✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sun, 11/01/2015 - 18:50  ·  लेख
लेख
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
57029 वाचन

💬 प्रतिसाद (316)

प्रतिक्रिया

अजून काही...

नंदन
Tue, 11/03/2015 - 14:04 नवीन
ज्यांचे लेखन-प्रतिसाद आवडतात, अशा बहुसंख्य आयडींची नावं वरील प्रतिसादांत आलीच आहेत. त्याशिवाय प्रदीप, राही, एकलव्य, बेसनलाडू, लिखाळ, चित्रा या मोजकंच, पण नेमकं आणि संदर्भपूर्ण लेखन करणार्‍या सदस्यांचा येथे उल्लेख करावासा वाटतो.
  • Log in or register to post comments

श्रावणचं नाव कोणी घेतलं की

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/04/2015 - 13:29 नवीन
श्रावणचं नाव कोणी घेतलं की नाही माहित नाही. माझ्या प्रतिसादात मी रोचक नावं असणार्‍या आयडींचाच उल्लेख करत होतो. पण श्रावणचं नाव आल्याशिवाय हा धागा संपू नये म्हणून हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मोठी लिस्ट

स्पा
Tue, 11/03/2015 - 14:08 नवीन
कुठले आयडी आवडतात हे सांगणे मला तरी लई अवघड आहे गेल्या पाच वर्षात अनेक जणांनी लागेल तेंव्हा मदत केलेली आहे . लगेच आठवणारे म्हणजे सूड, द बुव्या (ह.),परा, बिका,किसन शिंदे , , अप्पा जोगळेकर, टारु, पिव्डी , अपर्णा अक्षय, लीमौजेट, पैसा ताय,वल्ली, ब्याटम्यान , सुबोध खरे , सुहास झेले ,मृत्युंजय , प्यारे १ , जोशिले , अभ्या (सोलपुरत जौन पण मस्त टांग दिलेला ), क्लिंटन, ... तूर्तास इतके आठवतायेत , बाकी अजून आठवले कि सांगेनच :)
  • Log in or register to post comments

ऑ: अच्चं जालं तल =)) =)) =))

बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 17:39 नवीन
ऑ: अच्चं जालं तल =)) =)) =)) रच्याकने हा आमचा अजूनेक अवडता अयडी. तरीही स्पा अणि बुव्या यांच्यातील गहिरे नाते केवळ अवर्णनीयच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बास्स्स...नैतर नात्याला गहिरा

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 17:55 नवीन
बास्स्स...नैतर नात्याला गहिरा अर्थ देशील =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो मूळ नातेच इतके गहिरे आहे

बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 18:00 नवीन
अहो मूळ नातेच इतके गहिरे आहे की आमची लेखणी अजून काय गहिरे करणार? हे म्हणजे राजा रविवर्मा किंवा पिकासोचे चित्र फोटोशॉप वापरून सुधारतो म्हणण्यापैकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे.

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 18:10 नवीन
बुस्पा ही कंसेप्टच गहरी आहे. सिंक्रोनायझेशन चा उत्तुंग नमूना. बुवानी मिसळ मागवली तर स्पा लिम्बु पिळल. स्पावड्या ला ठसका लागला तर बुवा भांडे तोंडाला लावतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्पावड्या ला ठसका लागला तर

बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 18:16 नवीन
स्पावड्या ला ठसका लागला तर बुवा भांडे तोंडाला लावतील.
आणि अचानक भांडे तोंडाला लावले तर लाजून भांडे लपवतील. मगः १. मी असा हसेन- "हीह्ही, हीह्ही, हीह्ही!!!!" २. मी असे विचारेन- "(तोंडाला लावून) भांडे का लपविता???????????????????????????"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मेलो रे.

प्रचेतस
Tue, 11/03/2015 - 18:28 नवीन
मेलो रे. बुवाचा लाजून भांडे लपविणारा चेहरा डोळ्यांसमोर आला ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माझ्याही डोळ्यांसमोर अला. =))

बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 18:31 नवीन
दू दू दू =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/04/2015 - 08:51 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+१

सूड
Tue, 11/03/2015 - 18:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बुस्पा =))

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 18:45 नवीन
बुस्पा
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/04/2015 - 08:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

स्पावड्याला टांग देणे या एकाच

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 18:26 नवीन
स्पावड्याला टांग देणे या एकाच कामगिरीसाठी माझे नाव मिपावर सुवर्णाक्षरात कोरण्यात यावे ही नम्र विनंती. बाकी कोरणार मीच त्यामुळे सोने फ़क्त द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुझं नाव कोरायला फार तर मी

सूड
Tue, 11/03/2015 - 19:06 नवीन
तुझं नाव कोरायला फार तर मी शेंगदाणा चटणी देईन, बघ त्यानं जमतंय तर!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ती हितंबी मिळती किलोने.

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 23:50 नवीन
ती हितंबी मिळती किलोने. बघतो माझं मी कसं कोरायचं ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

भेंडी

इरसाल
Tue, 11/03/2015 - 14:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

सूड
Tue, 11/03/2015 - 15:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

एक नाही पुरणार!!

सूड
Tue, 11/03/2015 - 15:13 नवीन
एक नाही पुरणार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

दिवाळीमुळे

इरसाल
Tue, 11/03/2015 - 15:50 नवीन
स्टॉक लिमीटेड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

.............

_मनश्री_
Tue, 11/03/2015 - 18:25 नवीन
प्रभाकर पेठकर मार्गी डॉ . सुबोध खरे मोदक सानिका स्वप्निल गणपा पैसा
  • Log in or register to post comments

ज्यांना भेटलोय ते बहुतेक

प्रचेतस
Tue, 11/03/2015 - 19:06 नवीन
ज्यांना भेटलोय ते बहुतेक सर्वच आयडी जवळचे झालेत. न भेटलेल्या आयडींपैकी ज्यांना भेटायची खूप इच्छा आहे असे आयडी- चिगो - अतिशय निगर्वी, ह्याच्याबरोबर मेघालयातील किस्से ऐकायची खूप इच्छा आहे. आतिवास - विविध अनुभवांचं प्रचंड विश्व एस - भेटून फोटोग्राफी, पर्यावरण, ट्रेकिंग अशा विविध गप्पा मारायच्यात फ़क्त. पण हे स्वत:बद्दल कायम मुग्धच असतात. राही - ह्यांचही अनुभवविश्व प्रचंड समृद्ध. कोणत्याही विषयावरील माहितीचा कोष. अवतार - प्रतिसाद अतिशय मोजके पण विलक्षण संतुलित आणि नेमके. ह्या पाच जणांना भेटायची खूप इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

ह्यामध्ये पामर या आयडिला ऍड

अभ्या..
Tue, 11/03/2015 - 19:09 नवीन
ह्यामध्ये पामर या आयडिला ऍड करावे असे वाटते. की तुझाच आयडी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

माझा नै तो आयडी. अतिशय

प्रचेतस
Tue, 11/03/2015 - 19:12 नवीन
माझा नै तो आयडी. अतिशय मोजकेच प्रतिसाद आहेत त्यांचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

:-)

एस
Wed, 11/04/2015 - 00:08 नवीन
एक दिवस भेटू. भुलेश्वराला जाऊ कॅमेरे घेऊन. पण आत्तातरी नाही जमणार. :-) तुम्ही व चौरांसोबत कॅमेराकट्टा, कंजूसरावांसोबत बोन्साय कार्यशाळा, सुधांशूनूलकर आणि भटक्या खेडवाला यांच्याबरोबर आंबोलीला मॅक्रो फोटोग्राफी, यशोताई व मार्गीसाहेबांबरोबर लद्दाख फेरी, चिगोंसोबत मेघालयातील लिव्हिंग रूट्स ब्रिज पाहणे, रामदास यांच्यासोबत दक्षिण मुंबईत पायी कट्टा करणे, स्नेहाताईंकडे कोल्हापूरला तांबडा-पांढरा रस्सा हाशहुश्श करत हाणणे, प्रीमोंबरोबर जुन्या गोव्यातील संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहत फिरणे, आदूबाळांबरोबर सवाईला जाणे, नगरीनिरंजनांबरोबर सुदर्शन रंगमंचाला प्रायोगिक नाट्यचळवळीबद्दल चर्चा करणे, विक्षिप्त अदिती आणि परा यांच्यासोबत बसणे, झालंच तर पैतायला अर्धा कप चहा नक्की पाजतो असं तोंडभरून आश्वासन देऊन तिच्या बागेतले काजू पिशवीत टाकून घेऊन येणे वगैरे वगैरे बरीच मोठी बकेट लिस्ट आहे...;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी नक्कीच. :)

प्रचेतस
Wed, 11/04/2015 - 06:48 नवीन
अगदी नक्कीच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

एस इन्शागणपती नक्की फिरवु

प्रीत-मोहर
Wed, 11/04/2015 - 07:11 नवीन
एस इन्शागणपती नक्की फिरवु गोवा. ते करताना तुमच्या क्यामेराला प्रत्यक्श काम करताना पाहता येईल. ही एक खुप दिवसांची इच्छा अाहे.(क्यामेरा घेतल्यापासुन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बॅट्या तुझे इन्शा गणपती लैच

अभ्या..
Wed, 11/04/2015 - 12:07 नवीन
बॅट्या तुझे इन्शा गणपती लैच फेमस झालेय रे नेटवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

Im in for Laddakh pheri

यशोधरा
Wed, 11/04/2015 - 11:42 नवीन
Im in for Laddakh pheri anytime!! Ambolimadhe pan mi yenaar!! Aamachya kokanaat yenaar tumhi mag mi nako asa kasa
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

येवा!

पैसा
Wed, 11/04/2015 - 13:59 नवीन
काजू आपलेच आसात! येताना तेवढा अर्धा कोप च्या पार्सल करून आणा म्हणजे झाले. नुसते आश्वासन नको. पुण्यातला च्या म्हणून म्युझियमात ठेवीन तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ख्यिक!

एस
Wed, 11/04/2015 - 16:06 नवीन
ख्यिक! अलबत! अलबत! इन्शापुणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नाजाल्यार काजूंच घेवन येवा!!

सूड
Wed, 11/04/2015 - 16:13 नवीन
नाजाल्यार काजूंच घेवन येवा!! केळकर मुजियमांत ठेवतंव आमी गोंयचे म्हणान!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आपली आवड

तर्री
Tue, 11/03/2015 - 19:44 नवीन
येथे जे आवडणारे आ.डी आले आहेत त्या सगळ्यांशी सहमत. शिवाय यांचे ही स्मरण - क्रिकेटर जे पी मोर्गन , आयायटी वाले युयुत्सु ,तुम्हाला कोण क्ष्क्ष वाल्या शुचीतै , व्यासंगी राजघराण , गंगाधर म्हाम्ब्रे मुटे , सुधीर काळे काश्मिरकर इत्यादी ! ओम शांती !
  • Log in or register to post comments

मला आवडलेले आय डी

मी-सौरभ
Tue, 11/03/2015 - 23:29 नवीन
हे आय डी मला त्यांच्या नावातल्या नविन पणा साठी आवडले. आपण कसा साधा सुधा आय डी घेतलाय असं पण वाटून जाते १. तिराशिंगराव माणूसघाणे २. बोका ए आझम ३ मा पं ४. प रा ५ टारज़न ६ गगनविहारी ७ चतुरंग अजुन खुप आहेत.
  • Log in or register to post comments

इंटरेस्टिंग धागा

समीरसूर
Wed, 11/04/2015 - 09:45 नवीन
माझ्या आवडीचे आयडी बरेच आहेत. आत्ता लगेच आठवणारे देतो... गवि - मुद्देसूद आणि मनोरंजक तरीही माहितीपूर्ण लेखन स्नेहांकिता - गोष्ट रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी माधुरी विनायक - ठाम, प्रामाणिक, साधे तरीही हृदयाला भिडणारे सशक्त लेखन पैसा - स्पष्ट आणि तरीही कुणाला न दुखावणारे लेखन अतिवास - कृती अजोड, लेखन अजोड चिगो - अनुभवसंपन्न कसदार लेखन सोन्याबापू - चित्र उभे करणारे दृश्यलेखन जव्हेरगंज - दमदार कथा. (शुद्धलेखन जरा तपासून पाहिले आणि बाज बदलत ठेवला तर वाचनानंद द्विगुणित होईल हे नक्की) इस्पिकचा एक्का - प्रवासवर्णन उच्च दर्जाचे श्रीरंग जोशी - संदर्भनवाज. अतिशय मनमोकळे लेखन. इतरांना सतत प्रोत्साहन देत राहण्याची कला. यांना देखील भेटलेलो आहे. फंटासटिक व्यक्तिमत्व! मुवि - दिल को जीत लेनेवाला लिखते हैं... माईसाहेब - यांचे प्रतिसाद खरोखर वाचनीय असतात. टायमिंग अचूक आणि चिमटा काढणे करावे ते याच आयडीने. पण तरीही मार्मिक भाष्य अगदी मोजक्या शब्दात करून जातात. धमाल मुलगा - यांना भेटलेलो आहे. जबरदस्त माणूस. परा - क्या लिखता ही ये बंदा. पता नही फिलहाल कहां हैं...आ जाओ भाई, फिर से छा जाओ... अजून बरेच आहेत. खरं म्हणजे सगळेच मिपाकर एकमेवाद्वितीय आहेत. आणि मला सगळेच आवडतात. वाद झाले असतील कधी-मधी पण ते माझ्याकडून तेवढ्यापुरतेच होते. इतकी टाळकी एकत्र आल्यावर वाद होणारच; पण मनात कुणाच्या काही नसावे असे वाटते. मिपा रॉक्स! अजून बरेच जण राहून गेले असतील. त्यांची सगळ्यांची माफी मागतो.
  • Log in or register to post comments

मुददेसूद

भंकस बाबा
Sun, 11/08/2015 - 17:13 नवीन
मी मिपावर नविनच आहे,तरिही आवडणार्या आईडी बद्दल बोलायचा मोह टाळू शकत नाही. श्रीरंग जोशी व् गैरी ट्रूमैन . हे दोघेही मुद्देसुद लिहिण्यात बाप माणूस आहेत. उद्या कधी यांनी खोटी माहिती जरी मुद्दे मांडून टाकली तरी मला ती खरी वाटेल
  • Log in or register to post comments

संक्षी!

विवेक ठाकूर
Sun, 11/08/2015 - 20:07 नवीन
अत्यंत आवडता आयडी! कुणाला आणि केंव्हाही बिन्धास्त मदत करण्याची तयारी (मागे एका सदस्येच्या वडिलांचे ८५,००० रुपये ऑन लाईन खरेदीत गेले होते तेंव्हा संक्षींनी ओपन चायलेंज देऊन पैसे परत मिळवून देईन असं सांगितलं होतं). संक्षींच्या लेखनातून जगण्याची नवी दिशा मिळायची. हा माणूस अत्यंत स्वच्छंद जगत असणार. वादविवादात तर त्यांच्या इतका मुद्देसूद माणूस दुर्मिळ. साहित्य आणि काव्य यावर सुद्धा संक्षींची सुरेख कमांड होती. अत्यंत वाचनीय लिहीणारा लेखक म्हणून संक्षींची कायम आठवण येते.
  • Log in or register to post comments

णमस्कार सर!

पिलीयन रायडर
Sat, 12/05/2015 - 23:07 नवीन
णमस्कार सर! हे तुमचं आत्मचरित्र का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ठ्ठो !!! किती ती भक्ती..

स्रुजा
Sat, 12/05/2015 - 23:16 नवीन
ठ्ठो !!! किती ती भक्ती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

संक्षी, नमस्कार हो. ते ३१

बॅटमॅन
Sun, 12/06/2015 - 16:24 नवीन
संक्षी, नमस्कार हो. ते ३१ जुलैची भ्रामक कामे संपली की काय? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

नमस्कार संक्षी सर ,

प्रसाद गोडबोले
Sun, 12/06/2015 - 23:35 नवीन
नमस्कार संक्षी सर , नवीन आय डी approve झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

अजून कुणीच डॉ.श्रीराम

गणामास्तर
Mon, 11/09/2015 - 10:48 नवीन
अजून कुणीच डॉ.श्रीराम दिवटेंची आठवण कशी काय नाही काढली ब्वॉ ? आम्हाला तर फार आवडायचा तो आयडी ;)
  • Log in or register to post comments

मला संजय क्षीरसागर आणि

प्रसाद गोडबोले
Mon, 11/09/2015 - 18:49 नवीन
मला संजय क्षीरसागर आणि निराकार गाढव हे दोन आयडी फार्फार आवडायचे ! आयडी डीलीट केल्यावर किमान त्यांचे लेखन तरी वाचमात्र अवस्थेत ठेवावे अशी काहीतरी सोय असली पाहिजे राव !
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/user

मोदक
Mon, 11/09/2015 - 18:51 नवीन
http://www.misalpav.com/user/18002/Authored
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरे वा !!

प्रसाद गोडबोले
Mon, 11/09/2015 - 18:54 नवीन
अरे वा !! लेखन अजुन उपलब्ध आहे की ! मागे एकदा शोधले होते तर सापडलेच नव्हते ... चला आता जरा हेवनमध्ये चक्कर टाकुन येतो ! निराकार गाढवाच्या लेखनाची लिन्क शोधतो अता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

यावरनं आठवलं !

विवेक ठाकूर
Tue, 11/10/2015 - 17:50 नवीन
स्त्री आयडी घेऊन इथे वावरणार्‍या पुरुष आयडी विरुद्ध, संक्षीनी जबरदस्त आवाज उठवला होता. शेवटी त्या आयडीला पुरुष आयडी घ्यावा लागला. एकदा मुद्दा योग्य आहे म्हटल्यावर त्यांनी कसलीच पर्वा केली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

होय हो ! त्या सखाराम गटणे

स्रुजा
Sat, 12/05/2015 - 23:18 नवीन
होय हो ! त्या सखाराम गटणे सारखे तुमचे २ आदर्श दिसतायेत, ग्रेस आणि संक्षी. पुन्हा आवाज उठवा बघु . मुद्दा अजुन ही योग्य च आहे. अतिशय अर्थपूर्ण भावांजली होईल तुमच्या आदर्श आयडी ला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

मला सध्या तरी कोणताच आयडी

सागरकदम
Tue, 11/10/2015 - 13:14 नवीन
मला सध्या तरी कोणताच आयडी आवडत नाहे पण इथे बरेच आहे जे माझ्याशी भांडतात व नंतर मी आवडू लागतो
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 13:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा