✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अरविंद बरोबर दीड तास!

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 03/20/2014 - 13:24  ·  लेख
लेख
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं. या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
80166 वाचन

💬 प्रतिसाद (219)

प्रतिक्रिया

१०० % सहमत. मीदेखील

संपत
Mon, 03/24/2014 - 10:59 नवीन
१०० % सहमत. मीदेखील पहिल्यांदाच सकारात्मक मतदान करणार आहे. माझ्या इथे आआपचा उमेदवार निवडून येईल ह्याची शक्यता फारच थोडी आहे. पण हारणे जिंकणे विषय वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयनीत

छान, आपल्याला शुभेच्छा.

नानासाहेब नेफळे
Mon, 03/24/2014 - 11:11 नवीन
छान, आपल्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

होय. संपूर्णपणे सहमत. चार

असंका
Mon, 03/24/2014 - 12:32 नवीन
होय. संपूर्णपणे सहमत. चार राज्यात एकदम सरकारं बदलली. पण बातम्या फक्त एकाच्याच. का? यावेळी मत देणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयनीत

हे हे हे

केदार-मिसळपाव
Sat, 03/22/2014 - 18:19 नवीन
मला वाटत कि असच प्रतिसाद सर्वांना हवा आहे. चर्चा वाचली. एकुणच लोकांना कोण्यातरी तारणहाराची गरज आहे असे दिसते. तोपर्यंत त्यांना प्रस्थापित राजकारणी चालतील असेही दिसते. अरविंद ने खरच चुक केली राजकारणात येउन. त्याला पैशाचा भ्र्श्टाचार संपवायचा होता. त्यासाठी तो प्रयसुद्धा करत होता. लोकांना सगळे कसे पटकन आणि व्यवस्थीत हवे आहे. बघुया या वेळी मतदानाला कोण जाते ते. मला वाटते कि अरविंद ने निवडणुकीनंतर राजकारणातुन बाहेर पडावे आणि स्वार्थ बघावा. देशासाठी मोदी गांधी ठाकरे आहेतच.
  • Log in or register to post comments

अरे वा

विकास
Sun, 03/23/2014 - 18:44 नवीन
केजरीवालांच्या दिड तास बोलण्यावर एक दिड मिनिटाच्या चित्रफितीने पाणी पडले म्हणल्यावर गाडी परत मोदी आणि गुजरात दंगलीकडे वळली वाटतं. तसे काही अनपेक्षित नाही. या पुढे अशा धाग्यांच्या संदर्भात, "धाग्याचा मोदी झाला" असे म्हणायला हरकत नाही!
  • Log in or register to post comments

मला खालील दोन लिंक्स मिळाल्या ; एक मोदी आणी एक अरविंद साहेबांची

खबो जाप
Mon, 03/24/2014 - 10:11 नवीन
मला खालील दोन लिंक्स मिळाल्या ; एक मोदी आणी एक अरविंद साहेबांची मोदी https://www.facebook.com/photo.php?v=10201415435098984 अरविंद केजरीवाल https://www.facebook.com/photo.php?v=10151998667933531 कुठे पाकिस्तान ला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला पाहिजे म्हणणारे मोदी आणि कुठे दिल्ली ऎलेक्शन झाल्यावर बाकीचे बोलू म्हणणारे अरविंद केजरीवाल साहेब.
  • Log in or register to post comments

???

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/24/2014 - 10:38 नवीन
इतरांना "नेमका प्रश्न विचारला तर एक मिनीट अस्वस्थ झाले" असे म्हणणार्‍यांनी "देशाच्या सुरक्षेबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या संबद्धी (ज्या बाबतीत प्रत्येक राजकारण्याला स्पष्ट मत असणे आवश्यक आहे)" केजरीवालांचे वर्तन आणि पलायन नक्की बघावे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

अजून एक...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/24/2014 - 10:24 नवीन
  • Log in or register to post comments

असंच टिपी - सौजन्य http://my

सुहास झेले
Mon, 03/24/2014 - 12:15 नवीन
असंच टिपी - सौजन्य http://my.fakingnews.firstpost.com/2014/03/24/narendra-modi-does-a-van-damme-split-kejriwal-does-too/
  • Log in or register to post comments

माझी पोझिशन क्लिअर करुन चर्चा संपन्न करतो

संजय क्षीरसागर
Mon, 03/24/2014 - 13:33 नवीन
पोस्ट संबंधात तीन मुख्य आक्षेप घेतले गेले: एक, माझ्या निष्कर्षाला पुरावा नाही, दोन, मोदींविरुद्ध अपराध सिद्ध झालेला नाही, आणि तीन, मदत वास्तविकात रोखली गेली का? मोदींच्या भाषणातला उधृत केलेला भाग हाच पुरावा आहे. "हवेत कशाला रिलीफ कँप्स ? मी काय तिथे मुलं जन्माला घालायची केंद्र उघडू? आम्हाला कुटुंबनियोजनाच्या धोरणानं विकास साधायचा आहे. आम्ही पाच आणि आमचे पंचवीस! गुजराथ कुटुंबनियोजन राबवू शकत नाही का? कुणाच्या धारणा आमच्या मार्गातला अडथळा आहेत? कोणता धर्मपंथ मार्गातला अडथळा आहे?" ("What brother, should we run relief camps? Should I start children-producing centres there? We want to achieve progress by pursuing the policy of family planning with determination. Ame paanch, Amara pachhees! (we are five and we have twenty-five) … Can't Gujarat implement family planning? Whose inhibitions are coming in our way? Which religious sect is coming in the way? ...") या मानसिकतेचा अर्थ जर पुरेसा बोलका नसेल आणि आरोपच सिद्ध होण्याची वाट पाहायची असेल तर पुढच्या निवडणूकांशिवाय ती वेळ येणार नाही. मदत वास्तविकात रोखली गेली का ती नाईलाजानं करावी लागली हे ठरवणं अवघड आहे. (कारण कालच मी त्यावेळचा विडिओ पाहिला. बाजपेयी स्वतः तिथे गेले होते आणि व्यासपिठावरनं म्हणाले `राजाने राजधर्म का पालन करना चाहीए. बस राजधर्म शब्द काफी है' पण इतक्या सौम्य शब्दात संदेश जाईल की नाही याविषयी साशंक झाल्यावर ते म्हणाले `किसीभी व्यक्ती की जात या जन्म बिना देखे मदद होनी चाहिए'. मग मागनं मोदी त्यांना हलक्या आवजात म्हणतायंत `वही तो हो रहा है साहाब'. मजा म्हणजे हा मोदींचा ऑफिशियल विडिओ आहे. बाजपेयींना व्यासपीठावरनं मोदींना सांगायची वेळ यावी यातच सगळं आलं)
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर बोल्ले. ते बरोबर

मंदार दिलीप जोशी
Mon, 03/24/2014 - 14:13 नवीन
अगदी बरोबर बोल्ले. ते बरोबर तुम्ही चूक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एक राहिलच...

अर्धवटराव
Mon, 03/24/2014 - 18:04 नवीन
मूळ चर्चेच्या अनुषंगाने, सग्ळे व्हिडीओ वगैरे बघितल्यावर, काहि सदस्यांना केजरीवालांची नियत आणि क्षमता सकारण संदिग्ध वाटते... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>> पोस्ट संबंधात तीन मुख्य

श्रीगुरुजी
Mon, 03/24/2014 - 21:09 नवीन
>>> पोस्ट संबंधात तीन मुख्य आक्षेप घेतले गेले: एक, माझ्या निष्कर्षाला पुरावा नाही, अजूनपर्यंत तुम्ही पुरावा दिलेला नाही. मोदींच्या कोणत्यातरी भाषणातील १-२ वाक्ये याला तुम्ही "आप"वाले पुरावा म्हणत असतील. परंतु तुमच्या दुर्दैवाने कोणतेही न्यायालय किंवा जग याला पुरावा मानत नाही. अजून एकदा संधी देतो. तुम्ही मोदींविरूद्ध जे आरोप करत आहात ते सिद्ध करणारे पुरावे द्या. नाहीतर स्वतःची चूक कबूल करून आरोप मागे घ्या. >>> दोन, मोदींविरुद्ध अपराध सिद्ध झालेला नाही, बरोबर आहे. युपीए सरकारने सीबीआय, एसआयटी, एनआयए, आयबी, असंख्य एनजीओ, अनेक स्टिंग ऑपरेशन्स इ. च्या माध्यमातून जंग जंग पछाडून मोदींविरूद्ध साधा एफआयआर सुद्धा दाखल करता आलेला नाही. आरोप सिद्ध होणं तर लांबच राहिलं. खटला सुद्धा दाखल करता आलेला नाही. >>> आणि तीन, मदत वास्तविकात रोखली गेली का? मदत रोखली गेलेलीच नव्हती. रिलीफ कॅम्प्ससुद्धा बंद केलेले नव्हते. याचे पुरावे मी वर दिलेले आहेत. युपीए सरकारमधल्या एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत याची लेखी कबुली दिलेली आहे. >>> मोदींच्या भाषणातला उधृत केलेला भाग हाच पुरावा आहे. पुन्हा तेच. भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो. प्रत्यक्षात झालेल्या घटना हाच पुरावा असतो. दंगलग्रस्तांची मदत रोखली गेलेलीच नव्हती. रिलीफ कॅम्प्ससुद्धा बंद केलेले नव्हते. याचे पुरावे मी वर दिलेले आहेत. युपीए सरकारमधल्या एका वरिष्ठ मंत्र्याने संसदेत याची लेखी कबुली दिलेली आहे. जर भाषणातील १-२ वाक्ये हा पुरावा असेल तर युपीए सरकारमधील मंत्र्याने संसदेत लेखी खोटी कबुली दिली असा अर्थ होतो. जर १ रिलीफ कॅम्प देखील बंद झाला असता, तर टिस्टा सेटलवाड्/कुलदीप नायर्/महेश भट्ट/अरूंधती रॉय इ. निधर्मांधांच्या बरोबरीने सर्व विरोधी पक्षांनी थयथयाट केला असता. दुर्दैवाने हे तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्ही मुद्दाम वेड पांघरले आहे हे उघड आहे. पुन्हा एकदा विचारतो. मोदींनी रिलीफ कॅम्प्स बंद केले होते किंवा कॅम्प्सची मदत थांबविली होती हे सिद्ध करणारे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? किंवा दुसर्‍या शब्दात, युपीए सरकारच्या वरिष्ठ मंत्र्याने संसदेत खोटी माहिती दिली हे तुम्ही सिद्ध करु शकता का? >>> या मानसिकतेचा अर्थ जर पुरेसा बोलका नसेल आणि आरोपच सिद्ध होण्याची वाट पाहायची असेल तर पुढच्या निवडणूकांशिवाय ती वेळ येणार नाही. १२ वर्षे जंग जंग पछाडले तरी आरोप सिद्ध करता आलेले नाहीत. पुढच्या निवडणुकीपर्यंत अजून काय वेगळे होणार आहे? >>> मदत वास्तविकात रोखली गेली का ती नाईलाजानं करावी लागली हे ठरवणं अवघड आहे. जर हे ठरविणे अवघड असेल तर मदत रोखली गेली होती आणि कॅम्प्स बंद केले होते हे कशाला छातीठोकपणे आणि ठामपणे सांगत आहेत आणि ते देखील कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय? अजून किती दिवस खोटे बोलणार आहात? >>> (कारण कालच मी त्यावेळचा विडिओ पाहिला. बाजपेयी स्वतः तिथे गेले होते आणि व्यासपिठावरनं म्हणाले `राजाने राजधर्म का पालन करना चाहीए. बस राजधर्म शब्द काफी है' पण इतक्या सौम्य शब्दात संदेश जाईल की नाही याविषयी साशंक झाल्यावर ते म्हणाले `किसीभी व्यक्ती की जात या जन्म बिना देखे मदद होनी चाहिए'. मग मागनं मोदी त्यांना हलक्या आवजात म्हणतायंत `वही तो हो रहा है साहाब'. मजा म्हणजे हा मोदींचा ऑफिशियल विडिओ आहे. बाजपेयींना व्यासपीठावरनं मोदींना सांगायची वेळ यावी यातच सगळं आलं) तुम्ही पुन्हा खोटं बोललात. अर्धवट माहिती दिलीत. वाजपेयींची शेवटची वाक्ये सांगितलीच नाहीत. हा पहा तो व्हिडिओ. http://www.ibtl.in/video/6293/atal-ji-actually-said-narendrabhai-is-following-his-rajdharma/ _______________________________________________________________________________ यात वाजपेयींना वार्ताहर पश्न विचारते की, "मुख्यमंत्र्यांसाठी तुमचा काही संदेश आहे का?" यावर वाजपेयी असे उत्तर देतात, "मुख्यमंत्र्यांसाठी माझा एकच संदेश आहे की त्यांनी राजधर्माचे पालन करावे. राजधर्म ... हा शब्द खूपच सार्थ आहे. मी त्याचेच पालन करत आहे. तेच करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. शासकासाठी प्रजेमध्ये भेदाभेद होऊ शकत नाही. ना धर्माच्या आधारावर ना जातीच्या आधारावर ना पंथाच्या आधारावर. " यावर मोदी,"मी तेच करत आहे" असे उत्तर देतात. यावर वाजपेयी पुढे सांगतात की "माझी खात्री आहे की नरेंद्रभाई हेच (राजधर्माचे पालन) करत आहेत. धन्यवाद!" For years on end, sections that dominate the media and intellectual discourse have harped on the misinformation that former Prime Minister Atal Bihari Vajpayee asked Narendra Modi to “follow his Rajdharma”. See this video and hear yourself what Vajpayee ji said- apart from stating that every leader should follow his Rajdharma, he said that he is confident that Narendrabhai is following his Rajdharma! _______________________________________________________________________________ संक्षी, कधीतरी खोटे बोलणे थांबवा. आणि जर आरोप करायचे असतील तर त्यासाठी सबळ पुरावे द्या. एकंदरीत केजरीवाल व इतर आप समर्थकांना बिनबुडाचे आरोप करण्याचे व्यसन लागले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्वतःची चूक कबूल करून

लंबूटांग
Mon, 03/24/2014 - 21:30 नवीन
स्वतःची चूक कबूल करून
गुड लक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भाषणातल्या १-२ ओळी हा पुरावा नसतो?

संजय क्षीरसागर
Mon, 03/24/2014 - 22:37 नवीन
भाषणातून मानसिकता कळते. ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पुरेशी बोलकी आहे.
वाजपेयींची शेवटची वाक्ये सांगितलीच नाहीत....यावर वाजपेयी पुढे सांगतात की "माझी खात्री आहे की नरेंद्रभाई हेच (राजधर्माचे पालन) करत आहेत. धन्यवाद!
तुम्ही फार सारवासारवी चालवली आहे. वाजपेयींना भर व्यासपीठावर `राजधर्माचे पालन करा, जातीभेद करु नका असे सांगावे लागते याचा अर्थच तो होत होता. आणि त्याच व्यासपीठावर मोदींना त्याचं (हलक्या आवाजात) स्पष्टीकरण द्यावं लागतं `वही तो कर रहे है ना साहाब'. हे परिस्थितीची कल्पना देण्यास पुरेसं आहे. जर भेदभाव होत नसता तर वाजपेयींना तसं (आणि खरं तर इतकं स्पष्ट) बोलायची गरजच काय? आता मोदींच्या स्पष्टीकरणावर वाजपेयींना त्यांची बाजू सावरावीच लागणार. कारण दोघंही राजकीय नेते आहेत आणि जनसमुदायासमोर बोलतायंत. पण तुम्हाला वाटतंय वाजपेयींनी मोदींची पाठ थोपटली! तुम्ही दरवेळी पुरावे द्या आणि आरोप मागे घ्या हा घोषा लावला आहे. जर उघड पुरावे असते तर मोदींची कारकिर्द केंव्हाच संपली असती आणि त्यांच्या मानसिकतेचा उहापोह झालाच नसता. मी माझा आरोप मागे घेणार नाही कारण मोदींच्या प्रत्येक भाषणात निव्वळ भावनांना हात घालणे हा एकच अजेंडा दिसतो. वाराणसीच्या सभेत तर ते सरळ म्हणाले `भाई, रामराज्य तो लाना ही होगा'. आता त्यांना साळसूद समजणारे म्हणणार `बांधलंय का मंदिर अजून?' दाखवा पुरावा! आणि माझं म्हणणंय की हेतू उघड दिसतोयं, कशाला (पुन्हा) विषाची परिक्षा घ्यायची? या उलट केजरीवाल इश्यू बेस्ड आहेत : भ्रष्टाचार मुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! दॅट इज ऑल. मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की जेंव्हा पुरावे समोर येतील तेंव्हा अपरिमीत नुकसान झालेलं असेल आणि वेळ निघून गेलेली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मी माघार घेणार नाही...

गब्रिएल
Tue, 03/25/2014 - 10:53 नवीन
मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ... पुरावे मागत्यात ल्येकाचे. आतापत्तूर आम्चा म्हादेव अरविंदानं पन दिलेका कदी पुरावे? आम्च काम नुस्ते आरोप करायचे. बास. आमी म्हनलं कि कोंब्डा अंडि घाल्तो, तर घाल्तोच. आमी म्हनलं की रेडा धा मन दूद देतो, तर देतोच ! आमी म्हनलं की मन ह्ये मन नसत तर नसतच... पुरावे माग्तात लेकाचे ! आमि परत्यक्ष हे... काय... ते हेच... हाओत न्हाय का? मंग? पुरावे माग्तात लेकाचे ! आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमि ते हे हाओत बर्का? कळ्त न्हायका? सांगून ठिव्तो. पुरावे माग्तात लेकाचे ! आनि हो >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D ... (कोन हाय्रे तिक्डे? झाला ना हज्जारचा रतीब ? आता तरी पटंल या अदानी जन्तेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लंबर येक!

वामन देशमुख
Tue, 03/25/2014 - 10:55 नवीन
...आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही.
काय बोललात संजयराव! लंबर येक! आआपची हीच तर मानसिकता/ कार्यशैली आहे, "आम्ही आरोप करणार पण तुम्ही पुरावे मागायचे नाही, नाहीतर आम्ही आरोप करणे थांबवू!" श्रीगुरुजी, अर्धवटराव, इस्पीकचा एक्का, विकास आणि इतरांचे माहितीपूर्ण प्रतिसाद दिल्याबद्धल आभार. नानासाहेब नेफळे, तुम्हाला दिग्विजयसिंघ म्हणावं कि सलमान खुर्शीद कि जितेंद्र आव्हाड कि...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कमाल आहे!

संजय क्षीरसागर
Tue, 03/25/2014 - 12:05 नवीन
माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो. जातीवाचकता उघडपणे आणता येत नाही. तो छुपा अजेंडा असावा लागतो. त्यामुळे मला पुरावा देता येत नाही याचा अर्थ `राममंदिराचं बांधकाम झालं नाही म्हणजे पुरावा नाही' असा काढणं आहे. आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कलमाडी तुरुंगातून आलेत, भ्रष्टाचार झालेला उघड दिसतोयं पण त्यांचे निर्बुद्ध समर्थक विचारतायंत ` अजून झालायं का आरोप सिद्ध? मग द्यानं त्यांना तिकीट!' एकूण काँग्रेस आणि बिजेपीत काही फरक दिसत नाही. त्यांना पैश्याचा लोभ आणि यांना रामाचा! त्यामुळे भ्रष्टाचार आणि जातीवादाच्या विळख्यातून देशाची सुटका दुष्पूर आहे. `इश्यू बेस्ड' आणि निर्वैयक्तिक राजकारण लोकांना कळेल तो सुदीन. आता फक्त हर हर महादेवचा अर्थ `या आमच्या घरी जेवायला' असा काढला की झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हे काय?

वेताळ
Tue, 03/25/2014 - 12:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझा एकच स्टँड आहे

पिशी अबोली
Tue, 03/25/2014 - 12:13 नवीन
माझा एकच स्टँड आहे
संतुलित विचार करा... एकच एक स्टँड घेऊन काय बसता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एकच एक स्टँड घेऊन काय बसता?

संजय क्षीरसागर
Tue, 03/25/2014 - 12:22 नवीन
आहो, तो एक स्टँड समजला की सगळं संतुलन आहे! देश निधर्मी होईल, सगळे एक होतील. राज्यकर्ते जातीवादावर जनतेत दुफळी माजवू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

म्हणजे तराजूत एका बाजूला

पिशी अबोली
Tue, 03/25/2014 - 12:26 नवीन
म्हणजे तराजूत एका बाजूला ऑलरेडी एक किलो वजन टाकायचं.. आणि म्हणायचं हा एक स्टँड समजा, पुढे सगळं संतुलन आहे... अजब आहे बुवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

म्हणजे तराजूत एका बाजूला ऑलरेडी एक किलो वजन टाकायचं?

संजय क्षीरसागर
Tue, 03/25/2014 - 13:28 नवीन
आहो ऑलरेडी दोन्ही बाजूला भरपूर वजनं झालीयेत आणि जनता प्रलोभनांना खुळावलीये. एका बाजूला काँग्रेसचा अल्पसंख्यांकवाद आणि दुसर्‍या बाजूला बिजेपीचा हिंदूवाद. मी तराजू रिकामा करा सांगतोयं म्हणजे संतुलन येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

>>> मी तराजू रिकामा करा

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2014 - 13:31 नवीन
>>> मी तराजू रिकामा करा सांगतोयं म्हणजे संतुलन येईल. तराजू रिकामा करून एका तागड्यात केजरीवालांची खोटी आश्वासने व दुसर्‍या तागड्यात केजरीवालांचे खोटे आरोप टाका. आपोआप संतुलन येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आहो, तो एक स्टँड समजला की

गब्रिएल
Tue, 03/25/2014 - 12:51 नवीन
आहो, तो एक स्टँड समजला की सगळं संतुलन आहे! हां हां, संजय स्सार, यु आर रैट्ट. तुसी ग्रेट हो. हामासबी आशिच म्हन्तिया बगा की, पय्लं ह्ये मान्य करा कि इज्राइल नकाशा वरून ग्येला पायजे, बास. आनि चला आता चर्चेला सुर्वात करूया. पन काय्बि आसो. तुम्चा धागा लईच घोड्दौड करु लाग्लाय बर्का. टाका आजून दोनचार अडेलतट्टू काड्या कि तिन शतकं न्क्की. ह्ये ज्यास्त बरं हाय बर्का. काय्की त्ये मन बीन चे तुम्चे घाग्यास्नि कोन्बी फार चारा टाकत न्हवत ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझा एकच स्टँड आहे की मोदी

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 13:17 नवीन
माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो.>> जातीयवादी की धर्मवादी? आणि धर्मवादी असण्यात काहीच गैर नाही. तुम्ही बहुतेक वाळवंटी पुस्तक वाचलेले दिसत नाही :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अरे थोडं चुकलंच

संजय क्षीरसागर
Tue, 03/25/2014 - 12:18 नवीन
`हर हर मोदी' असा नारा होता नाही का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हर हर च्या जागी 'हार हार 'असे

नानासाहेब नेफळे
Tue, 03/25/2014 - 12:23 नवीन
हर हर च्या जागी 'हार हार 'असे करुन टाका ,कारण केजरीवाल आता वाराणसीत दाखल झालेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हरायलाच दाखल झालेत

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 13:17 नवीन
हरायलाच दाखल झालेत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

..@.. संक्षी....!!!!

विनोद१८
Tue, 03/25/2014 - 23:46 नवीन
माझा एकच स्टँड आहे की मोदी जातीवादी आहेत आणि जातीवाद खुनशी असतो.
हे तुमचे त्रैराशिक जरा सविस्तर विशद करा, तुम्ही किवा तुमच्यासारखे लोक म्हणतात म्हणुन आम्ही त्यावर विश्वास ठेवावा काय ?? मोदी काय फक्त तुम्हालाच समजला, त्याला समजुन घेण्याचा जन्मसिद्ध मक्ता फक्त तुमच्याकडेच आहे का ??? तुमच्याशिवाय इतर सगळे मूढ आहेत असा तुमचा दावा आहे का ??? तुमचा वरील स्टँड सप्रमाण सिद्ध करण्याची कुवत तुम्ही बाळ्गता काय ??? बाळ्गत असाल तर करा सिद्ध आणि टाका त्याला आत. अख्खा भारत तुम्हाला 'सवाई केजरिवाल' अशी पदवी हे मी खात्रीने सान्गू शकतो.
`इश्यू बेस्ड' आणि निर्वैयक्तिक राजकारण लोकांना कळेल तो सुदीन.
याचा अर्थच असा की अशी परिस्थीती आज आपल्या देशातील राजकारणात नाही, याला जबाबदार या देशाचा गाडा गेली ६० वर्षे हाकणारे नाहीत का, की ती जबाब्दारी एकट्या मोदीचीच ??
आता फक्त हर हर महादेवचा अर्थ `या आमच्या घरी जेवायला' असा काढला की झालं!
याच अपेक्षेने गोरगरीब जनता त्याच्याकडे (मोदी) पहात आहे, असेच तुम्हाला सुचवायचे आहे ना ?? विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>> नानासाहेब नेफळे,

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2014 - 13:07 नवीन
>>> नानासाहेब नेफळे, तुम्हाला दिग्विजयसिंघ म्हणावं कि सलमान खुर्शीद कि जितेंद्र आव्हाड कि... अजून किती नावे देणार? त्यांचे यापूर्वीच 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर' इ. डुप्लिकेट आयडी होते. आता ते "नाने" हा नवीन आयडी घेऊन आले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

>>> भाषणातून मानसिकता कळते.

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2014 - 13:04 नवीन
>>> भाषणातून मानसिकता कळते. ज्या प्रकारची भाषा वापरली आहे ती पुरेशी बोलकी आहे. भाषेपेक्षा कृतीतूनच मानसिकता कळते. ज्या प्रकारची कृती केली गेली आहे ती पुरेशी बोलकी असते. 'काँग्रेसचा किंवा भाजपचा पाठिंबा घेणार नाही' अशी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेणारा पराकोटीचा तत्वनिष्ठ मानला जाईल. पण प्रत्यक्षात काँग्रेसचा पाठिंबा घेणारा हा संधीसाधू व खोटारडा आहे हे सिद्ध होते. >>> तुम्ही फार सारवासारवी चालवली आहे. वाजपेयींना भर व्यासपीठावर `राजधर्माचे पालन करा, जातीभेद करु नका असे सांगावे लागते याचा अर्थच तो होत होता. आणि त्याच व्यासपीठावर मोदींना त्याचं (हलक्या आवाजात) स्पष्टीकरण द्यावं लागतं `वही तो कर रहे है ना साहाब'. हे परिस्थितीची कल्पना देण्यास पुरेसं आहे. जर भेदभाव होत नसता तर वाजपेयींना तसं (आणि खरं तर इतकं स्पष्ट) बोलायची गरजच काय? जर भेदभाव होत होता, तर वाजपेयींनी "मोदी राजधर्माचे पालन करीत आहेत" असे बोलण्याची गरजच काय? >>> आता मोदींच्या स्पष्टीकरणावर वाजपेयींना त्यांची बाजू सावरावीच लागणार. कारण दोघंही राजकीय नेते आहेत आणि जनसमुदायासमोर बोलतायंत. पण तुम्हाला वाटतंय वाजपेयींनी मोदींची पाठ थोपटली! तुम्ही व्हिडिओबद्दल लिहिताना अर्धाच भाग लिहिलात. पुढचा अर्धा लिहिलाच नाहीत. यावरूनच तुमची मानसिकता स्पष्ट होते. समजा वाजपेयी आणि मोदी एकाच पक्षाचे म्हणून वाजपेयी त्यांची बाजू सावरत होते असं क्षणभर गृहीत धरलं तरी मोदींच्या विरूद्ध पक्षाच्या काँग्रेसने त्यांची बाजू घ्यायचं काय कारण होतं? उलट भेदभावाचे एक शुल्लक उदाहरण जरी सापडलं असतं तरी टिस्टा/महेश्/अरूंधती इं. च्या बरोबरीने काँग्रेसने रान उठविलं असतं. प्रत्यक्षात काँग्रेसला रिलीफ कॅम्प्सचं कौतुक करावं लागलंय यातच सर्व काही आलं. >>> तुम्ही दरवेळी पुरावे द्या आणि आरोप मागे घ्या हा घोषा लावला आहे. जर उघड पुरावे असते तर मोदींची कारकिर्द केंव्हाच संपली असती आणि त्यांच्या मानसिकतेचा उहापोह झालाच नसता. इतके गंभीर आरोप पुराव्याशिवाय करणे अयोग्य आहे हेच तुम्हाला समजत नाही. >>> मी माझा आरोप मागे घेणार नाही कारण मोदींच्या प्रत्येक भाषणात निव्वळ भावनांना हात घालणे हा एकच अजेंडा दिसतो. शेवटी काही झालं तरी तुम्ही केजरीवालसारख्या भोंदूचे समर्थक. पुराव्याशिवाय खोटे आरोप करणे, वाटेल ती आश्वासने देणे आणि कृती करायची वेळ आली की शेपूट घालून सुंबाल्या करणे हे 'आप'वाल्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. >>> वाराणसीच्या सभेत तर ते सरळ म्हणाले `भाई, रामराज्य तो लाना ही होगा'. आता त्यांना साळसूद समजणारे म्हणणार `बांधलंय का मंदिर अजून?' दाखवा पुरावा! आणि माझं म्हणणंय की हेतू उघड दिसतोयं, कशाला (पुन्हा) विषाची परिक्षा घ्यायची? भारतात 'रामराज्य' यावे अशी गांधीजी सुद्धा म्हणत असत. >>> या उलट केजरीवाल इश्यू बेस्ड आहेत : भ्रष्टाचार मुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! दॅट इज ऑल. कसलं डोंबलांचं भ्रष्टाचारमुक्त राजकारण आणि विनम्र प्रशासन! सगळं ढोंग आणि लबाडी. ज्या रिलायन्सला जाहीर शिव्या घालतात त्याच रिलायन्सला सबसिडी दिली. नायजेरिअन महिलांना अटक करावी म्हणून यांच्याच मंत्र्यांने अधिकाराच्या बाहेर जाऊन धाड टाकून पोलिसांना दमदाटी केली. येवढं करूनसुद्धा केजरीवाल याच मंत्र्याची पाठराखण करताहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून गुजरातमध्ये पोलिसांनी अडविल्यावर यांच्याच कार्यकर्त्यांनी दिल्लीत आणि लखनौमध्ये भाजपच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक करून धुमाकूळ घातला. अंदाजपत्रकात तरतूद न करताच विजेची बिले निम्मे करण्याचे ढोंग करून जनतेची फसवणूक केली. काँग्रेसला प्रचंड शिव्या घालून शेवटी काँग्रेसचाच पाठिंबा घेतला. >>> मी माघार घेणार नाही आणि तुम्ही पुरावे मागत राहणार त्यामुळे तुमच्याशी चर्चा होऊ शकत नाही. पण एक नक्की जेंव्हा पुरावे समोर येतील तेंव्हा अपरिमीत नुकसान झालेलं असेल आणि वेळ निघून गेलेली असेल. 'पडलो तरी नाक वर' अशी तुमची मानसिकता आहे. तुम्हाला मी पूर्ण उघडे पाडलेले आहे. तुम्ही केलेले आरोप पूर्ण खोटे आहेत हे सिद्ध झालेले आहे. खोटे आरोप करणार्‍याने आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे द्यावे लागतात. तुमच्याकडे कणभरही पुरावे नाहीत आणि तरीसुद्धा खोटे आरोप मागे घ्यायची तयारी नाही. अर्थात तुमचं वागणं तुमच्या केजरीवालांच्या वागण्याशी सुसंगतच आहे. ढोंग, नाटकीपणा, खोटारडेपणा, पळपुटेपणा, फसवणूक ... याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही 'आप'कडून वा केजरीवालांकडून अपेक्षित नाही. असो. तुम्ही केलेल्या खोट्या आरोपांच्या निमित्ताने 'दूध का दूध, पानी का पानी' हे सिद्ध करण्याची संधी मिळाली याबद्दल आभार! निदान भविष्यात तरी पुरेशी पूर्वतयारी करून मगच खोटे आरोप करा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अशं नै कलायचं बाबा...

प्यारे१
Tue, 03/25/2014 - 13:15 नवीन
अशं नै कलायचं बाबा... आमी वेगला धागा काल्लेला ना? मग? आम्ची बॅत हाये. आमीच जिंकनाल. तुमी नुस्ते फुल्तॉस ताकाचे. मग आमी शिक्श माल्नाल. पलत खेला पलत. ;) - आपण हसे लोकाला .... आपल्या नाकाला. असो. गुरुजी, आज ओपनचा रेट किती सुरु आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दंडवत

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 13:21 नवीन
श्रीगुरुजी, माझा दंडवत स्वीकारा. इतक्या "आप"मतलबी, हेकेखोर, बिनडोक युक्तीवादाचा अगदी मुद्देसूदपणे आणि मुख्य म्हणजे प्रचंड चिकाटीने थोबाडफोड उत्तर द्यायला खूप प्रामाणिकता आणि जिगर लागते. शिवाय तल्लख बुद्धी देखील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

गुरुजी, बाकी जाऊं द्या

संजय क्षीरसागर
Tue, 03/25/2014 - 13:23 नवीन
भारतात 'रामराज्य' यावे अशी गांधीजी सुद्धा म्हणत असत.
लै खास! याला म्हणतात जस्टीफिकेशन. तर एकूण तुमच्या मते मोदी साळसूद आहेत आणि केजरीवाल चालू आहेत. कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

म्हणजे नरेन्द्र मोदी हे

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 13:24 नवीन
म्हणजे नरेन्द्र मोदी हे गांधीवादी आहेत नैका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>> तर एकूण तुमच्या मते मोदी

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2014 - 13:28 नवीन
>>> तर एकूण तुमच्या मते मोदी साळसूद आहेत आणि केजरीवाल चालू आहेत. कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!! पुन्हा एकदा तुम्ही खोटं बोलतात. माझ्या मते मोदी साळसूद नाहीत. ते कमालीचे स्वच्छ, प्रामाणिक व अत्यंत कार्यक्षम आहेत. तसेच माझ्या मते केजरीवाल नुसतेच चालू नाहीत, तर ते ढोंगी, खोटारडे व पळपुटे आहेत. >>> कारण आता मोदी गांधीचीच अभिलाषा पूर्ण करतायंत म्हटल्यावर काय बोलणार? कहर झाला! धन्यवाद!! स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा अशी गांधीजींची इच्छा होती. या निवडणुकीत मोदी गांधीजींचीच अभिलाषा पूर्ण करत आहेत. तुमच्यापाशी खोट्या आरोपांशिवाय बोलण्यासारखं काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

किती कोलांट्या मारणार गुरुजी?

संजय क्षीरसागर
Tue, 03/25/2014 - 14:05 नवीन
आधी मोदींना जस्टीफाय करायला म्हणालात :
भारतात 'रामराज्य' यावे अशी गांधीजी सुद्धा म्हणत असत.
मग रामराज्याचा गांधींना अपेक्षित अर्थ आणि मोदींचा अर्थ ही विरुद्ध टोकं आहेत हे लक्षात आल्यावर आता म्हणतायं :
स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा अशी गांधीजींची इच्छा होती. या निवडणुकीत मोदी गांधीजींचीच अभिलाषा पूर्ण करत आहेत.
मला न मोदींचा कळवळा ना आडवानींचा पण आडवानींना स्वतःचे गुरु आणि देशाच्या पंतप्रधानपदाचे एकमात्र लायक उमेदवार मानणारे मोदी डायरेक्ट गुरुंनाच बरखास्त करु शकतात याची कल्पना या यू टर्न वरुन येईल : सत्तालोभापायी ते केंव्हाही आणि काहीही बरखास्त करु शकतात हे नक्की. आता कोण ढोंगी आहे ते पाहा म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्या देशात ८०% लोकांना

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 14:08 नवीन
ज्या देशात ८०% लोकांना उरलेल्या २०% च्या भीती बाळगून रहावे लागते तिथे असेच बोलावे लागते. जय मोदी जय मोदी जय मोदी जय मोदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ज्या देशात ८०% लोकांना

संपत
Tue, 03/25/2014 - 14:14 नवीन
ज्या देशात ८०% लोकांना उरलेल्या २०% च्या भीती बाळगून रहावे लागते तिथे असेच बोलावे लागते
म्हणजे मोदी हे घाबरून बोलत आहेत का ? कोणाला घाबरत आहेत ते? आणि जर ते घाबरून बोलत असतील तर विडिओमधले 'मै किसीसे नाही डरता' उगीचच काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

मोदी नव्हे तर लोक घाबरतात असा

मंदार दिलीप जोशी
Tue, 03/25/2014 - 14:28 नवीन
मोदी नव्हे तर लोक घाबरतात असा त्याचा अर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

असे काही नाही ,असा भ्रम

नानासाहेब नेफळे
Tue, 03/25/2014 - 14:15 नवीन
असे काही नाही ,असा भ्रम मुस्लिमांविषयी पसरवला गेला आहे. राममंदीराच्या मुद्द्यावरुन भांडणं लावणार्यांच्या जाहारनाम्यातही 'राम मंदीर' नाही यावरुन काय तो बोध घ्यावा. विस वर्षांपुर्वी मंदिराचा वापर सत्ताकारणासाठी करणारे आता 'देवालय से पहले शौचालय चाहीए' असे म्हणत ,हिंदू धर्माचा अपमान करत, आपल्या दूट्प्पी नितीचे दाखले देत आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार दिलीप जोशी

हे पहा मोदींचे विचार.http://m

नानासाहेब नेफळे
Tue, 03/25/2014 - 14:18 नवीन
हे पहा मोदींचे विचार.http://m.timesofindia.com/india/Build-toilets-first-and-temples-later-Narendra-Modi-says/articleshow/23422631.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

खिक्क! हे पेपरवाले म्हणजे नग आहेत...

आत्मशून्य
Tue, 03/25/2014 - 14:21 नवीन
"I am known to be a Hindutva leader. My image does not permit to say so, but I dare to say. My real thought is — Pehle shauchalaya, phir devalaya' (temple first, toilet later)," he said.
कठिन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

ठ्ठो

बॅटमॅन
Tue, 03/25/2014 - 14:25 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

मी गुजरात मधील अहमदाबादच्या

मराठी कथालेखक
Mon, 03/24/2014 - 18:02 नवीन
मी गुजरात मधील अहमदाबादच्या BRT bus बद्दल्चा एक विडिओ (whats app वर) पाहिला. त्यात शेवटी सुप्रिया सुळेंनी या प्रकल्पाचे कौतुक केलेले होते... मला वाटते जे चांगले आहे ते कबूल करण्याची प्रगल्भता असावी AK ला खोकणे आणि गळा काढणे यातच जास्त रस आहे..
  • Log in or register to post comments

काय ठरलं शेवटी?

प्यारे१
Mon, 03/24/2014 - 21:26 नवीन
काय ठरलं शेवटी?
  • Log in or register to post comments

?

विकास
Mon, 03/24/2014 - 21:29 नवीन
शेवटी? ही तर सुरवात आहे... ये तो पेहला जाम है, अभि तो शाम है... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>>अभि तो शाम है

प्यारे१
Mon, 03/24/2014 - 22:08 नवीन
>>>अभि तो शाम है इकडे पण 'शाम'? नका हो नका आमच्या 'कोमल मणा'वर आत्या चार -आपलं - अत्याचार करु! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

.

मूकवाचक
Wed, 03/26/2014 - 01:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा