कोवळा हुंकार
नेहमी सकाळी तुला आठवतांना माझ्या घट्ट मिटल्या पापण्यांतून ओघळून जाऊ नयेस तू
कोवळा हुंकार देऊन आपलंस करावं
अलगद जीव गुंतवत जीवन उलगडावं
दोन ठोकर खात मला माझं संपवावं
रात्र बेरात्र फुललेल्या जाईजुईत हुंडदावं
नकोशी घागर डोक्यावर घेऊन नाचावं
प्राणपणाशी रोज पोरकट प्रेम भिजवावं
वरच्या तीन ओळी तुटक आहेत तरी माझ्या तुटलेल्या रेषा व्यक्त करू शकत नाहीत.
कुठे आणि कुठवर जातो आहोत आपण, हा मानसिक प्रश्न मला सतावतो आहे. जवळ रक्ताच्या माणसांनी यातना खूप दिल्यात. विखुरलेलेपण सारखे वाढते आहे, माझा पसारा अनंत आहे असे नाही तर अनादी पसाऱ्यात मीच आलो आहे; चक्रव्युहाहून बेहत्तर असा फेर आहे.
खोल प्रेम आर्ततेने हवंस झालंय.
दरीत उठलेल्या ध्वनीप्रमाणे माझा जीव आदळत राहतोय; दरीच्या कोपऱ्यात गुडूप झालेल्या विंचवाची ईर्ष्या होते आहे. असो काही का असेना जन्मलेल्या जीवाला मिळणारे हे आयुष्यभराचे फटकारे आहेत.
खोल झोकून द्यायचे आहे दरीत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे भाई
कुछ नही जो आप समजो
अच घलल का
म्हंजे ?
प्रेमप्रकरणाचा पंचनामा
समयांत
कोणती तुमची संघटना ??
सध्ध्या नाव नाहिये