✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(इच्छामटण)

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 09/08/2015 - 16:45  ·  लेख
लेख
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते. अगदी गावाबाहेरच्या हॉटेलात जाऊन मटण खायचे म्हणले तरी कोणी ना कोणी नातेवाईक भेटायची भीती वाटते . शेवटी प्रत्येक गावाबाहेर असे हॉटेल असावे कि जिथे इच्छामटण मिळावे आणि निर्भयपणे खाता यावे असा विचार येतो. हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या गावाबाहेरील असे मस्त मटण मिळणारे ढाबे हॉटेल्स कळतील.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
66141 वाचन

💬 प्रतिसाद (264)

प्रतिक्रिया

येत्या

नाखु
Tue, 09/08/2015 - 16:50 नवीन
शनीवारी टाकला असता तर आत्तापर्यंत ५० तर नक्कीच झाले असते. अभामिपापुनवाआमुशसार्ख्याच्सम्जणाराभोळ्याचिमणाच्यादोस्त्दातरूचामित्रबॅट्याचास्नेहीबुवांचा फॅन नाखुस भाजीपाला
  • Log in or register to post comments

आवडीचा विषय -

जेपी
Tue, 09/08/2015 - 16:51 नवीन
आवडीचा विषय - तुळजापुर ला गेलात तर मटण जरुर खावे, एखाद्या मराठा मित्राच्या घरी . त्रिखंडात मिळणार नाही. आठवुण तोंड पाणावले.
  • Log in or register to post comments

यस्स स्पेशली बोकडच ! लै जबरा

विशाल कुलकर्णी
Tue, 09/08/2015 - 16:55 नवीन
यस्स स्पेशली बोकडच ! लै जबरा चव असती. त्याबरोबर गरमागरम शेरवा (रश्श्याला आमच्या भागात शेरवा म्हणायची पद्धत आहे) नुसता ओरपायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

उमरग्याच्या जवळ खस्गी (कसगी)

अभ्या..
Sat, 09/12/2015 - 14:02 नवीन
उमरग्याच्या जवळ खस्गी (कसगी) म्हणून गाव आहे. तिथे बाजार मटन असते. मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी ते दुकान उघडते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ६ ते ७ बोकड पडतात. एक पाल असते. अ‍ॅल्युमिनियमच्या थाळीत रस्सा अन भाकरी हाणायसाठी फोर व्हीलरवाल्यांची पण गर्दी असते. कंदुरीची आठवण करुन देणारी अस्सल माराठवाडी मटणाची टेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

कसगीवाल्यांन एक शाखा लातुरात

जेपी
Sat, 09/12/2015 - 19:19 नवीन
कसगीवाल्यांन एक शाखा लातुरात पण चालु केलती.फ्रेंचायझी टाईप.सुरुवातीला चव चांगली होती पण नंतर बंद पडल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तसा चंदीगडमध्ये

बोका-ए-आझम
Sun, 09/13/2015 - 23:31 नवीन
सेक्टर ४३ मध्ये असलेला दीपक ढाबा. त्याचं बटर चिकन आणि मलाई मटन खायला प्रचंडच गर्दी असते. आम्हाला एक तास वाट पाहिल्यावर मिळालं आणि तेही पार्सल घेऊन यावं लागलं. तिथे बसून खायला जागाच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण

जेपी
Tue, 09/08/2015 - 16:58 नवीन
पुण्यात मिळणार बोल्हाईचे मटण हा आजपर्यंत न कळलेला प्रकार आहे. कुणी खुलासा करेल का ?
  • Log in or register to post comments

मेंढीचे मटण म्हणजे बहुतेक

विशाल कुलकर्णी
Tue, 09/08/2015 - 17:01 नवीन
मेंढीचे मटण म्हणजे बहुतेक बोलाईचे मटण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बरोबर.

बबन ताम्बे
Tue, 09/08/2015 - 17:02 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

खुप पुर्वी फक्त बोल्हाईचेच

सौंदाळा
Tue, 09/08/2015 - 17:04 नवीन
खुप पुर्वी फक्त बोल्हाईचेच मटण खाणार्‍या एका मित्राने सांगितले होते. ज्या लोकांची कुलदेवी क्षक्षक्ष असते (देवीचे नाव आता लक्षात नाही म्हणुन क्षक्षक्ष लिहिले आहे) त्यांना बोकडाचे मटण निषिद्ध असते अशी समजुत आहे. म्हणुन ते बोल्हाईचे मटण खातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

काय फरक पडतो?

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/08/2015 - 17:15 नवीन
शेळी, मेंढी का बकरी … काय फरक पडतो? खावा की ;) बाकी बोकडाचे मस्त असते. नागपुर ट्रीपमध्ये एक संध्याकाळ खास सावजी बोकड मटणासाठी असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बोल्हाई ही मेंढी ची जात आहे.

लालगरूड
Wed, 09/09/2015 - 21:15 नवीन
बोल्हाई ही मेंढी ची जात आहे. एकदम चविष्ट बोकडापेक्षा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

पुण्याच्या आसपासचे काही फारसे

विशाल कुलकर्णी
Tue, 09/08/2015 - 17:03 नवीन
पुण्याच्या आसपासचे काही फारसे माहीत नाही. सोलापूरातुन हैदराबादकडे जाताना हैदराबाद रोडवर एक 'चाचा'चा धाबा आहे. त्याच्याकडे मटणाचे लोणचे मिळते. लै कातिल प्रकार असतो तो.
  • Log in or register to post comments

नशीबवान हो …

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/08/2015 - 17:11 नवीन
आमच्यासारख्या लोकांकडे पाहून खुश व्हा. आमच्या घरात फक्त अंडच (कोंबडीचच) खायला चालत :( सदासर्वकाळ बाहेरचेचा मटणखाऊ
  • Log in or register to post comments

सब झुट है....

बाबा योगिराज
Tue, 09/08/2015 - 17:34 नवीन
आईच्या हातच काळ्या वाट्नातल मट्न येक लम्बर. आहा हा हा... . . निस्त्या आट्वनिन त्वंडाला पानी सुट्ल.... (स्मा. क.) . . . ------ धा ठिकानी तर्री वरपनारा बाबा.
  • Log in or register to post comments

जळवा

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 09/08/2015 - 18:03 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं

विशाल कुलकर्णी
Tue, 09/08/2015 - 17:44 नवीन
पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं मस्ट आहे मटण हाणायला :)
  • Log in or register to post comments

पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं

प्रसाद गोडबोले
Tue, 09/08/2015 - 18:21 नवीन
पंत, ठरवा आता, कुठेतरी भेटणं मस्ट आहे मटण हाणायला :)
इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे बोल्हाई च बनवतात , त्यात मजा येत नाय राव . तुमच्या माहीतीत पुण्यात कोठे भारी मटन मिळणारे हॉटेल असल्यास कळवा ... श्रावण संपला की भेटुच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

पुण्यात कोठे भारी मटन मिळणारे हॉटेल

होबासराव
Tue, 09/08/2015 - 18:26 नवीन
बोकड मस्ट्..आणि तर्रि..प्लिज कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

गारवा..

बाबा योगिराज
Tue, 09/08/2015 - 18:45 नवीन
चांदणे चौकातुन पिरंगुट कडे जाताना डाव्या हाताला तलाव लागतो...... तलवाच्या फुडच (डाव्या हातालाच) गारवा नावाच हाटिल हाये. येक लम्बर मटन मिळत. हांडी (भांड) न देता कुकर मध्ये शिजवून डायरेक्ट कुकरच पुढ्यात आणुन ठेवतील. काळ्या रश्यातल मटन / चिकन वाह......... लय भारी. झक्कासच. . . . . संध्याकाळचा नजारा पन झक्कासच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे

गणामास्तर
Wed, 09/09/2015 - 00:24 नवीन
इथे आमच्या चिंचवड साईडला सगळे बोल्हाई च बनवतात असे काही नाही. 'पन्हाळगड','राजवर्धन' ला बोकडाचं सुद्धा मिळतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पन्हाळगड ला जाऊन आलोय , फारच

प्रसाद गोडबोले
Wed, 09/09/2015 - 12:12 नवीन
पन्हाळगड ला जाऊन आलोय , फारच सर्वसामान्य मटण होते , काही मजा आला नाही राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

राजवर्धन ट्राय करुन पाहा एकदा

गणामास्तर
Wed, 09/09/2015 - 13:59 नवीन
राजवर्धन ट्राय करुन पाहा एकदा..चांगली आहे त्यांची चव. बनवा प्लॅन, आम्ही येउचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नुकताच राजवर्धन ला जाऊन आलो

प्रसाद गोडबोले
Tue, 10/27/2015 - 23:10 नवीन
नुकताच राजवर्धन ला जाऊन आलो ... एकच नंबर मटन आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

पुणॅ कँप

राजेंद्र मेहेंदळे
Fri, 10/30/2015 - 14:59 नवीन
बागबान किंवा ब्लु नाईल मधे खाउन बघा एकदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ब्लु नाईल

लई भारी
Mon, 11/02/2015 - 17:01 नवीन
ब्लु नाईल काय झेपल नाही राव! आणि बागबान मध्ये आत एन्ट्री मिळायची मारामार, विशेषतः विकांताला, त्यामुळे बरेच दिवस इच्छा राहिलीय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 17:08 नवीन
ब्लू नाईल ओक्के आहे. लई भारी वाटलं नाही. बागबानमध्ये तर एकटा असताना प्रवेशच नै दिला, म्हणे सिंगल नॉट अलाउड. गेलात उडत म्हटलं मग, इतर लय हाटेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी

बागबानमध्ये तर एकटा असताना

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 17:26 नवीन
बागबानमध्ये तर एकटा असताना प्रवेशच नै दिला, म्हणे सिंगल नॉट अलाउडबागबानमध्ये तर एकटा असताना प्रवेशच नै दिला, म्हणे सिंगल नॉट अलाउड
हाटेल मालक बच्चनच्या बागबानचा लै चाहता दिसतोय. बच्चनचा एकटेपणा बघवला नसेल रे . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी =))

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 17:35 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बागबानमध्ये तर एकटा असताना

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 21:23 नवीन
बागबानमध्ये तर एकटा असताना प्रवेशच नै दिला, म्हणे सिंगल नॉट अलाउड
WTF
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय डब्ल्यु टी एफ बे?

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 21:27 नवीन
काय डब्ल्यु टी एफ बे? वाटतो तुला फुकट ? की वाईन टक्याला फुकट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

प्रगो सारख्या 'संवेदनशील

प्यारे१
Mon, 11/02/2015 - 21:30 नवीन
प्रगो सारख्या 'संवेदनशील मनाच्या लेखकास' शब्द बोचतील बरं. संदर्भ - फ*****
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

रुचीहिन प्रतीसाद =))

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 21:52 नवीन
रुचीहिन प्रतीसाद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फ*****

कपिलमुनी
Tue, 11/03/2015 - 16:18 नवीन
फ***** = फकीरचंद *दरचो* = चादरचोर असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 16:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वाईच तु फूट

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 21:50 नवीन
वाईच तु फूट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मटण टकाटक आणि मटण कराची झाक

मालोजीराव
Tue, 11/03/2015 - 12:58 नवीन
मटण टकाटक आणि मटण कराची झाक आहेत बे, ट्राय कर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

होना

विनटूविन
Sat, 12/03/2016 - 12:45 नवीन
टेस्टलेस असते ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ना खाऊंगा , ना खाने दूँगा

द-बाहुबली
Tue, 09/08/2015 - 17:54 नवीन
ना खाऊंगा , ना खाने दूँगा च्या औचित्यावर हा धागा आहे की ...विडबंन आहे.. जे काही आहे एक सणसणीत चपराक आहे.
  • Log in or register to post comments

नाय ओ ! तुमी ह्ये वाच्लं नाय

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/08/2015 - 18:00 नवीन
नाय ओ ! तुमी ह्ये वाच्लं नाय कां ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

पंख लागले त्या धाग्याला

वपाडाव
Mon, 01/07/2019 - 15:56 नवीन
पंख लागले त्या धाग्याला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पंख नाय लागले. त्याचा पत्ता

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/07/2019 - 19:51 नवीन
पंख नाय लागले. त्याचा पत्ता थोडासा बदलला आहे. :) https://www.misalpav.com/node/32647 इथे आहे ते. मिपा सिक्युअर सर्वरवर गेले आहे. त्यामुळे सगळे जुने दुवे http:// ऐवजी https:// ने सुरु होतात. जुन्या दुव्यांत तेवढा s टाकला की ते लेख दिसू लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

लाल मास

बोका-ए-आझम
Tue, 09/08/2015 - 18:08 नवीन
राजस्थान-हरयाणामध्ये मिळणारं लाल मास हापण एक खल्लास प्रकार. काहीतरी वेगळाच मसाला असतो पण लागतं खल्लास. जैसलमेरसारखं अफाट वाळवंट, शेकोटी, टिपिकल राजस्थानी कडक रोटी अाणि गरमागरम लाल मास हा खास थंडीत अनुभवण्याचाच प्रकार आहे.
  • Log in or register to post comments

मागच्याच आठवड्यात खाल्लं लाल

विशाल कुलकर्णी
Wed, 09/09/2015 - 12:22 नवीन
मागच्याच आठवड्यात खाल्लं लाल मास. कोट्यात होतो आठवडाभर. दोन-तीन वेळा खाल्लं. आणि मग आठवलं श्रावण चालु आहे ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मस्तच ..

सुयशतात्या
Wed, 09/09/2015 - 13:07 नवीन
कोट्यात लै भारि जेवण मिलते राव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

श्रावण अाणि लाल मास

बोका-ए-आझम
Sat, 09/12/2015 - 11:21 नवीन
हे दोन्हीही एकाच देवाने निर्माण केलेले आहेत. तस्मात दाने दाने पे किंवा पीस पीस पर लिखा है खानेवाले का नाम असे म्हणावे आणि लाल मास हाणावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

:-D :-D :-D

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/08/2015 - 18:37 नवीन
:-D :-D :-D ================== समां तर :- पुढिल भाग- टनाटन मटन ! :P
  • Log in or register to post comments

मटण खात नाही तस्मात पास. पण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/08/2015 - 18:50 नवीन
मटण खात नाही तस्मात पास. पण चिकन, मासे आणि अंड्याचे उत्तम प्रकारही शेअर कराचं इथे.
  • Log in or register to post comments

ग्रीक मटणाची पाकृ नसल्याने

आदूबाळ
Tue, 09/08/2015 - 18:53 नवीन
ग्रीक मटणाची पाकृ नसल्याने धाग्याचा णिशेध.
  • Log in or register to post comments

ग्रीक मटणाची पाकृ

प्रसाद गोडबोले
Tue, 09/08/2015 - 19:50 नवीन
ग्रीक मटणाची पाकृ
ग्रीक मटनाची पाककृती ब्यॅटुअण्णां कडे मिळु शकेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा