✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुक्तविहारींची भाषणभरारी

प
पैसा यांनी
Tue, 03/04/2014 - 15:58  ·  लेख
लेख
१ तारखेच्या घारापुरी कट्ट्याहून अचानक गायब झालेले मुवि २ तारखेच्या दुसर्‍या कट्ट्याला उगवले. तेव्हा या मधल्या काळात आणखी कुठे कट्टा होता का काय अशी विचारणा त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांचा आणखी एक पैलू समोर आला. डोंबिवली इथल्या ब्राह्मण सभेत "तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक" या विषयावरच्या भाषणांच्या स्पर्धेत मुवि यांनी भाग घेतला आणि चक्क दुसरं बक्षीस पटकावलं. या बक्षीस मिळवणार्‍या भाषणाबद्दल स्वतःच लिहायला त्यांना बरे वाटेना, मग म्हटलं, चला मीच मिपाकरांना याबद्दल सांगते. डोंबिवलीची ब्राह्मण सभा बरीच जुनी. १९३५ सालची स्थापना झालेली ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. त्यांच्याकडे एक मोठे ग्रंथसंग्रहालय आहे असे ऐकले आहे. त्यामुळे वाचनाची आवड असलेल्या सदस्यांसाठी त्यांनी अशी स्पर्धा ठेवली यात नवल ते काय! पण विशेष म्हणजे सुमारे १२५ श्रोत्यांच्या समोर आयत्या वेळी तयारी करूनही छाप पाडणारे भाषण करून मुविंनी दुसरे बक्षीस पटकावले. या भाषणाचा विषय होता, "माझा आवडता दिवाळी अंक - मिपा दिवाळी अंक २०१३." एकूण १२ स्पर्धक होते.त्यातील १० स्त्रिया तर २ पुरुष होते. पैकी १ पुरुष आलाच नाही. मग मुविंनी आयोजकांना विनंती करून त्यांचा नंबर सगळ्यात शेवटी ठेवला होता. शनिवारी १ तारखेला संध्याकाळी ५ वा. स्पर्धा सुरु झाली आणि पहिल्या घारापुरी कट्ट्यात बिज्जी राहिल्यामुळे मुवि स्पर्धेला संध्याकाळी साडे सहाला पोहोचले. २ स्पर्धकांनंतर त्यांचा नंबर लागला. ११ स्पर्धकांमधे मुवि हे एकटेच पुरुष स्पर्धक होते. यावरून सामाजिक कामात महिला आघाडीवर असतात इ. निष्कर्ष सहज काढता येतील. पण तो अजून एका धाग्याचा विषय ठरेल. त्यामुळे सध्या या स्पर्धेची आणि भाषणाची माहिती घेऊया. १. प्रभा साळवेकर - साधना २. जयंत फाटक - मिसळपाव (इ-दिवाळी अंक) ३. सुनिता सामंत - कालनिर्णय उत्तेजनार्थ ४. अनुराधा आपटे - चार चौघी अशी बक्षीसे मिळाली. कार्यक्रमाचे फटु मुविंकडून मिळवण्यात आले आहेत. १) मुवि भाषण करताना. pic1 २) मुवि सौ. बिवलकर यांच्याकडून बक्षीस घेताना pic2 ३) मुवि आभाराचे भाषण करताना (या फोटोत डाव्या बाजूला आहेत त्या मुविंच्या वाचनप्रिय उत्साही आई) pic3 आता पाहूया, मुविंनी केलेले बक्षीसाचे भाषण. ----------------------------------- माननीय अध्यक्ष महोदया , परीक्षक मंडळ आणि उपस्थित रसिक जनहो, कुणीतरी म्हटलेच आहे की.... अक्षरांना नसते दु:ख आणि अक्षरांना नसते सुखही....ते वाहतात जी ओझी ते तुमचे आमचे अनुभव असतात. इथे हजर असलेल्या प्रत्येकालाच बरे-वाईट अनुभव आलेले आहेत. आपल्या प्रत्येकालाच वाटते. की आपले हे अनुभव, कुणाला तरी सांगावेत किंवा कुठल्या तरी मासिकात ते छापून यावेत आणि आपला लेख दिवाळी अंकात लेख छापून आला, तर त्या लेखकाला आनंद होतोच होतो.समजा आपल्याला एखादा चांगला लेख आपल्याला आवडला, तर त्या लेखकाला पत्र पण लिहावेसे वाटते. तसेच लेखकाला पण आपला लेख किती जणांनी वाचला आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. चांगल्या लेखावर झालेली खेळी-मेळीची चर्चा, लेखकाच्या लिखाणातील त्रुटी दूर करायला मदत करते. ज्याचा फायदा वाचकांनाच होतो. त्यांना अधिक सकस वाचायला मिळते. आणि ही अशीच खुले आम चर्चा होते ती एका इ-दिवाळी अंकावर, ज्याचे नांव आहे. "मिसळपाव.