✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अरविंद बरोबर दीड तास!

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 03/20/2014 - 13:24  ·  लेख
लेख
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं. या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
80166 वाचन

💬 प्रतिसाद (219)

प्रतिक्रिया

ढगाला लागली कळं, 'आप' थेंब थेंब गळं

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 10:09 नवीन
Setback for AAP in Gurgaon as office-bearers quit According to Ramesh Yadav, the Gurgaon AAP had around 400 members before the mass resignations happened on Sunday. (Reuters) The Aam Aadmi Party (AAP) suffered a massive blow on Sunday when scores of office-bearers led by a senior leader of its Gurgaon unit, Ramesh Yadav, resigned, protesting against its policies. Ten of them, including Yadav, publicly tendered their resignations to party president Arvind Kejriwal at the Ramlila Maidan in Gurgaon, where he concluded his roadshow on Sunday evening. Yadav, who was AAP’s Gurgaon convenor, said around 250 workers had resigned with him, including the Gurgaon unit’s general secretary and treasurer. “There has been unrest within the Gurgaon unit for the past four weeks regarding the kind of actions the party has taken. Look at Delhi. They have run from their responsibilities. They are giving tickets to candidates who don’t have a clean record. The decision-making in the party is no longer democratic and happens behind closed doors. They say something and do something else,” Yadav said. He added that he along with other party members had held discussions on these issues with the party’s Gurgaon candidate Yogendra Yadav and Kejriwal, but could not reach a solution. “Yogendra Yadav would say that it is not in his hands and that the party will decide. Kejriwal would listen to us, even accept that some things went wrong, but then do nothing,” Yadav said. According to him, the Gurgaon AAP had around 400 members before the mass resignations happened on Sunday. Sources said Yadav was peeved at the entry of so many new faces and felt that he was being sidelined. He was among the founder members of the party in Gurgaon. According to the sources, he wields considerable clout in certain pockets of Gurgaon and that his resignation would adversely impact AAP’s campaign in this region
  • Log in or register to post comments

नॉट सरप्राइझ्ड.

अर्धवटराव
Tue, 03/25/2014 - 10:42 नवीन
आआपला असे धक्के पचवावेच लागतील. नव्या-जुन्यांची नाराजी, विरोधि पक्षांकडुन फोडाफोडीचे प्रयत्न, हे सर्व आआपच्या वाट्याला देखील येईल. त्यांचं प्लॅस्टर बरच ओलं आहे सध्या. काँक्रीट बनायला थोडा वेळ लागेल... पार्टीला आणि नेत्यांना सुद्धा. जर यदाकदाचीत आआपची भुमीका केंद्रात सरकार बनवायला निर्णायक ठरणार असेल तर पक्ष उभा दुभंगायचे देखील चान्सेस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

रूसवे

चिरोटा
Tue, 03/25/2014 - 11:42 नवीन
निवडणूक आहे तेव्हा रूसवे,फुगवे चालायचेच.कॉन्ग्रेस्,भाजपा दोघेही अनेक 'अपवित्र' पुढार्‍यांना आपल्या पक्षात पावन करून घेत आहेत्. कार्यकर्त्यंना पैशाचे,सत्तेचे गाजर दाखवायचे व सत्ता मिळेस्तोवर दाणे टाकून कोंबड्यांसारखे झुंजत ठेवायचे.पक्षातल्या पहिल्या फळीतल्या नेतृत्वाला हे शिकावेच लागेल.
  • Log in or register to post comments

नायजेरिअन महिलांना अटक करावी

आत्मशून्य
Tue, 03/25/2014 - 14:16 नवीन
नायजेरिअन महिलांना अटक करावी म्हणून यांच्याच मंत्र्यांने अधिकाराच्या बाहेर जाऊन धाड टाकून पोलिसांना दमदाटी केली. येवढं करूनसुद्धा केजरीवाल याच मंत्र्याची पाठराखण करताहेत.
एक नागरीक म्हणुन कोणीही सामान्य व्यक्ती अशी विनंती पोलिसांना करु शकतो. व पोलीसांना ती मानणे कायद्याने भाग आहे. अधिकाराचे कोणतेही उल्लघन नाही, कर्तव्याची जाणीव करुन देणे दमदाटी कशी बुआ ? उगा वॉरंट/परवानग्या वगैरेमधे वेळ घालवला असता तोपर्यंत हप्तेखोरांकडुन फोनाफोनी होऊन धाडिच्या आधिच गुन्हेगारांनी सुंबाल्या ठोकल्या गेल्या असत्या, जे टाळणे आवश्यक होते.
  • Log in or register to post comments

* धाग्याची जाहीरात

माहितगार
Tue, 03/25/2014 - 14:46 नवीन
निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल
  • Log in or register to post comments

सनी लिऑन आम आदमी पार्टी तर्फे

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 14:46 नवीन
सनी लिऑन आम आदमी पार्टी तर्फे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशी अफवा आहे.
  • Log in or register to post comments

केजरी हा अत्यंत भंपक माणुस

Dhananjay Borgaonkar
Tue, 03/25/2014 - 15:04 नवीन
केजरी हा अत्यंत भंपक माणुस आहे.काँग्रेसने पोसलेलं पिल्लु.दिल्ली मधे माती खाल्ली. राजीनामा द्यायची गरजच काय होती याला? मिडीयासमोर कसे माकडचाळे करुन लोकांचं मनोरंजन करायचं हे पक्के ठाउक त्यास. भ्रष्टाचारा विरुद्ध लढायला निघालाय आणि काँग्रेसविरुद्ध काहीच बोलत नाही?? हा सगळ्यात मोठाठा जोक आहे. म्हणे शिला दिक्षितच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही कोर्टात जाउ तिच्या विरुध्द्द. नंतर सत्तेत आल्यावर विसरला हे सगळं. अत्यंत ढोंगी आणि खोटारडा माणुस. आण्णनी बरोबर ओळखला त्याला आणि बाहेर काढला.
  • Log in or register to post comments

Kejriwal's inconsistency

आयुर्हित
गुरुवार, 03/27/2014 - 10:33 नवीन
If Kejriwal and AAP have something to fear, it is Kejriwal's inconsistency. You started off fighting corruption. Then you fought Modi, then the media. Now, you guys are fighting the truth. You want instability over the next 5 years to prove your presence. Let your negativity not get the better of you. Instead utilize these 5 years to emerge as a responsible Opposition party. Refer:The bankruptcy of compulsive Modi bashing
  • Log in or register to post comments

प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा

होबासराव
Fri, 02/19/2016 - 15:01 नवीन
प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व हाण तेजायला :)
  • Log in or register to post comments

विडंबन

गॅरी ट्रुमन
Fri, 02/19/2016 - 15:06 नवीन
या धाग्याचे विडंबन म्हणून 'सनी लिऑनीबरोबर सहा मिनिटे' म्हणून कोणी धागा काढला होता तो मिळत नाही. तो उडविला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

हा हा हा!

नया है वह
Fri, 02/19/2016 - 15:09 नवीन
लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

अ‍ॅक्शन्स स्पीक लाउडर दॅन

वेल्लाभट
Fri, 02/19/2016 - 17:26 नवीन
अ‍ॅक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. अँड हिज अ‍ॅक्शन्स वर थरोली स्टूपिड.
  • Log in or register to post comments

स्वतःवर झालेल्या टिकेला

सचु कुळकर्णी
Fri, 04/28/2017 - 17:45 नवीन
स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व वर उल्लेखीत एक तरी वाक्य सत्यात उतरतांना पाहिलय का कोणि ? प्रांजळपणा, साहस, समतोल व्यक्तिमत्व, तर्कशुद्ध दृष्टीकोन, ब्ला ब्ला ब्ला हे आलय का अनुभवास.
  • Log in or register to post comments

कमालीची सुसंगत विचारसरणी

सचु कुळकर्णी
Fri, 04/28/2017 - 17:46 नवीन
Ohh Really
  • Log in or register to post comments

अरविंद केजरीवाल यांना अटक

वेडा बेडूक
Fri, 03/22/2024 - 13:13 नवीन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावून देखील त्याकडे दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराची ईडीच्या अधिकाऱ्यांनी २१ मार्चला रात्री झडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षाही जास्त काळ चौकशी करण्यात आली. आणि यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली.
  • Log in or register to post comments

किती ती भिती असावी एखाद्याची?

अमरेंद्र बाहुबली
Fri, 03/22/2024 - 14:12 नवीन
किती ती भिती असावी एखाद्याची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

हो ना....

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 18:11 नवीन
ह्या भीती पाईच, केजरीवाल यांनी, ED चे बोलावणे टाळले... ED, CBI आणि NIA, ह्यांच्या पाठीमागे, न्यायालय देखील उभे आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सुकेश ने जेल से केजरीवाल को लिखी चिट्ठी, 'Dear Brother वेलकम टू

मुक्त विहारि
Sat, 03/23/2024 - 18:16 नवीन
https://www.indiatv.in/india/national/sukesh-wrote-a-letter-to-cm-arvind-kejriwal-from-jail-know-what-he-wrote-in-letter-2024-03-23-1033220 -------
  • Log in or register to post comments

केजरीवाल की गिरफ्तारी-रिमांड पर हाईकोर्ट का अर्जेंट सुनवाई से इन

मुक्त विहारि
Sun, 03/24/2024 - 12:54 नवीन
केजरीवाल की गिरफ्तारी-रिमांड पर हाईकोर्ट का अर्जेंट सुनवाई से इनकार:कहा- बुधवार को मामला सुनेंगे; आतिशी का आरोप- हमारा दफ्तर सील किया गया https://www.bhaskar.com/national/news/delhi-cm-arvind-kejriwal-ed-arrest-live-update-aap-bjp-liquor-scam-132762244.html
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा