावरच्या एका आयडीने परकायाप्रवेश केला आहे. पुढे तर विरोधाच्या भरात तुम्ही फारच वाहवत चाललात, म्हणून जरा गाडीला ब्रेक लावायला हे प्रतिसाद.. आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. विरोध करण्याच्या नादात तुमचे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊन केवळ शब्दच्छलातच आनंद मानू लागलात की काय? असो, वाटते म्हणून बोलतो. पटले तर घ्या, नाहीतर सोडून द्या.. तुमचा हा जर परकायाप्रवेश असेल तर मग बोलणेच खुंटले..

In reply to by आनन्दा

तुम्हाला अध्याहृत असलेला शब्द बसवून पूर्ण प्रतिसाद परत लिहून दाखवाल का हो मराठीचे गुरुजी? आम्ही अजून 'कमल नमन कर' हेच गिरवतोय.

In reply to by तर्राट जोकर

सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism झालाय म्हणतात, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन आलंय म्हणतात. मूळ लेखकाच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत.

In reply to by आनन्दा

अगदी बरोबर आनन्दा, अनुमोदन आणि आभार !! मला म्हणायचेय: सारखे असे articles वाचून आणि मग लोकांना तसेच वागताना पाहून आपण मनात काहीतरी connect करत लोकांना judge करत जातो, आणि मग सगळीकडे असे लोक दिसू लागतात. पण लोक तसे असतातच असे नाही. म्हणून हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार वाटतो. डिप्रेशन, Narcissism किंवा अशी इतर निदाने इतक्या साध्याशा (सेल्फी काढण्याच्या / कधीच फोटोच न टाकण्याच्या etc ) गोष्टीवरून करता येऊ शकत नाहीत. अर्थात यामागे loneliness, publicity stunts, anxiousness अश्या छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात. पण म्हणजे काही लगेच 'विकार' नाही.

In reply to by अभ्या..

त्यांचा फोन आहे, ते स्वतःच स्वतःचा फोटो काढताहेत आणि त्यात इतरांना त्रास व्हायचं कारणंच काय? ते स्वतःच स्वतःचा फोटो काढत असताना माध्यमांनी ते दृश्य टिपले आणि ते बघून इतरांना त्रास होतोय.

In reply to by श्रीगुरुजी

आणि लेखकाच्या म्हणण्या प्रमाणे ती मनोरूग्णता आहे . मोदी सातत्यानं हाच प्रकार करतांना दिसतात .

In reply to by विवेक ठाकूर

दिवसातून ३ वेळा? या न्यायाने मोदींनी आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त फोटो शेअर करायला हवे होते. मोदी मनोरुग्ण आहेत का हे माहीत नाही, पण तुम्ही नमोरुग्ण आहात हे नक्की.

In reply to by विवेक ठाकूर

मोदी सातत्यानं हाच प्रकार करतांना दिसतात .
सातत्याने? गेल्या २१ महिन्यात मोदींनी किती सेल्फी काढल्या याची आकडेवारी आहे का? का एकच सेल्फी रोज ३ वेळा मोजता आणि शिव्या हासडता?

In reply to by श्रीगुरुजी

मोदींचे सेल्फी वेड तिथे इतरही फोटो आहेत पण त्याबरोबर त्यांच्या अनेक सेल्फीज आहेत. मोजदाद तुम्ही करा.

In reply to by विवेक ठाकूर

बुद्धीभेद करण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही विठा. १. ती गूगल इमेजेसची लिंक आहे. २. त्या लिन्कवर मोदींचे हजारो फोटो आहेत. ३. त्यातले फार तर १०० सेल्फी आहेत. तरी म्हणे सेल्फीवेडे. माझ्याकडे तुमचा प्रतिवाद करायला शब्दच नाहीत. पुरावे देताना किमान तपासून तरी बघत जा. की आपले उचलली जीभ?

In reply to by विवेक ठाकूर

सोप मॅथ आहे - मोदींचे पब्लिच लाईफ साधारन ३-४ वर्षांचे आहे.. म्हणजे १००० दिवस तरी नक्की होतील. दिवसाला ३ याहिशोबाने झाले की नाही ३०००?

.

"अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !"

.

ही अफवा (होक्स) आहे =)) =)) =))

. या बाबतीत सबळ दुवा मागण्याची तसदी यांनी आणि यांनी घेतली याचा आनंद झाला आहे ! :) "कोण्यातरी वर्तमानपत्र / टिव्हीवरची बातमी अथवा मुलाखत / मोठ्या संघटनेचे नाव (इथे, अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटना) असे नाव टाकले तर लोक पटकन डोळे मिटून विश्वास ठेवतात" असे लिहिले असते तर अनेक जण त्याचे खंडन करायला पुढे आले असते ! पुरावा खरा-खोटा, सबळ-दुर्बळ आहे की नाही ते पाहण्याऐवजी तो आपल्या माणसाने दिला की विरोधकाने, तो सोईचा आहे की गैरसोईचा हे पाहिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी हा एक छोटासा प्रयोग होता =)) हा प्रयोग किती यशस्वी झाला आहे की नाही हे इथल्याच काही प्रतिसादांवरून ज्याने त्याने ठरवावे. मिपाकरांच्या सोईसाठी, जालावरच्या अश्या अफवा सहज पडताळून पाहण्यासाठी उपयोगी दुवे : http://www.snopes.com/ http://urbanlegends.about.com/ http://www.breakthechain.org/ http://www.truthorfiction.com/ http://www.sophos.com/security/hoaxes/ http://www.hoax-slayer.com/ http://www.vmyths.com/ http://www.symantec.com/business/security_response/threatexplorer/risks… http://www.hoaxbusters.org/ http://virusbusters.itcs.umich.edu/hoaxes.html

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतत सेल्फी काढत राहणे हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याच्या बातम्या पूर्वी अमेरिकन माध्यमांत पाहिल्या होत्या. निरखून वाचल्या नव्हत्या. अशाच बातम्या कदाचित भारतीय माध्यमांतही आल्या होत्या. ती पार्श्वभूमी असल्याने अनेकांचा या अफवेवर विश्वास बसला असू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

:)) हुशारीने लावलेला सापळा लक्षात आला नाही म्हणून विशिष्ट आयडींची गोची झाली असावी. हा प्रकार हॉक्स आहे हे निव्वळ त्या दुव्यावर क्लिक केले असते तरी दिसले असते. ढळढळीत मराठीमध्येही मजकुर दिसत आहे आणि मपिची लिंक आहे. मोदींना शिव्या देण्याच्या नादात अशा चुका होतात. चालायचेच. :))

In reply to by मोदक

@खाडेसर, मोदीभक्तांच्या लक्षणात आणखी एकाची भर पडली. हुशारीने सापळा लावतात.

In reply to by मोदक

आम्ही म्हनायला पाहिजे भक्तांना गेट वेल फर्स्ट. एक छोटीशी पिंकही सहन झाली नाही आणि सेल्फी धाग्यावरही नमोभक्तांनी आक्रमण केले. सापळ्यात अडकवण्याच्या बाता मारणार्‍यांना आपणच सापळ्यात अडकलो ते कळत नाही. =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आम्ही तसदी घेतली नाही कारण आम्ही तुमच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवला.. असो. चूक झाली म्हणायची. :)

एकपण सेल्फी न देता लेख पुढे का दामटतआहे? जपून मागे धोका आहे असं पाहिजे. स्वत:चा एक छानसा फोटो दुसय्रा एका फोटोवर चिकटवता आला की झाला सेल्फी.तिथेच कशाला जायला हवं?पॅरिसच्या टावरच्या फोटोवर आपला फोटो बेमालूम चढवायचा.

आजकाल एक विशेष गोष्ट होत चाललीय भारतात....विषय कुठलाहि असला त्याची सुरवात कुठूनही होत असली तरी त्याचा धागा नरेंद्र मोदींशी जोडला जातो आहे...मी काही मोदीभक्त वैगरे नाही...पण तुम्हीही विचार करून पहा या गोष्टीचा...तुम्हाला लक्षात येईल... "गुरु" सिनेमा मधील एक dialogue आठवतोय..." जब लोग तुम्हारे हर बात के खिलाफ बोलने लगे तो समझ लेना कि तुम तरक्की कर रहे हो..."

In reply to by पिके से पिके तक..

त्याला कारण आहे. विषय कुठलाही असला, काही चांगलं झालं की मोदींशी त्याचा संबंध जोडला जातो. निगरगट्टपणे फोटोशॉपचाही आधार घेतला जातो. बाकी, गुरु सिनेमातला डायलॉग राहुल, केजरीवाल बाबतीतही खरा आहे असं म्हणावं काय?

माझ्या सेल्फोन ला एक मनोविकार झालेला आहे. त्यात अचानक क्यामेर्‍याचा मोड बदलतो. मग आपल्या समोरचे द्रुश्य न दिसता आपलाच फोटो परत परत काढला जातो. काय म्हणावं याला..... आपला थोबडा अर्र्र्र सं म हा, शब्द चेहरा असा वाचावा ) साठी ओलांडल्यामुळे सेल्फीच्या लायकीचा राहिलेला नाही सबब मी सेल्फी चा तिरस्कार करतो. मला कोणता बरं .....? विकार झालाय ?