गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 9:42 am

अस्सल (आणि उच्चही)

शिवकन्या यांची माफी मागून..

============================

कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात?
थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही!

नाचर्या पावसात, कोण रस्त्यात?
थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही!

चेहरा मनात, कोण आरश्यात?
अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही!

गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत?
लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही!

तपत्या उन्हात, कोण उरात?
गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही!

लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात?
शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही
======================================

दि ११.१२.२०१५

vidambanअनर्थशास्त्रकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितामुक्तकविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Dec 2015 - 10:23 am | प्रचेतस

एकच नंबर.

काव्य गूढार्थाने अगदी परीपूर्ण आहे.

पिंगू's picture

11 Dec 2015 - 10:28 am | पिंगू

गुढगुढी कविता..

नीलमोहर's picture

11 Dec 2015 - 10:57 am | नीलमोहर

थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही!

शिव कन्या's picture

11 Dec 2015 - 4:05 pm | शिव कन्या

:) लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? ;)

सतिश गावडे's picture

11 Dec 2015 - 8:16 pm | सतिश गावडे

एकदम फ्रेश वाटले बघा वाचून. थोडे हायकूच्या धाटणीचे वाटले काव्य. :)

ही कविताही शिवकन्या ताईंच्या कवितेसारखीच छान आहे.

एक एकटा एकटाच's picture

13 Dec 2015 - 9:14 am | एक एकटा एकटाच

मस्तच

एकुणच गेलरीच्या बाबतीत प्रत्येकाचे एक विलक्षण निरिक्षण आहे.

वाचायला मजा येतेय