कॉम चा दिवाळी अंक" साधारण १९९६ मध्ये मायबोली.कॉमच्या माध्यमातून मराठी माणसे एकत्र यायला लागली आणि मराठी माणसांच्या प्रथेप्रमाणे, ई-दिवाळी अंक पण निघू लागले. मायबोलीचाच आदर्श घेवून इतर पण काही मराठी वेबसाईट्स तयार झाल्या जसे उपक्रम्, मी-मराठी, ऐसी अक्षरे, मनोगत आणि एक तेज तर्रार लोकप्रिय साईट "मिसळ-पाव.कॉम". ह्या वर्षीचा "मिसळपाव.कॉमचा" दिवाळी अंक फारच बहारदार होता. आपण प्रत्येकजण दिवाळी साजरी करतोच आणि सुट्ट्या मिळाल्या तर भटकंतीला पण जातो. ह्या वर्षी पण काही मिपाकर भटकंतीला गेले होते. पण कुठे तर "मंगळावर". त्याचे एक विनोदी प्रवासवर्णन "मुवि" ह्यांनी लिहीले आहे. अरे हो, ह्या साईटवर बरेच जण टोपण नावाने लिहीतात. तुम्हाला-आम्हाला जसा प्रवास करतांना काही अडचणी येतात. तशाच अडचणी ह्या मिपाकरांना पण आल्या. पण त्यांनी डगमगून न जाता,त्या अडचणी पार केल्या. थोडक्यात काय तर अडचणी आल्या तरी न घाबरता, प्रवास करा. असा मोलाचा संदेश विनोदी ढंगाने लेखक सांगून जातो. दिवाळीत गोड नसेल तर दिवाळीची मज्जा काय्? आणि इथे अशाच अनेक सुंदर पाककृती वाचायला, पहायला मिळतात. असे गोडाचे पदार्थ खाल्यावर दांत किडण्याचा संभव असतो. पण "अजया" ताईंनी लिहीलेल्या "दातांची काळजी कशी घ्यावी?" ह्या लेखाने आपण योग्य ती काळजी घेवू शकतो. दिवाळी म्हटली की, थोडा फार खर्च हा होणारच. नेहेमीच्या तेल आणि साबणाच्या जागी उंची तेल-साबण हे येणारच. थोडा फार खर्च कपडे किंवा फराळ ह्यावर तर होतोच पण त्यातून फटाके पण सुटत नाहीत. कधी कधी वाटते, कशाला करायचा इतका खर्च? पण गवि नावाचे कवि हा खर्च करा असे सांगून, एक दिवस तरी स्वतःसाठी जगा, अशी त्याची कारणमीमांसा करतात. प्रभाकर पेठकर नावाचे एक लेखक, बालपणीतल्या दिवाळीचे वर्णन करतात. किल्ले आणि आकाशकंदिला बरोबरच, न वाजलेले फाटके शोधण्याचे प्रसंग वर्णन करतात. आज काल फटाके उरतात, ही चैन नसून, तो पैशांचा माज आहे, असे परखड मत ते व्यक्त करतात. मज्जा करा पण अनावश्यक खर्च टाळा, हे त्यांनी योग्य शब्दांत सांगीतले आहे. आणखीही कित्येक सुंदर लेख, कथा, पाककृती यांनी हा अंक सजलेला आहे. आणि ह्या दिवाळी अंकातील, माझा सर्वात आवडता लेख म्हणजे, संपादकीय. ह्यात संपादकांनी इ-दिवाळी अंकाची खास वैशिष्टे सांगीतली आहेत. १. तो हवा तेंव्हा वाचता येतो. वाचनालयात गेल्यावर "आवाज","जत्रा"."किस्त्रीम." नाही मिळाले तर आपला हिरमोड होतो. ह्या इ अंकांमुळे तो होत नाही. २. कागद,शाई ह्या गोष्टींची गरज नसल्याने, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि साहजिकच प्रदूषण कमी होते. ३. जसा वेळ मिळेल तसा आणि कितीही वेळा, हे अंक वाचता येतात. तुम्हाला पण कधी हा अंक वाचावासा वाटला तर आमच्या "मिसळपाव.कॉम" ह्या साइटला भेट द्या. हे अंक वाचण्यासाठी तुम्हाला सभासद व्हायची पण गरज नाही. अहो, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते. ---------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
शुभेच्छा
अभिनंदन
बातमी
माहिती

प्रतिक्रिया द्या
27611 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

(No subject)

जेपी
Tue, 03/04/2014 - 16:04 नवीन
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
  • Log in or register to post comments

हा कट्टा जास्त स्पेशल होता....

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 17:16 नवीन
कारण सगळे मिपाकर, शब्दरूपाने माझ्या बरोबरच होते. (प्रत्येक कट्याला कुणी ना कुणी, गैरहजर असतेच, पण हा कट्टा मी समस्त मिपाकरांबरोबर साजरा केला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

प्रत्येक सुंदर गोष्ट विकत

कवितानागेश
Tue, 03/04/2014 - 16:05 नवीन
प्रत्येक सुंदर गोष्ट विकत थोडीच घ्यावी लागते!! किती छान. :)
  • Log in or register to post comments

मुवि यांचे अभिनंदन !

मदनबाण
Tue, 03/04/2014 - 16:09 नवीन
मुवि यांचे अभिनंदन ! :)
  • Log in or register to post comments

अरे वा, मुविकाका.

प्रचेतस
Tue, 03/04/2014 - 16:12 नवीन
अरे वा, मुविकाका. हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मस्त,

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 03/04/2014 - 16:14 नवीन
मस्त, वृत्तांता बद्दल धन्यवाद पैसा ताई मुविंचे मनापासुन अभिनंदन.
  • Log in or register to post comments

+१०००...असेच म्हणतो

शिद
Tue, 03/04/2014 - 16:36 नवीन
+१०००...असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

+१००

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 03/04/2014 - 17:12 नवीन
असेच म्हणतो ! मुवींचा अजून एक पैलू समजला !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मला पण हेच म्हणायच होतं.

स्पंदना
Wed, 03/05/2014 - 02:56 नवीन
मला पण हेच म्हणायच होतं. (मेरे मुंह की बात छिन ली। :( ) पैलुदार मुवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

क्या बात! क्या बात! क्या बात!

आत्मशून्य
Tue, 03/04/2014 - 16:15 नवीन
मुवींचे करावे तेव्हडे कौतुक कमीच वाटतयं.
  • Log in or register to post comments

अभिनंदन काका ...

दिव्यश्री
Tue, 03/04/2014 - 16:15 नवीन
अभिनंदन काका ... भारी भाषण आहे . *clapping* आता पार्टी . :)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनन्दन

सविता००१
Tue, 03/04/2014 - 16:22 नवीन
काका, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते हे वाक्य तर केवळ उच्च!
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो !!

सूड
Tue, 03/04/2014 - 16:33 नवीन
अभिनंदन हो !!
  • Log in or register to post comments

मुविंचे अभिनंदन!!

श्रीवेद
Tue, 03/04/2014 - 16:34 नवीन
मुविंचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

बक्षीसाबद्दल अभिनंदन!

ऋषिकेश
Tue, 03/04/2014 - 16:37 नवीन
बक्षीसाबद्दल अभिनंदन! पण हे इतकेच भाषण होते? का हा सारांश आहे? का हे बक्षीस घेतानाचे भाषण आहे?
  • Log in or register to post comments

सॉरी मी नीट वाचले नाही, हे

ऋषिकेश
Tue, 03/04/2014 - 16:38 नवीन
सॉरी मी नीट वाचले नाही, हे भाषण बक्षीस समारंभाच्या वेळचे होते असे कळले. मुळ भाषण वाचय्/ऐकायला मिळाले तर बहार येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

क्लायमॅक्स!!

तुषार काळभोर
Tue, 03/04/2014 - 16:37 नवीन
प्रत्येक सुंदर गोष्ट विकत थोडीच घ्यावी लागते!!!!!!!!!!!!!!! -(टाळ्या वाजवणारा) पैलवान.
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो मुवि !!!

धन्या
Tue, 03/04/2014 - 16:40 नवीन
अभिनंदन हो मुवि !!!
  • Log in or register to post comments

सुंदर भाषण मुवि.

सौंदाळा
Tue, 03/04/2014 - 16:44 नवीन
सुंदर भाषण मुवि. अभिनंदन. आयुष्य अगदी भरभरुन कसं जगायचं हे तुमच्याकडुन शिकावे.
  • Log in or register to post comments

मुवी जोर्रात्त.. अभिनंदन..

शैलेन्द्र
Tue, 03/04/2014 - 16:47 नवीन
मुवी जोर्रात्त.. अभिनंदन..
  • Log in or register to post comments

आवडलेल्या दिवाळी अंकाविषयीचे भाषण...

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 16:47 नवीन
पैसा ताईंनी लिहीले आहेच. मी तेच म्हणलो.वेळ ४ ते ५ मिनीटे असल्याने, जास्त वेळ बोलू शकत न्हवतो. आभाराचे भाषण करणारा मीच तेव्हढा होतो.इतर कुणीही केले नाही. आभाराच्या भाषणाचा थोडक्यात गोषवारा देतो. ======= मला बक्षीस दिल्याबद्दल आभार.पण खर तर हे बक्षीस माझे नाही.ही बक्षीस आहे मिसळपाव.कॉमचे. आपल्या सारखीच सामान्य माणसे, सामान्य शब्दांत असामान्य अनुभव लिहीतात आणि त्यामुळेच ते मनाला भिडतात. तुम्हाला पण असेच अनुभव आले असतील तर जरुर लिहा. मिसळपाव आपलेच आहे. आणि हो मी हे बक्षीस समस्त मिपाकरांतर्फे स्वीकारतो आणि त्यांनाच अर्पण करतो. ------
  • Log in or register to post comments

यासाठी पुनश्च अभिनंदन .

जेपी
Tue, 03/04/2014 - 17:11 नवीन
यासाठी पुनश्च अभिनंदन .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आवडले.

भाते
Tue, 03/04/2014 - 17:30 नवीन
पैसा ताईंनी धाग्यावर लिहिलेले तुमचे मुळ भाषण आणि आभारप्रदर्शनाचे भाषण, दोन्ही अप्रतिम. पुन्हा एकदा अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१०००००००.

सुबोध खरे
Tue, 03/04/2014 - 18:50 नवीन
+१०००००००. उत्तम भाषण आणि मुविंचा नम्रपणा दोन्हीही आवडले. कट्ट्याला त्यांनी मोघम असे काहीतरी सांगितले आणि आम्ही नुसते अभिनंदन म्हणून सोडून दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

भारी

मधुरा देशपांडे
Tue, 03/04/2014 - 16:51 नवीन
भारी. अभिनंदन मुवि काका. भाषण आवडले.
  • Log in or register to post comments

मुवि , अभिनंदन !

अजया
Tue, 03/04/2014 - 16:54 नवीन
मुवि , अभिनंदन !
  • Log in or register to post comments

अ भि नं द न !!!

जोशी 'ले'
Tue, 03/04/2014 - 17:03 नवीन
अ भि नं द न !!!
  • Log in or register to post comments

सह्ही...अभिनंदन!!!

अस्मी
Tue, 03/04/2014 - 17:05 नवीन
सह्ही...अभिनंदन!!! प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते.>>> अप्रतिम.
  • Log in or register to post comments

जोरदार...

नाखु
Tue, 03/04/2014 - 17:16 नवीन
अभिनंदन.. मिपाचा "आवाज" दिवाळी अंकाच्या "जत्रे"मध्ये "धूमधमाल्"करून राहीला पण "भटकंती" मुविंनी त्याला "कट्ट्या" समवेत "चार चौघी" नव्हे तर "अक्षर"शःबारा स्पर्धकांचा "सामना" करून, भाषण "मोहिनी" ने मुविंनी दुसरे बक्षीस पटकावले यात "नवल" ते काय? पुन्हा "अभिनंदन"
  • Log in or register to post comments

@ नादखूळा......

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 17:35 नवीन
जबरा..... मस्तच लिहीले आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मुजरा सरकार!

स्पंदना
Wed, 03/05/2014 - 02:57 नवीन
मुजरा सरकार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अभिनंदन!

मूकवाचक
Tue, 03/04/2014 - 17:18 नवीन
हार्दिक अभिनंदन ...
  • Log in or register to post comments

हाभिणंदन वो मु.वि.

प्रमोद देर्देकर
Tue, 03/04/2014 - 17:22 नवीन
अरे वा मु.विं चा अजुन एक पैलु दिसला. आता तर अष्टपैलु मुवि, असेच म्हणायला हवे. आणि पैताईला धन्स हार्दिक अभिनंदन !
  • Log in or register to post comments

लई भारी!

भाते
Tue, 03/04/2014 - 17:25 नवीन
अभिनंदन मुवि. आता लवकरच तुमच्या अभिनंदनाचा आणखी एक मध्यवर्ती डोंबिवली कट्टा येऊ द्या.
  • Log in or register to post comments

मुवि अभिनंदन कट्टा ,आपण करुया

अजया
Tue, 03/04/2014 - 20:48 नवीन
मुवि अभिनंदन कट्टा ,आपण करुया डोंबिवलीकर्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

जरूर....

मुक्त विहारि
Tue, 03/04/2014 - 21:03 नवीन
एक मस्त कट्टा करू या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

@कट्टा करू या... >>> कब???

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/04/2014 - 21:45 नवीन
@कट्टा करू या... >>> कब??? *OK* कब है कट्टा????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@कट्टा करू या... >>> कब??? कब

नानबा
Wed, 03/05/2014 - 02:25 नवीन
@कट्टा करू या... >>> कब??? कब है कट्टा????
डोंबिवलीत रेग्युलर बेसीस वर कट्टे होत असतात. डोंबिवलीकर मिपाकर्स भारी अ‍ॅक्टीव्ह आहेत... मुविंनाच बघा की.. बादवे, अभिनंदन मुवि.... भारीच.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अभिनंदन मुवि!!!

किसन शिंदे
Tue, 03/04/2014 - 17:26 नवीन
अभिनंदन मुवि!!!
  • Log in or register to post comments

हाबिणंडण हो मुविकाका.

गणपा
Tue, 03/04/2014 - 17:26 नवीन
हाबिणंडण हो मुविकाका. :)
  • Log in or register to post comments

है शाबास मुवि!

आदूबाळ
Tue, 03/04/2014 - 17:42 नवीन
है शाबास मुवि!
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

आतिवास
Tue, 03/04/2014 - 17:47 नवीन
अभिनंदन. आता यानिमित्त कुठं आणि कधी कट्टा? 'भाषणं देणा-या मिपाकरांचा' कट्टा? :-)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

पिलीयन रायडर
Tue, 03/04/2014 - 17:51 नवीन
अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन हो मुवि!

रेवती
Tue, 03/04/2014 - 18:00 नवीन
अभिनंदन हो मुवि!
  • Log in or register to post comments

कॉन्गो.

यसवायजी
Tue, 03/04/2014 - 19:00 नवीन
कॉन्गो. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

श्रीरंग_जोशी
Tue, 03/04/2014 - 19:11 नवीन
या स्पर्धेत बक्षिस मिळवल्याबद्दल अभिनंदन. पण या निमित्ताने मिपा वाचनाची आवड असण्यार्‍या इतर अनेक जनांपर्यंत असल्याबद्दल अधिक अभिनंदन. कुणास ठाऊक यातुन नवे मिपाकरही सामील होतील.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

भ ट क्या खे ड वा ला
Tue, 03/04/2014 - 19:26 नवीन
मला बक्षीस दिल्याबद्दल आभार.पण खर तर हे बक्षीस माझे नाही.ही बक्षीस आहे मिसळपाव.कॉमचे. मु वि लय भारी
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/04/2014 - 19:30 नवीन
Image removed. अभिनंदन!!! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अभिनंडन मुवि

लीलाधर
Tue, 03/04/2014 - 19:47 नवीन
अभिनंदन ओ मुवि लय भारी आम्हाला तुमचा अभिमान आहे जय हो मुविजी :)) ;)
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन..

पिंगू
Tue, 03/04/2014 - 19:49 नवीन
हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा