✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोवळा हुंकार

स
समयांत यांनी
Mon, 11/17/2014 - 13:13  ·  लेख
लेख
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं दोन ठोकर खात मला माझं संपवावं रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत. कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात. विखुरलेलेपण सारखे वाढते आहे, माझा पसारा अनंत आहे असे नाही तर अनादी पसाऱ्यात मीच आलो आहे; चक्रव्युहाहून बेहत्तर असा फेर आहे. खोल प्रेम आर्ततेने हवंस झालंय. दरीत उठलेल्या ध्वनीप्रमाणे माझा जीव आदळत राहतोय; दरीच्या कोपऱ्यात गुडूप झालेल्या विंचवाची ईर्ष्या होते आहे. असो काही का असेना जन्मलेल्या जीवाला मिळणारे हे आयुष्यभराचे फटकारे आहेत. खोल झोकून द्यायचे आहे दरीत
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
कविता
प्रेमकाव्य
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिसाद
आस्वाद
लेख
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
3027 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

अरे भाई

अत्रन्गि पाउस
Tue, 11/18/2014 - 08:34 नवीन
अरे भाई केहेना क्या चाहते हो ????
  • Log in or register to post comments

कुछ नही जो आप समजो

समयांत
Tue, 11/18/2014 - 13:37 नवीन
कुछ नही जो आप समजो प्रेमप्रकरणाचा पंचनामा म्हणा हवं तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

अच घलल का

जेपी
Tue, 11/18/2014 - 13:54 नवीन
अच घलल का
  • Log in or register to post comments

म्हंजे ?

समयांत
Wed, 11/19/2014 - 15:30 नवीन
म्हंजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

प्रेमप्रकरणाचा पंचनामा

कपिलमुनी
Wed, 11/19/2014 - 15:39 नवीन
असा लिहू नका .. पहिल्यापासून डीट्तेलमधे लिहा.
  • Log in or register to post comments

समयांत

जेपी
Wed, 11/19/2014 - 15:50 नवीन
समयांत आमच्या संघटनेत या. प्यार का पंचनामा करतो सगळे मिळुन.
  • Log in or register to post comments

कोणती तुमची संघटना ??

समयांत
गुरुवार, 11/20/2014 - 09:30 नवीन
कोणती तुमची संघटना ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

सध्ध्या नाव नाहिये

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/20/2014 - 09:40 नवीन
सध्ध्या नाव नाहिये :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समयांत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा